पूर्वी एखाद्या गोष्टीचा संदर्भ शोधायचा झाल्यास ग्रंथालयात जाऊन विविध पुस्तके संदर्भ ग्रथांचा आधार घेतला जात होता. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील क्रांतीमुळे ग्रंथालयात जाऊन पुस्तके पाहून संदर्भ पाहण्याचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. आता पुस्तकेही ऑनलाइन उपलब्ध होऊ लागली आहेत. टॅब्लेट , स्मार्टफोनसारख्या गॅजेट्समुळे हा बदल होऊ लागला आहे. ऑनलाइन पुस्तक वाचणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पूर्वी बऱ्याच लोकांना फोन नंबर पाठ होतो. काही वेळा , फोन डायरीचा वापर होत असे ; पण ही संख्या कमी होती. डिजिटल क्रांतीमुळे मोबाइलच्या वाढलेल्या वापराने किती लोक फोन नंबर लक्षात ठेवतात , हा प्रश्नच आहे.
गुगल कंपनीने डिजिटल डेटा उपलब्ध करून देण्यात , तर क्रांतीच निर्माण केली आहे. अर्थात , सर्व संदर्भ गुगल या कंपनीने गोळा केले नसले , तरी ते एका क्लिकवर इंटरनेटवर माहिती शोधणाऱ्या यूजरला कसे उपलब्ध होऊ शकतील , याची काळजी मात्र नक्कीच घेतली आहे. ही माहिती फक्त काही देश , विषय यांच्या पुरती मर्यादित ठेवलेली नाही. सर्व माहितीची लिंक सर्चच्या आधारे मिळविता येते. संबंधित यूजरने अपेक्षित सर्चचा शब्द योग्य टाइप केलेला नसला , तरी त्याचा संदर्भ घेऊन सर्च रिझल्ट गुगल कंपनीचे सर्च इंजिन दाखविते. आता तर , टाइप करतानाचा संबंधित शब्दाशी निगडित सजेशनही त्यावर येतात. त्यामुळे त्यातून योग्य पर्याय निवडता येतो. या सर्व गोष्टी एका क्लिकच्या आधारे उपलब्ध झाल्याने नव्या पिढीला संदर्भ शोधण्यासाठी किती कष्ट , वेळ द्यावा लागतो , याची कल्पना करता येणार नाही. मात्र , या स्रोतावर अवलंबून राहण्यानेच ऐनवेळेला फजिती होऊ शकते. शनिवारी सकाळी पाच मिनिटे गुगल कंपनीतर्फे दिल्या जाणाऱ्या विविध सेवा म्हणजे जीमेल , ड्राइव्ह , मॅप आणि चॅट बंद झाल्या होत्या.
या पाच मिनिटांत इंटरनेटवरील वापरावर ४० टक्के परिणाम झाला. यावरील अॅक्टिव्हिटी ४० टक्क्यांनी कमी झाली. गुगल कंपनीच्या सेवांवर जागतिक पातळीवरील इंटरनेट यूजर किती अवलंबून आहेत , हे कळू शकते. याहू आणि मायक्रोसॉफ्ट बिंग या कंपन्याही विविध सेवा देतात. मात्र , गुगल सेवा काही मिनिटे बंद राहिल्यावर झालेला परिणाम मोठा असल्याचा हवाला एका कंपनीने दिला आहे. यावरून गुगल ही इंटरनेटवरील दादा कंपनी असल्याचे स्पष्ट होत आहे ; तसेच लोकांचा यावरील अवलंबित्व किती मोठे आहे , हेही स्पष्ट होत आहे.

ADVERTISEMENT