स्मार्ट फोनमुळे मेसेंजरपासून ते जीटॉकपर्यंत सर्व काही आपल्या हातात आले आहे. बरेच पर्याय उपलब्ध असल्यामुळे नेमके काय आणि कशा प्रकारे वापरावे, याबाबत अनेकदा गोंधळ उडतो. स्मार्ट फोनमध्ये वापरता येणाऱ्या काही बेस्ट ऑप्शन्सविषयी….
हँगआऊट
ग्रुप चॅट आणि तेही व्हिडीओवर करण्याची धम्माल आता जीमेलवर उपलब्ध होणार आहे. गुगलने नुकतीच आपल्या ग्रुप व्हिडीओ चॅटिंगची हँगआऊट सेवा भारतीय युजर्ससाठी लाँच केली आहे. यामध्ये एकाच वेळी नऊ जणांशी बोलणे शक्य होणार आहोत. ही सेवा वापरण्यासाठी केवळ जीटॉकच्या पॅनेलशेजारी असलेल्या व्हिडीओ कॅमेरावर क्लिक करायचे, यानंतर एक नवीन विंडो पॉप-अप होईल. यामध्ये गुगल प्लसमधील आपल्या फ्रेंड्सची यादी दिसेल. फ्रेंड्सच्या जीमेल आयडीवर क्लिक करून त्यांना व्हिडीओ चॅटलिस्टमध्ये अॅड करता येईल.
गुगल प्लसमध्ये नसलेल्या एखाद्या मित्राशी आपल्याला चॅट करायचे असेल, तर त्यासाठी आधी आपल्या जीमेल आयडीवरून त्याला इन्व्हिटेशन पाठवावे लागेल. हे चॅट आपण हँगआऊट या फीचरचा वापर करून सर्वांसाठी खुले करू शकतो. यासाठी युट्यूबचे अकाऊंट लागते. यानंतर ते चॅट ब्रॉडकास्ट होताना दिसेल. आपण त्या ग्रुपमध्ये करत असलेल्या विविध चर्चा आपल्या फोटोसह सर्वांना पाहवयास मिळू शकतात. एकदा हँगआऊट सुरू झाले की, आपल्या ग्रुप मेंबर्सची यादी आपल्याला स्क्रीनच्या खालच्या बाजूस दिसते, तर व्हिडीओ वरच्या बाजूस दिसतो.
जीमेलच्या विंडोच्या डाव्या बाजूला चॅट्स, स्क्रीनशेअर, गुगल ड्राइव्ह, गुगल डॉक्स, इफेक्ट्स आणि पिंग पाँग हँगआऊट असे पर्याय दिसू लागतील. चॅट आणि हँगआऊटच्या माध्यमातून मित्रांना मेसेजेसही पाठवता येणार आहेत. तर स्क्रीनशेअर या सुविधेमध्ये मित्रांशी स्क्रीनशॉट शेअर करता येणार आहेत. हे शेअर केल्यावर आपल्या ग्रुपमधील सर्व मेंबर्सना तो व्हिडीओ पाहता येणार आहेत. गुगल ड्राइव्ह आणि गुगल डॉक्स हे व्हिडीओ चॅट्समध्ये अधिक गंमत आणतील, असा विश्वास गुगलने व्यक्त केला आहे. हँगआऊटमध्ये जाऊन मज्जा-मस्ती करायची असेल तर गुगलने हँगआऊटमध्ये गेम्सचीही सुविधा दिली आहे. यामध्ये आपल्या ग्रुपमधील एखाद्याशी गेम्स खेळता येणार आहेत. याचबरोबर विविध वॉलपेपर्स, साऊंड इफेक्ट्स, फोटो आदी गोष्टी आणि आपल्या आवडीचे अॅप्सही आपण यामध्ये वापरू शकणार आहोत. भविष्यात गुगलच्या सर्व सुविधा म्हणजे कॅलेंडर, ईमेल यालाही हँगआऊट करता येणार आहे. म्हणजे एकाच वेळी आपण एखादी गोष्ट आपल्या बऱ्याच मित्रांशी शेअर करू शकतो. जीमेलच्या या सुविधेमुळे मित्रांसोबत हँगआऊटसाठी नवा पर्याय खुला झाला आहे.
अँड्रॉइड बीबीएम
टेकजगतात सध्या मोठी चर्चा आहे ती बीबीएम अँड्रॉइडवर येणार याची. एसएमएसला पर्याय म्हणून सुरू करण्यात आलेली ब्लॅकबेरी मेसेंजर ही सेवा अल्पावधीत लोकप्रिय ठरली. परंतु अँड्रॉइड मार्केटने ब्लॅकबेरीच्या ओएसला मागे टाकत बीबीएमला पर्यायी मेसेंजर सुविधा उपलब्ध करून दिल्या. यामुळे आता बीबीएमही अँड्रॉइड मार्केटमध्ये येणार आहे. आतापर्यंत ब्लॅकबेरीची ऑपरेटिंग सिस्टिम, बीबीएम यांसारख्या सुविधांचा अनुभव फक्त ब्लॅकबेरीधारकांनाच घेता येत होता. त्या जोरावर ब्लॅकबेरीने कित्येक वर्षे वर्चस्व गाजवले. पण, आता अॅपल आणि अँड्रॉइड वापरणाऱ्यांनाही बीबीएमचा मोफत लाभ घेता येणार आहे. वॉट्स अॅप किंवा अन्य मेसेंजर अॅपमध्ये नसलेला स्क्रीन शेअरिंगचा पर्याय बीबीएममध्ये उपलब्ध आहे. याशिवाय वॉट्स अॅपच्या तुलनेत बीबीएमवर आपल्याला व्हिडिओ चॅट, वॉइस चॅट या सुविधाही मिळतात.
वुई – चॅट
हे सध्या चर्चेत असलेले अॅप आहे. चीनपाठोपाठ आता भारतातही याची लोकप्रियता वाढली आहे. यामध्ये रजिस्टर करण्याची प्रक्रिया ही वॉटस अॅपसारखीच आहे. कारण यातही आपला मोबाइल नंबर एंटर करण्याची प्रक्रिया आहे. त्यानंतर एक फॉलोअप मेसेज मिळतो, ज्यात व्हेरिफिकेशन कोड असतो. आपले फेसबुक आणि इतर ईमेल अकाउंट्स या अॅपशी कनेक्ट करून अधिक व्यक्तींशी जोडणे सोपे होते. शेअरिंग पिक्चर्स, काँटॅक्ट्स, युजरचे करेक्ट लोकशन आणि व्हिडीओ चॅट ही या अॅपची अन्य आकर्षणे.
वॉट्स अॅप
एसएमएसला पर्याय म्हणून सध्या वॉट्स-अॅप चांगलेच चर्चेत आहे. ‘वॉट्स अॅप’ वर युजर्सना अनेक सुविधा मिळतात. या सुविधांचा फायदा शेअरिंगसाठी चांगल्या प्रकारे करता येतो. चॅट आणि फोटो शेअर करून ठेवण्यासाठी यामध्ये खूप पर्याय असतात. आपल्या मेसेजेचा बॅकअप घेणे, चॅटचा शॉर्टकट तयार करणे, फोटो शेअर करणे अशा विविध गोष्टींचा वापर करून उत्तम प्रकारे चॅटिंगचा अनुभव घेता येतो. यामध्ये आपला मेसेज ब्रॉडकास्टही करता येतो. यामुळे एकाच वेळी एकच मेसेज अनेकांना पाठवता येतो.

ADVERTISEMENT