मोबाइल अॅप्सवर आधारित ‘अॅपप्रेनिअर’ ही स्पर्धा व्हिजेटीआय कॉलेजच्या कॅम्पसमध्ये नुकतीच पार पडली. आपली कल्पकता वापरुन कुठलंही नवीन अँड्रॉइड अॅप बनवून त्याचा ‘बिझनेस’ करता येईल हे विद्यार्थ्यांनी यातून दाखवून द्यायचं होतं. देशभरातल्या ५४ कॉलेजांतल्या टीम्सनी या स्पर्धेत भाग घेतला. शिक्षणाशी संबंधित एकापेक्षा एक भन्नाट अॅप्सची निर्मिती करत कॉलेजिअन्सनी सगळ्यांना थक्क केलं.
पीजीतलं सबकुछ
ग्रॅज्युएशन पूर्ण झालं की पोस्ट ग्रॅज्युएशन नेमकं कशात करावं असा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना पडतो. या द्विधा मनःस्थितीतून बाहेर पडण्यासाठी उपयुक्त ठरेल असं हे एक अॅप. पोस्टग्रॅज्युएशन करु इच्छिणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ शकेल. विशेष म्हणजे आजवर अशा प्रकारचं एकही अॅप बनवलं गेलं नाहीय. विविध युनिव्हर्सिटीचे रँक्स, स्टडी मटेरिअल, शैक्षणिक कर्ज यासारख्या पीजीशी निगडीत सगळी माहिती मिळेल. तसंच इथे अॅडमिशनसंबंधीच्या सगळ्या महत्वाच्या तारखा आणि नोटिफिकेशन्सही इथे बघायला मिळतील. त्यासोबतच एखाद्या विषयाची आवड असलेले विद्यार्थी या अॅपद्वारे एकमेकांशी चॅटही करू शकतील. पीजीशी निगडीत प्रत्येक प्रश्नाचं उत्तर इथे मिळू शकेल.
अॅपचं नाव : द पीजी डायलेमा
कॉलेज टीम : याम्म व्हिजेटीआय
इंजिनीअर व्हायचंय?
‘फनजिनिअर्स’ हे एक अतिशय सोपं असं अॅप आहे. यात इंजिनीअरिंग करणाऱ्या विद्यार्थांच्या मनातल्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर मिळू शकेल. विद्यार्थ्याने प्रश्न विचारल्यावर इथलेच युजर्स आणि त्यात्या विषयातले तज्ज्ञ त्याची उत्तरं देतील. आणि त्याचं योग्य उत्तर मिळाल्यावर चटकन नोटिफीकेशन येतं. आजवर गुगल प्ले स्टोअरवर असं एकही अॅप नाहीय. यामध्ये चॅट फिचर टाकायचाही अॅप बनवणाऱ्यांचा प्रयत्न चालू आहे.
अॅपचं नाव : एन्क्वायर
कॉलेज टीम : फनजिनिअर्स
परदेशी युनिव्हर्सिटीजची माहिती
अमेरिकेतून मास्टर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे बेस्ट अॅप ठरेल. तिथल्या हव्या त्या युनिव्हर्सिटीजची सगळी माहिती शोधून त्यानुसार अॅडमिशन घेता येऊ शकेल. जीआरइ, टोफेल, एसओपी अशा सगळ्याचा स्कोअर बघून विविध निकषांच्या आधारावर या अॅपची सेफ, मॉडरेट आणि अॅम्बिशिअस अशी तीन गटांत विभागणी करण्यात आली आहे. या अॅपमध्ये परदेशातल्या विविध युनिव्हर्सिटीजबाबतचं व्यवस्थित मार्गदर्शन करण्यात येईल.
अॅपचं नाव : ग्रॅज्युएट युनिव्हर्सिटी फाईंडर
कॉलेज टीम : गेम चेंजर,
के.जे.सोमैया कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग
एमएस, एमबीएसाठी…
पोस्ट ग्रॅज्युएशनसंदर्भातली सगळी माहिती या अॅपमध्ये बघायला मिळेल. यामध्ये एमएस, एमबीए, एमई/एमटेक या कोर्समध्ये लागणाऱ्या सर्व प्रवेश परीक्षांची सर्व माहिती एकाच ठिकाणी इथे मिळू शकेल. यामध्ये एखादा शब्द अडल्यास, फेसबुकशी संलग्न असलेल्या ऑनलाइन डिक्शनरीचा पर्यायही विद्यार्थी वापरू शकतो. तसंच विरंगुळा म्हणून सुडोकू खेळाचीही सोय या अॅपमध्ये करण्यात आली आहे.
जीआरइची तयारी
जीआरइची तयारी करायची म्हटली की अनेकांना घाम फुटतो. हे अॅप अत्यंत सोप्या आणि रंजक पद्धतीने जीआरइची तयारी विद्यार्थ्यांकडून करून घेतं. एकसारखे वाटणारे शब्द आणि फ्लॅश कार्डस, विविध क्विझ गेम्स, टेस्टचे स्कोअर्स तसंच एमएसशी संबंधित सगळी माहिती यात मिळेल. तसंच विविध युनिव्हर्सिटीजसाठी अॅप्लिकेशन आणि त्यासाठी लागणाऱ्या व्हिसाची प्रोसिजरही यामध्ये व्यवस्थित समजावून सांगण्यात आली आहे.
अॅपचं नाव : जीआरइ क्लब
कॉलेज टीम : ओएमजी
संकलन – मृण्मयी नातू (Maharashtra Times)

ADVERTISEMENT