SAMSUNG व APPLE या दोन दिग्गज कंपन्यांमध्ये मागील दोन वर्षांपासून सुरु असलेल्या पेटेंटप्रकरणाचा अखेर निकाल लागला. साउथ कोरियन स्मार्टफोन निर्माता कंपनी SAMSUNG ला मोठा झटका बसला आहे. SAMSUNG ला 290 मिलियन डॉलरचा (जवळपास 182 हजार कोटी रुपये) दंड ठोठावण्यात आला आहे. अमेरिकन ज्यूरीने हा ऐतिहासिक निर्णय दिला आहे. Apple ने SAMSUNG वर पेटेंट चोरीचा आरोप केला होता.
SAMSUNG आणि APPLE मध्ये पेटेंट चोरीचा वाद मागील दोन वर्षांपासून सुरू होता. यापूर्वीही निर्णय APPLE च्या बाजूने लागला होता. परंतु, नुकसान भरपाईपोटी APPLE ला SAMSUNG कडून केवळ 1.05 बिलियन डॉलर्स मिळणार होता. अमेरिकन ज्यूरीने त्यात 290 मिलियन डॉलर्स एवढी वाढ केली आहे.
जगातील सगळ्यात मोठी स्मार्टफोन निर्माता कंपनी SAMSUNG आणि आयफोन मेकर APPLE यांच्यात मागील दोन वर्षांपासून वाद सुरु होता. SAMSUNG वर एकूण 26 पेटेंट चोरल्याचा आरोप होता. APPLE नुसार SAMSUNG ने अनेक मोठ्या चोर्या केल्या होत्या. या प्रकरणाचा निकाल ज्यूरी लूसी कोह (Lucy Koh) यांनी दिला.
APPLE ने SAMSUNG वर फिंगर टू पिंच, झूम ऑन स्क्रीन आणि अनेक टच फीचर्स सारख्या ब्लॅक ग्लास स्क्रीनची कॉपी केल्याचा आरोप केला होता. ज्यूरी लूसी कोह निकाल देताना म्हणाले, APPLE साठी हे प्रकरण पेटेंट आणि पैशांसाठी महत्त्वाचे नव्हते तर प्रतिष्ठेचे होते. पेटेंट विकसित करण्यासाठी APPLE खूप मेहनत घेतली होती. APPLE ची ती नवनिर्मिती होती.