संगणक किती लहान होऊ शकतो याबद्दल तुम्ही कधी विचार केला आहे का ? मात्र , जर तुम्ही हा प्रश्न इंटेल या कंपनीला विचारला तर त्यांचे उत्तर असेल अगदी एखाद्या लहान एसडी कार्ड इतके लहान. नुकताच इंटलेने आपला एडिसन हा नवीन जगातील सर्वांत लहान कम्प्युटर लॉन्च केला आहे. इंटेलने काही महिन्यांपूर्वी काम सुरू केलेल्या क्वार्क मायक्रोप्रोसेसर टेक्नोलॉजी वापरून हा लहान कम्प्युटर बनवला आहे. रोज अगदी आरामात घेऊन फिरता येईल इतकी मुव्हेबल कम्प्युटर बनवण्याच्या दृष्टीने हा शोध लावल्याची माहिती इंटेलचे सीईओ ब्रायन क्रॅनिंच यांनी दिली.
एडिसन हा पूर्णपणे वायरेल आणि अनेक ऑपरेटिंग सिस्टीमला सपोर्ट करणारा एखाद्या एसडी कार्डप्रमाणे दिसणार कम्प्युटर आहे. खरेतर हा एखाद्या इंटेल प्लॅटिनम प्रोसेसच्या तोडीचा आहे. फक्त , याचा आकार लहान आहे. ‘ वेअरेबल कम्प्युटर टेक्नोलॉजी ‘ अजूनही आपल्या दैनंदिन जीवनाशी एकरूप झालेली नाही. आजही अनेकांना वेअरेबल कम्प्युटर्स वापरणे शक्य होत नाही. त्यामुळे कम्प्युटर इंजिनिअरींसमोरच्या या आव्हानाला उत्तर देण्यासाठी एडिसनची निर्मिती करण्यात आली असून इंटलची जोड असल्याने हे तंत्रज्ञान सरस ठरू शकते.
लासवेगास येथे झालेल्या कनझ्युमर इलेक्ट्रॉनिक शोमध्ये इडिसनच्या वापराचा डेमो देण्यात आला. उदाहरणार्थ ,जर पालकांना बाळाच्या हलचालीवर नजर ठेवायची असेल तर बाळाच्या कपड्यावर लावलेल्या एडिसनच्या मदतीने पालकांजवळच्या कम्प्युरशी कनेक्ट होऊन बाळ कसे आहे याची माहिती पोहोचवता येईल. यात अगदी बाळ रडण्यापासून ते बाळ घरातील कोणत्या भागात आहे , या सर्व गोष्टींवर एकाच वेळी लक्ष ठेवता येणार आहे. बाळ रडायला लागल्यास एडिसन त्याची सूचना पालकांना देईल. इंटलने याआधीही स्मार्टफोन , स्मार्टवॉचेस आणि स्मार्टग्लासेसच्या क्षेत्रात प्रॉडक्ट आणण्याचा प्रयत्न केला. मात्र , त्यात ते फसले होते. ती चूक टाळण्याचा प्रयत्न एडिसनच्या निर्मितीत करण्यात आला आहे.
इंटेलचे प्रतिस्पर्धी क्वालकोमने आपल्या टॉव्क या स्मार्टवॉचची घोषणा केली होती. इंटेलनेही पुन्हा आपण स्मार्टवॉचच्या स्पर्धेत उतरत असल्याचे सांगत नवीन स्मार्टवॉचचे प्रोटोटाईप्सबद्दलची माहिती दिली. तसेच ,इंटेलने आपण ‘ जर्वीस ‘ हे इयरबड तयार करत असल्याचे सांगितले. या इयरबडमुळे बायोमेट्रिक्स आणि शरीराच्या इतर क्षमतांची माहिती मिळणार आहे.

ADVERTISEMENT