या ऑफर अंतर्गत फ्लिपकार्ट कमीत कमी 2000 रुपयांचा डिस्काऊंट देत आहे. ही बायबॅक ऑफर नोकिया, सॅमसंग,सोनी, ब्लॅकबेरी, अॅपल, मायक्रोमॅक्स, कार्बन, झोलो, मोटोरोला, एचटीसी, लावा आणि लेनोवोच्या समार्टफोन्ससाठी लागू आहे.
याशिवाय मोटो जीच्या 8GB आणि 16 GB मॉडेलच्या खरेदीसाठीही ही ऑफर उपलब्ध आहे. मोटो जीचे 8GB आणि 16GB फोन डिस्काउंट नंतर 10,499 आणि 11,999 रुपयांना मिळतील.
फ्लिपकार्ट स्मार्टफोन एक्सचेंजसाठी 50 रुपये शुल्क आकारत आहे. मोटो जीचे दोन नवे स्मार्टफोन्स मोटो जी आणि मोटो एक्स यांची विक्री करणारी फ्लिपकार्ट ही एकमेव वेबसाईट आहे.
मोटोरोलाच्या मोटो एक्स स्मार्टफोनसाठी ही ऑफर लागू नाही. तसेच आयफोन 5S आणि सॅमसंग गॅलेक्सी S4 चाही समावेश या ऑफरमध्ये करण्यात आलेला नाही.

ADVERTISEMENT