सॅमसंग मोबाइलच्या मोठ्या डिस्प्लेच्या फोनची प्रसिद्धी वाढत असल्याचे लक्षात ठेवून सहा इंच इतक्या मोठ्या स्क्रीनला सपोर्ट करतील अशा प्रकारची ओएस हवी हे लक्षात घेऊन मायक्रोसॉफ्टने विंडो फोन-८मध्ये अपडेट दिले आहेत. ही घोषणा मायक्रोसॉफ्टने नुकतीच केली असून, लवकरच हे अपडेट उपलब्ध होतील.
सहा इंचाचा डिस्प्ले असलेल्या मोबाइलच्या ऑपरेटिंग सिस्टीमसाठी उपयुक्त ठरतील असे हे अपडेट आहेत. १०८० मेगा पिक्सलचा मोठा स्टार्ट स्क्रिन आणि त्यावर अधिक टाइल्स बसतील यासाठी हे अपडेट आहेत. नोकियाचा नवीन लुमिया १५२० काही महिन्यांत लाँच होणार आहे. या मोबाइलमध्ये शक्तिशाली असा क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८०० कॉड कोअर प्रोसेसर आहे. त्याला सपोर्ट होतील असे अपडेट देणेदेखील गरजेचे होते, हे लक्षात घेऊन हे अपडेट लाँच होतील.
पाच इंच आणि त्यापेक्षा कमी आकाराच्या डिस्प्लेसाठी विंडो ८ यापूर्वीच ऑप्टिमाइज करण्यात आली आहे. पण अधिक मोठा डिस्प्ले असलेल्या सॅमसंगची नोट सीरिज अधिकाधिक प्रसिद्ध होत असल्याने मायक्रोसॉफ्टला हे अपडेट द्यावे लागले आहेत. अशाप्रकारच्या स्क्रीनच्या प्रकारात अँड्राइडला टक्कर देण्यासाठी मायक्रोसॉफ्टला हे अपडेट गरजेचे होते.
अर्थात सहा इंचापेक्षा मोठ्या स्क्रीनच्या मोबाइलसाठी मात्र कसलेही नवीन अपडेट देण्यात येणार नाहीत. विंडो ८ टॅबलेटला मोठ्या स्क्रीनचे मोबाइल स्पर्धक ठरू नयेत याची काळजी मात्र मायक्रोसॉफ्टने घेतली आहे. सहा इंचपेक्षा जास्त मोठ्या स्क्रीनच्या मोबाइलला हे अपडेट सूट होणार नसून, त्यासाठी ग्राहकांनी विंडो ८ टॅबलेटच घ्यावा असे मायक्रोसॉफ्टने सुचविले आहे.
ड्रायव्हिंग मोड हा एक महत्त्वाचा अपडेट यात आहे. ड्रायव्हिंग करताना या मोडवर फोन असेल तर स्क्रीनवर कमीत कमी माहिती दिसते. ड्रायव्हरचे लक्ष विचलित होऊ नये यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. स्क्रीन ओरिएंटेशन लॉक बटन, वाय-फाय आणि ब्लू-टूथमध्ये सुधारणा, इमेल, एसएमएससाठी कस्टमाइज रिंगटोन, स्टोरेज स्पेस मॅनेज करण्यासाठीची टूल देण्यात आले आहे. या अपडेटचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये स्क्रीन रीडर हा ऑप्शनही देण्यात आला आहे. त्याच्या सहाय्याने अंध व्यक्तींना मोबाइल हाताळणे सोपे जाणार आहे.

Hi there! I know this is somewhat off-topic however I needed
to ask. Does building a well-established blog such as yours
require a massive amount work? I am brand new to operating
a blog but I do write in my journal every day. I'd like to start a blog so I will be able to share my experience and feelings online.
Please let me know if you have any ideas or tips for new aspiring blog owners.
Thankyou!