हा फोन घेण्यासाठी कोणताही कॉंट्रॅक्ट करण्याची गरज नाही. ऍपलच्या आयफोनसाठी 2 वर्षांचा करार करावा लागतो. परंतु, या फोनसाठी असे काहीही करण्याची गरज नाही. सिम लॉकदेखील नाही. त्यामुळे विकत घेतल्यानंतर हा फोन पूर्णपणे तुमचाच होईल.
फिचर्सबद्दल बोलायचे झाल्यास या फोनमध्ये ऍण्ड्रॉईड 4.3 जेलीबीन ही लेटेस्ट ऑपरेटींग सिस्टिम आहे. जानेवारी 2014 पर्यंत 4.4 किटकॅट ऑपरेटींग सिस्टिम अपडेट करता येईल. या फोनमध्ये 4.5 इंचाची एचडी स्क्रीन आहे. टचस्क्रीनचा अनुभव इतर स्मार्टफोनच्या तुलनेत खूप चांगला राहील. मोटो जीमध्ये 720*1280 डिस्प्ले रिझॉल्यूशन आहे. याशिवाय 329 पिक्सेल प्रति इंचाची पिक्सेल डेन्सिटी आहे. यामुळे उन्हातही चांगला डिस्प्ले मिळेल. याशिवाय फोनला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास3 स्क्रीन प्रोटेक्शन लावण्यात आले आहे.
हा फोन जबरदस्त परफॉर्मन्स देऊ शकतो. त्यात 1.2 GHz क्वालकॉम स्नॅपड्रॉगन 400 क्वाड कोर प्रोसेसर लावण्यात आला आहे. याशिवाय फोनमध्ये ग्राफिक्स कार्डदेखील आहे. यामुळे फोनचा डिस्प्ले अतिशय उच्च दर्जाचा आहे. गेमिंगच्या चाहत्यांसाठी हा एक चांगला पर्याय आहे. तसेच फोनमध्ये 1 जीबी रॅम आहे. सध्याच्या ट्रेंडमध्ये ही पुरेसी आहे.मोटो जीमध्ये 5 मेगापिक्सेलचा कॅमेरा आणि एलईडी फ्लॅश आहे. तसेच 1.3 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे.
या फोनमध्ये वॉटर रेझिस्टंट नॅनो कोटींग तंत्रज्ञानही वापरण्यात आले आहे. त्यामुळे या फोनचा पाण्यापासून बचाव होईल.मोटो जीमध्ये अनेक ऍप्स आधीपासून इंस्टॉल करण्यात आलेले आहेत. चांगल्या ग्रिपसाठी बॅक कव्हरची खास रचना करण्यात आली आहे. या फोनमध्ये एफएम रेडिओदेखील आहे. अनेक टॉप फोनमध्ये हे फिचर मिळत नाही.हा फोन 5 रंगात मिळेल. वायरलेस स्पीकर्ससह कंपनी 65 जीबीची गुगल ड्राईव्ह ऑनलाईन मेमरी स्पेस मोफत मिळत आहे. हा फोन निश्चितच ग्राहकांच्या पसंतीस उतरू शकतो. एकच त्रुटी आहे. मेमरी कार्डद्वारे मेमरी वाढविण्याची सोय नाही.फोनचा बॅटरी बॅक अप चांगला आहे. या फोनची बॅटरी 2070 mAh क्षमतेची आहे. त्यामुळे दिवसभर सहजपणे फोनवर काम करणे शक्य आहे. याशिवाय हा फोन थ्री जी तंत्रज्ञानानेही सज्ज आहे.
गुगलने मोटारोला कंपनी अधिगृहीत केली आहे. गुगलने मोटोरोला विकत घेतल्यानंतर दुस-यांदा मोटोरोला याच ब्रँड नावाखाली फोन लॉंच करण्यात आला आहे. हा एक बजट स्मार्टफोन आहे. याच्या 8 जीबी मेमरी असलेल्या मॉडेलची किंमत 179 डॉलर्स (जवळपास 11300 रुपये) आहे. तर 16 जीबीच्या मॉडेलसाठी 199 डॉलर्स (12600 रुपये) मोजावे लागतील. किंमत आणि फिचर्सच्या दृष्टीने हा फोन एक चांगला पर्याय सिद्ध होऊ शकतो.