त्याचा चौकोनी आकार हा हाताळणीसाठी बराचसा सोयिस्कर आहे. केवळ आकार एवढेच काही याचे वैशिष्टय़ नाही, तर यामध्ये अनेक वैशिष्टय़े ठासून भरलेली आहेत. या कॅमेऱ्यासाठी कॅननने १२.१ मेगापिक्सेल सीमॉस सेन्सर वापरला आहे. शटर आणि झूम या दोन्हींसाठी त्याला स्वतंत्र सोयी देण्यात आल्या आहेत. तर एलसीडी स्क्रीन हा २.८ इंचाचा देण्यात आला आहे. शिवाय हा टचस्क्रीन असल्याने त्याच्या माध्यमातूनही कॅमेरा वापरता येतो.
या कॅमेऱ्याला ८ एक्स ऑप्टिकल झूमची सोय देण्यात आली असून, त्याला २८ मिमीची वाइड अँगल लेन्सही आहे. यावर १०८० पी क्षमतेचा फूल एचडी व्हिडीओही रेकॉर्ड करता येतो.
कॅमेऱ्यामध्येच वाय- फायची सोयही देण्यात आली आहे. त्यामुळे त्या माध्यमातून आपल्या स्मार्टफोनवर यातील फोटो टिपल्याटिपल्या शेअरही करता येतील.
भारतीय बाजारपेठेतील किंमत – रु. २०,९९५/-
मेगापिक्सेल १२.१
सेन्सर १/ २.३इंच सी मॉस
लेन्स ५.०- ४०.० मिमी. (३५ मिमी. फिल्म कॅमेऱ्याशी तुलना करता २८-२२४ मिमी.)
आयएसओ आयएसओ ८० ते आयएसओ ६४००
झूम रेषो ८ एक्स ऑप्टिकल झूम
अपर्चर एफ/३.०- एफ / ०.० (डब्लू), एफ ५.९- एफ / १८ (टी)
शटर स्पीड १-१/ २००० सेकंद
डिस्प्ले २.८ इंच, ४६१००० डॉट एलसीडी
बॅटरी एनबी-९एल
कॅमेऱ्याचा आकार ७८.६ ७ ६०.२ ७ २९.३ मिमी.
वजन १९५ ग्रॅम्स.