स्वस्त आणि मस्त अँड्रॉइड स्मार्टफोनची संख्या झपाट्याने वाढते आहे. पण ही ओपन ऑपरेटिंग सिस्टिम असल्याने अनेकदा हे स्मार्टफोन हँग होतात किंवा त्याचा वेग कमी होतो. मोबाइल कोणत्याही कंपनीचा असो किंवा कितीही महागातला असो, ही अडचण सर्वांना येतेच. त्यामुळेच अँड्रॉइड फोनवाल्यांसाठी या काही खास टिप्स…
स्टोरेज रिकामे करा
अनेकदा एखादे अॅप्लिकेशन फोनमधून डिलीट केल्यानंतरही त्या अॅप्लिकेशनशी संबंधित अनेक फाइल्स तुमच्या मोबाइलच्या स्टोरेज मेमरीमध्ये असतात. आपल्या मोबाइलमधील ही स्टोरेज मेमरी वाचण्याचा सर्वात सोपा पर्याय म्हणजे डाउनलोड केलेली सर्व अॅप्लिकेशन आपल्या मेमरीकार्डमध्ये स्टोअर करणे. यासाठी अॅपमर्ज थ्री (AppMgr III) या अॅप्लिकेशनच्या मदतीने मोबाइलच्या इंटरनल मेमरीमधील अॅप्लिकेशन्स थेट मेमरी कार्डमध्ये किंवा मेमरी कार्डमधील थेट इंटरनल मेमरीत शिफ्ट करता येतात. मोबाइल कॅमेराने काढलेल्या फोटोसाठी खूप मेमरी अडकून राहते. त्यामुळे तुमच्या कॅमेरातील सेटिंगमध्ये बदल करून क्लिक केलेले फोटो थेट मेमरी कार्डमध्ये सेव्ह करण्याचा पर्याय निवडल्यास मोबाइलची इंटर्नल मेमरी वाचते.
रॅम फ्री करा
तुमच्या मोबाइलमध्ये अॅक्टिव्ह असणारे प्रत्येक अॅप्लिकेशन थोडी फार रॅम खाते. मोबाइलची मेमरी जर २ जीबी किंवा त्याहून अधिक असल्यास ही अडचण येणार नाही. मात्र मोबाइलची मेमरी १ जीबी किंवा त्याहून कमी असल्यास मोबाइल स्लोडाऊनची अडचण येईल. रॅममध्ये फक्त काही महत्वाची (सिस्टीम) अॅप्लिकेशन असणे गरजेचे असते. बाकी अॅप्लिकेशनमुळे अनेकदा रॅमवर जोर पडतो. रॅम फ्री करण्यासाठी क्लिन मास्टर (Clean Master) (के.एस मोबाइल) हे अॅप्लिकेशन इन्स्टॉल केल्यास त्याचा बराच फायदा होऊ शकतो. या अॅपमुळे मोबाइलमधील रॅम फ्री होण्याबरोबच इंटरनल मेमरी क्लीनिंग आणि नको असलेल्या फाइल्सही डिलीट केल्या जातात. हे अॅप इन्स्टॉल केल्यास तुमच्या मोबाइलच्या विजेटमध्ये वन क्लिक बुस्ट बटण दिसू लागते. ज्याच्या मदतीने केवळ एका क्लिकवर मेमरी फ्री करून कॅशे क्लिअर करू शकता.
मोबाइलची कार्यक्षमता वाढवा
काही महिन्यानंतर अनेक मोबाइल फोन्सची कार्यक्षमता कमी झाल्याचे जाणवू लागते. नेव्हीगेशन स्पीड कमी होणे, अॅप्लिकेशन सुरू होण्यास वेळ लागणे, गेम किंवा व्हिडीओ अचानक बंद होणे यासारख्या अनेक अडचणी वारंवार येतात. आपल्या मोबाइलची कार्यक्षमता वाढवण्यासाठी अनेक गोष्टी करता येतील. गरजेची किंवा वापरात नसलेली अॅप्लिकेशन किंवा विजेटमुळे अनेकदा मेमरी अडकून राहते. त्यामुळे ती डिलीट करणे हा सर्वात सोपा पर्याय. तसेच मोबाइलवरील अॅनिमेशन इफेक्ट बंद केल्यास फरक पडतो. (सामान्यतः हे सेटिंग- डेव्हलपर्स ऑप्शन्स- विंडो अॅण्ड ट्रन्झीक्शन अॅनिमेशन मध्ये हा पर्याय उपलब्ध असतो) सुपर टास्क किलर फ्री (Super Task Killer Free, Easy Task Killer, Advanced Task Killer) सारखे टास्क किलर अॅप्लिकेशन वापरू शकता. या अॅप्लिकेशनमुळे वापरात नसलेले अचानक बंद करण्यात आलेले तरी बॅकग्राऊण्ड मेमरीत सुरू असणारे रनिंग टास्क क्लिअर करता येतात. अँटि-व्हायरस अॅप्लिकेशन वापरूनही मोबाइलची क्षमता वाढवता येते.

ADVERTISEMENT