अभ्यासाचं टेन्शन असो वा मित्र-मैत्रिणींची भांडणं, रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम, ब्रेकअप, बॉसची कटकट, कामाचा ताण अशा अनेक प्रॉब्लेम्सना आपण दररोज सामोरे जातो. मात्र, याबाबत आपण कोणाशीही बोलत नसल्याने मनाची घुसमट होते. त्यामुळे युवक व युवतींच्या अशा अनेक समस्यांवर सोल्युशन म्हणून चार तरुणांनी ‘शेअरिंग दर्द डॉट कॉम’ ही वेबसाइट तयार केली आहे. तिच्या माध्यमातून सध्या ९० हजारांहून अधिकजण आपले प्रॉब्लेम्स शेअर करत आहेत. त्यांना जॉब व लव्ह अँड रिलेशनशिप दर्दचे प्रॉब्लेम आहेत.
या वेबसाइटवर तुम्ही तुमच्या मनातील कोणतीही गोष्ट शेअर करू शकता. तुम्हाला येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी इथले मित्र तुम्हाला मदत करतात आणि तेही मोफत. कारण तेही तुमच्यासारखेच समदु:खी असतात. विशेष म्हणजे इथे तुमची ओळख गुप्त ठेवली जाते. तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शनही मोफत मिळते. अर्थात सल्ला मोफत मिळतो, मानसोपचार हवे असल्यास मात्र डॉक्टरांची फी द्यावी लागते. आयआयएम लखनौमधून शिक्षण घेतलेल्या रितिका शर्मा, सुमंत गजभिये, गौरव राजन आणि लिमा जेम्स या चार मित्रांनी या वेबसाइटची निर्मिती केली आहे. सध्या हे चौघेही मुंबईतच असतात. दोन वर्षांच्या प्रयत्नातून त्यांनी ही वेबसाइट आठ महिन्यांपूर्वी तयार केली आहे.
या वेबसाइटवर १६ तज्ज्ञ डॉक्टरांची टीम समुपदेशनाचे काम करते. मुंबईमधील तरुणांना आय एम फिलिंग लोनली दर्द हा प्रॉब्लेम अधिक आहे, तर कोल्हापुरातील तरुणांना जॉब व लव अँड रिलेशनशिप दर्द आहे. या वेबसाइटवर सहा प्रकारची विभागणी केली असून जॉब अँड करिअर दर्द, आय एम फिलिंग लोनली दर्द, लव अँड रिलेशनशिप दर्द, सोशल अँड फॅमिली दर्द, मेट्रोमोनी सर्च दर्द, सोशल तेबू दर्द असे आहेत.
100358 Users
एकटेपणा, डिप्रेशन, घुसमट हे सारे बोलण्यासाठी हक्काची जागा हवी असे त्यांना वाटायचे. त्यातूनच तयार केली एक वेबसाइट ‘शेअरिंग दर्द डॉट कॉम’. यामुळे अनेकांना आपले मन मोकळे तर करता येतेच, शिवाय टेन्शन फ्री जीवन जगण्याची नवीन दिशा मिळत आहे. – सुमंत गजभिये, वेबसाइट डेव्हलपर