मोबाइलवरून करण्यात येणाऱ्या मेसेजच्यादेवाणघेवाणीचे स्वरूप पुरते पालटून टाकणाऱ्याव्हॉट्सअॅपची लोकप्रियता व उपयोग भारतातही प्रचंडवेगाने वाढत असून , या अॅपचा वापर करणाऱ्यांचाआकडा तब्बल तीन कोटीवर पोहोचला आहे .
इंटरनेट सुविधा असलेल्या फोनच्या , स्मार्ट फोनच्यावाढत्या वापरासोबत पारंपरिक एसएमएस सुविधेचावापर झपाट्याने कमी होत चालला असून , त्याची जागाव्हॉट्सअॅप , लाइन , हाइक , चॅटऑन , ब्लॅकबेरीबीबीएम अशा भिडूंनी घेतली आहे . त्यातही व्हॉट्सअॅपने घेतलेली आघाडी मोठी आहे .
ऑगस्ट महिन्यात भारतात व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांची संख्या दोन कोटीच्या घरात होता . केवळ महिनाभराच्याकाळात त्यात तब्बल एक कोटीची भर पडून हा आकडा तीन कोटींवर पोहोचला आहे . व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांचीजगभरातील एकूण संख्या सुमारे ३० कोटी आहे . याचाच अर्थ जगभरातील व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांपैकी १० टक्केलोक भारतात आहेत .
व्हॉट्सअॅपची ही कमालीच्या वेगाने वाढत असलेली लोकप्रियता लक्षात घेऊन विविध मोबाइल कंपन्याही त्याचालाभ आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत . आपल्या ग्राहकांसाठी व्हॉट्सअॅपच्या जोडीनेआकर्षक पॅकेज देण्यास त्यांनी सुरुवात केली आहे . येत्या काळात विविध कंपन्यांत याबाबत मोठी स्पर्धा दिसेल ,अशी चिन्हे आहेत .