सॅमसंगच्या लाटेत वाहून जाणा-या नोकियासाठी तारणहार ठरलेल्या नोकिया आशा सीरिजमधील ‘आशा ५०१’ या हँडसेटमध्ये आता ‘व्हॉट्सअॅप’ वापरता येणार आहे. या नव्या अपडेटमुळे ‘स्वस्त आणि मस्त’ स्मार्टफोन म्हणून आपली ओळख निर्माण केलेल्या आशा ५०१ची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
नोकिया आशा ५०१ बाजारात आल्यावर कित्येकांना या हँडसेटनं भुरळ पाडली. पाच हजार रुपयांत स्मार्टफोनची फीचर्स आणि ‘नोकिया का भरोसा’ मिळत असल्यानं अनेकजण या फोनवर फिदा झाले होते. परंतु, त्यात सगळ्यात ‘हिट’ इन्स्टंट मेसेजिंग अॅप, ‘व्हॉट्सअॅप’ नसल्यानं तरुणांची निराशा झाली होती. तरीही हा फोन दणक्यात चालला.
या मॉडेलनंतर नोकियानं आशा ५००, आशा ५०२ आणि आशा ५०३ ड्युएल-सिम फोन बाजारात आणले. त्यात व्हॉट्सअॅप आधीच इन्स्टॉल केलं गेलं होतं. पण, या फोनपेक्षाही आशा ५०१ मोबाइलप्रेमींना जास्त आवडला होता. ही लोकप्रियता लक्षात घेऊनच, या हँडसेटमध्ये ‘व्हॉट्सअॅप’ उपलब्ध करून द्यायचं नोकियानं ठरवलंय.
नोकिया आशा ५०१ वापरणा-यांना सॉफ्टवेअर अपडेट करून ‘व्हॉट्सअॅप’ डाउनलोड करता येणार आहे. त्याशिवाय, एका टचने फोटो फेसबुकवर शेअर करायचं फीचरही मोबाइलधारकांना मिळू शकणार आहे. फेसबुकवरच्या ‘कमेंट’ आणि ‘लाइक’ही त्यांना स्क्रिनवर पाहता येतील. या नव्या फीचरमुळे नोकियाच्या ‘आशा’ पुन्हा पल्लवित झाल्यात.

ADVERTISEMENT