सर्च म्हणजे गुगल आणि इंटरनेटवर व्हिडीओ पहायचा म्हणजे यू-ट्यूब असे आज समीकरण झाले आहे. पण यू-ट्यूबचे हे व्हिडीओ थेट टीव्हीच्या मोठ्या पडद्यावर पाहता आले तर ? भारतातील युजर्ससाठी लवकरच ही सुविधा उपलब्ध होणार आहे. गुगल इंडिया यासाठी भारतातील डीटीएच (डायरेक्ट टू होम) केबल कंपन्या ,टीव्ही उत्पादकांशी बोलणी करत आहे.
यू-ट्यूबवर दर महिन्याला सुमारे ६ अब्ज तासांचे व्हिडीओ पाहिले जातात. तसेच दर मिनिटाला सुमारे १०० तासांचे व्हिडीओ अपलोड केले जातात. आज यू-ट्यूब गुगलचा महत्त्वाचा उत्पन्नस्रोत आहे. २०१२ मध्ये यू-ट्युबमुळे गुगलला तब्बल ३.१ लाख कोटी रुपये उत्पन्न मिळाले. एकट्या भारतातच यू-ट्युबला दर महिन्याला साडेपाच कोटी लोक भेट देतात. २०११च्या तुलनेत हा आकडा दीड कोटींनी अधिक आहे. यात मोबाइलचा वाटा फार मोठा आहे. आता याला टीव्हीचीही जोड मिळाली तर ते यू-ट्युबसाठी आणि इंटरनेट टीव्हीसाठी फार मोठे पाऊल असेल.
टीव्ही हे आज भारतातील महत्त्वाचे मनोरंजनाचे साधन आहे. देशातील बहुसंख्य घरात टीव्ही पोहचला असून ,ट्रायच्या (टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडिया) आकडेवारीनुसार त्यातील ५.४ कोटी घरात डीटीएचचे केबल जोडणी आहे. यात डिश टीव्ही , टाटा स्काय , एअरटेल , व्हीडिओकॉन , रिलायन्स आणि सन डायरेक्ट या मुख्य कंपन्या आहेत. यू-ट्यूबने या आधीच सॅमसंग , एलजी , सोनी आधी टीव्ही कंपन्यांशी करार केले असून त्यांच्या स्मार्ट टीव्हीमध्ये साइटवरील व्हिडीओ पाहण्याची सुविधा दिली आहे.
मार्च २०१३ पर्यंतची आकडेवारी पाहिली तर भारतात सुमारे १६.४ कोटी इंटरनेट युजर्स आहेत. तसेच आठपैकी सात युजर्स फोनवर इंटरनेटचा वापर करतात. पण भारतात इंटरनेटचा वेग ही सर्वात मोठी समस्या आहे. यू-ट्युबच्या बफरिंगसाठी लागणारा वेळ कमी करणे हे गुगलसाठी मोठे आव्हान असणार आहे. भारतात थ्रीजी इंटरनेट १० टक्के लोकांपर्यंतही पोहचलेले नाही. त्यामुळे जेवढा हा वेग वाढेल तेवढ्याच लोकांच्या मागण्याही वाढतील.
या मागण्या पूर्ण करण्यासाठीच गुगलने हे पाऊल उचलले आहे. आगामी भविष्याची ही फक्त चुणूक असून आगामी काळात यू-ट्यूबप्रमाणे अन्य सेवाही थेट टीव्हीवर मिळणे अशक्य नाही. शेवटी कॉम्प्युटर असो की मोबाइल , इंटरनेटसाठी ही सारी माध्यमे आहेत. त्यामुळे तुमचा टीव्ही लवकरच इंटरनेट टीव्ही होणार , हे सांगायला कोणत्याही भविष्यवेत्त्याची गरज नाही.

Incoming search terms :
youtube soon avalable on television via dish networks with internet also
ADVERTISEMENT