
४ फेब्रुवारी २००४ रोजी मार्क झुकेरबर्गने हार्वर्ड युनिव्हर्सिटीतून फेसबुकची स्थापने केली. त्यावेळी विद्यार्थ्यांना एक ऑनलाइन ओळख देणे आणि त्यांना एकमेकांशी कनेक्ट होण्याचे एक माध्यम पुरवणे हा त्याचा हेतू होता. तेव्हापासून आजपर्यंत नाट्यमयरित्या अनेक पटींनी वाढलेले फेसबुक आज पब्लिक लिमिटेड कंपनी झाले आहे त्यांनीच दिलेल्या माहितीनुसार १.२ अब्ज युजर्स दरमहा नियमितपणे त्याचा वापर करत आहेत.
फेसबुक एवढे मोठे वा प्रभावी माध्यम ठरेल, याची कल्पना आपल्याला प्रारंभी नव्हती, अशी प्रांजळ कबुली आज जगातल्या सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींमध्ये गणल्या जाणाऱ्या जेमतेम तीस वर्षांच्या झुकेरबर्गने नुकतीच दिली.
वाढत्या मोबाइलच्या मार्केटची दखल घेण्यास फेसबुकने उशीर केल. मात्र सध्याच्या घडीला या कंपनीचा निम्मा महसूल मोबाइलच्या माध्यमातून येतो, हेही नुकतेच समोर आले आहे. क्षणार्धात फोटो, व्हिडिओ, मते इतरांपर्यंत पोहोचवणाऱ्या स्मार्टफोन्स अॅप्सची वाढती लोकप्रियता हे सध्या फेसबुकसमोरचे मोठे आव्हान आहे. पिंटरेस्ट, ट्विटर, स्नॅपचॅट यांनी फेसबुकला मोठी स्पर्धा निर्माण केली आहे. फेसबुकचा मूळचा टीनएजर्सचा युजरबेसही घटत आहे. पुढच्या तीन वर्षांत फेसबुकचा युजरबेस ८० टक्क्यांनी घटेल असे भाकीतही प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीच्या संशोधनात समोर आले आहे. गेल्या तीन वर्षांत १३ ते १७ वर्षे वयोगटातील ३० लाख युजर्सनी फेसबुक सोडल्याचे आयस्ट्रॅटेजी लॅबने स्पष्ट केले आहे.
कर्मचाऱ्यांची संख्या ६,३३७ (डिसें.१३ अखेरपर्यंत)
दरमहा फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या १.२३ अब्ज
दररोजचे अॅक्टिव्ह युजर्स ७५७ दशलक्ष
फेसबुकचे बाजारमूल्य १३५ अब्ज डॉलर्स
१५० अब्ज डॉलर्सच्या टप्प्याकडे वाटचाल सुरू, फक्त २६ अमेरिकन कंपन्यांना आजवर ही कामगिरी जमली आहे.
ADVERTISEMENT
छान