
सोनीच्या या ‘थ्रो प्रोजेक्टर’मध्ये चार एचडी पोर्ट दिलेले आहेत. याला तुम्ही मोबाइल, डीव्हीडी, टॅबलेट, आणि पेनड्राइव्ह जोडू शकता. या प्रोजेक्टरची किंमत 18.62 ते 24 लाख असण्याची शक्यता आहे. येत्या मे-जूनपर्यंत हे प्रोजेक्टर बाजारात उपलब्ध होईल.
‘फिल्प्सि’चा अँड्राइड टीव्ही..
आतापर्यंत अँड्राइड मोबाइल आपण पाहिले असतील. आता अँड्राइड ऑपेरेटींग सिस्टिमवर काम करणारा टीव्ही लॉन्च करण्यात आला आहे. ‘फिल्प्सि’ने अँड्राइड स्मार्ट टीव्ही सादर केला आहे. यात ‘गुगल प्ले’सारख्या अनेक अँड्राइड अॅप्लिकेशन्स आहेत. उल्लेखनिय म्हणजे या टीव्हीला स्मार्टफोनही जोडता येईल. टीव्हीच्या रिमोटमधेच माइक दिला असून त्याच्या मदतीने युजर्स ‘व्हॉइस सर्च’ही करू शकतात. यात क्वॉट्री की-पॅड बसवलेले आहे. त्यामुळे स्मार्टफोनच्या साहाय्यानेही टीव्ही ऑपरेट करू शकता. येत्या ऑक्टोबरपर्यंत हा टीव्ही बाजारात उपलब्ध होणार आहे. टीव्हीची किंमत किती असेल याबाबत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
टच करताच होईल पेमेंट…
पल्स वॉलेट डिव्हाइस दोन प्रकारे काम करते. पहिल्यांदा डेबिट, क्रेडीट कार्डमधील डाटा स्टोअर केला जातो. त्यानंतर या डिव्हाइसवर हात स्कॅन करावा लागतो. स्कॅन केल्यानंतर हे डिव्हाइस संबंधित व्यक्तीचे बायोमॅट्रीक तपशील एकत्र करते. एखादी वस्तू खरेदी केल्यानंतर पेमेंट करताना डिव्हाइसवर टच करताच पमेंट झाल्याचा एसएमएस मोबाइलवर येतो. यामध्ये आधी आपल्याकडे असलेले डेबिट, क्रेडीट कार्डची नोंदणी करावी लागते.

ADVERTISEMENT