यंदाच्या लोकसभा निवडणुका वेगळ्या ठरणार आहेत. कारण या निवडणुकांमध्ये सर्वच राजकीय पक्ष सोशल मीडियाचा जोरदार वापर करताना दिसताहेत. निवडणुकीत ६५ टक्के मतदार तरुण आहेत आणि या तरुणांना आकर्षित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष सरसावले आहेत.
राष्ट्रीय स्तरावर भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी यांच्यातल्या या सोशल मीडिया स्पर्धेत अर्थातच आघाडीवर आहेत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी. ‘अब की बार मोदी सरकार’ हा नारा देणारी भाजपची अधिकृत वेबसाइट नमोनमःच्या जपाने भरलेली आहे. मोदींची वचने, पोस्टर्स, बातम्या, रोजच्या मोदींच्या सभांचे व्हिडीओ यांची वेबसाइटवर रेलचेल आहे. भाजपच्या फेसबुक पेजला २६ लाख लाइक्स मिळाले आहेत. बेंगळुरूमध्ये राजेश जैन यांच्या नेतृत्वाखालील एक हजार जणांची टीम ही वेबसाइट सांभाळते.
काँग्रेसच्या वेबसाइटवर अर्थातच राहुल गांधी यांचे फोटो, प्रचारसभा, रोडशोज यांचे व्हिडीओ आणि यूपीए सरकारच्या विविध योजनांचा गोषवारा आहे. ‘मैं नही, हम’ हा राहुल गांधी यांचा संदेश मतदारांपर्यंत पोहोचवण्याचे या वेबसाइटचे उद्दिष्ट आहे. पक्षाच्या फेसबुक पेजला आतापर्यंत आतापर्यंत २१ लाख लाइक्स मिळाले आहेत.
‘आप’च्या वेबसाइटवर रोज ४०-५० पोस्ट्स या साइटवर पडतात. सभासद नोंदणीपासून ते लोकसभा उमेदवारीच्या फॉर्म्सपर्यंत सर्व माहिती तसेच केजरीवाल यांची प्रश्नावली, सभा आणि पत्रकार परिषदांचे व्हिडिओ येथे आहेत. ‘आप’च्या फेसबुक पेजला १६ लाख लाइक्स मिळाले आहेत.
वेबसाइटच्या स्पर्धेत महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आघाडीवर आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषांतल्या या वेबसाइटवर शरद पवार यांचा ब्लॉग, मंत्र्यांची कामे, सरकारी योजना, अजित पवारांचा जनता दरबार, बातम्या, नेत्यांचे दौरे आणि भाषणांचे व्हिडीओ असा मजकूर आहे. राष्ट्रवादीच्या फेसबुक पेजला २ लाख १८ हजार लाइक्स मिळाले आहेत. गारपीटग्रस्त भागात शरद पवार यांच्या पायी दौऱ्याला वेबसाइटवर चांगला प्रतिसाद मिळाल्याचे वेबसाइटचे संचालक नितीन वैद्य यांनी सांगितले. स्टार प्लस चॅनलचे माजी बिझनेस हेड नितीन वैद्य आणि मोबीटॉक्स इनोव्हेशनचे संस्थापक अभिजीत सक्सेना यांच्या ‘ड्रायव्हिंग माइंड्स’तर्फे ही वेबसाइट चालवली जाते.
शिवसेनेच्या वेबसाइटवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो झळकत आहेत. ‘भगवा झंझावात’ असे वर्णन असलेल्या या वेबसाइटवर शिवसेनेचे प्रचारगीत, सभा, पत्रके, शिवबंधन शपथ इत्यादी मजकूर आहे. बाळासाहेबांची जुनी भाषणे, व्यंगचित्रेही आहेत. मुंबई महापालिकेत शिवसेनेने केलेल्या कामांचा गोषवारा, पक्षाचे उमेदवार, प्रचारसभांचे वेळापत्रक इत्यादी मजकूर आहे. शिवसेनेच्या फेसबुक पेजला आतापर्यंत ६५ हजार लाइक्स मिळाले आहेत. युवासेनेची टीम या वेबसाइटचे काम पाहते. भाजपची महाराष्ट्राची वेबसाइट त्यामानाने थंड आहे. गोपीनाथ मुंडे, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, किरीट सोमय्या आदी नेत्यांच्या सभा, बातम्या आणि फोटो असा मजकूर या वेबसाइटवर आहे. मायक्रोसॉफ्टमधून निवृत्त झालेले भाजप कार्यकर्ते आर. पी. सिंह यांच्या नेतृत्वाखालील दहा जणांची टीम यासाठी काम करते. त्यांच्या फेसबुक पेजला २७ हजार ६८७ लाइक्स मिळाले आहेत.
‘हीच क्रांती आहे’ या घोषवाक्याने सजलेल्या ‘आप’च्या महाराष्ट्राच्या वेबसाइटवरही केजरीवाल यांच्या ताज्या मुंबई-महाराष्ट्र दौऱ्याचे व्हिडीओ, प्रचारसभा, रोडशो यांच्या बातम्या आहेत. त्यांच्या फेसबुक पेजला ५८ हजार ४०२ लाइक्स आहेत.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची वेबसाइटही राष्ट्रीय वेबसाइटच्या तुलनेत दुर्लक्षितच दिसते. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासह महाराष्ट्राच्या नेत्यांच्या बातम्यांची कात्रणे, उमेदवारांची यादी, सरकारी योजना असा मजकूर यावर आहे. तर त्यांच्या फेसबुक पेजला ४ हजार ७०१ लाइक्स मिळाले आहेत.
राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मनसेची वेबसाइट नव्यानेच सुरू झाली आहे. ठाकरे यांचे वर्धापन दिनाचे भाषण, जाहीर सभा, पत्रकार परिषदा, उमेदवारांची यादी, गारपीटग्रस्त भागाच्या दौऱ्याचा व्हिडिओ यावर उपलब्ध आहेत. मनसेचे सरचिटणीस अनिल शिदोरे यांच्या नेतृत्वाखालील टीम या वेबसाइटचे व्यवस्थापन बघते. या वेबसाइटवर राज्याची जिल्हावार माहिती, नामवंत व्यक्तींचे फोटो, टोलसारख्या प्रश्नी पक्षाची धोरणे इत्यादी माहिती वेबसाइटवर आहे. पक्षाचे मुखपत्र म्हणून ही वेबसाइट काम करणार असून लवकरच एक संयुक्त ‘अॅप’ आणणार आहे. आतापर्यंत ३५ हजार डाऊनलोड्स झाल्याचे शिदोरे म्हणाले.
लाइक्स, चॅट, शेअर आणि ट्विट्समध्ये गुंतलेली तरुणाई प्रत्यक्ष किती मतदान करते, हे येणारी निवडणूक ठरवेल.
Writer for M.T. – वैजयंती कुलकर्णी-आपटे

ADVERTISEMENT