सोशल नेटवर्किंगमध्ये आघाडीवर असणाऱ्या ‘ फेसबुक ‘ ने वाढत्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी अखेर ‘ हॅशटॅग ‘ ची घोषणा केली आहे. सध्या ‘ ट्विटर ‘, ‘ गुगल प्लस ‘ आणि ‘ इन्टाग्राम’ या लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साइट्सवर सध्या ‘ हॅशटॅग ‘वापरले जातात.
बुधवारपासूनच या सेवेला सुरुवात झाल्याची घोषणा ‘फेसबुक ‘ तर्फे करण्यात आली. ‘ हॅशटॅग ‘ मुळे ‘ फेसबुक ‘ च्या यूजरना ‘ फेसबुक ‘ वर सुरू असणाऱ्या एखाद्या चर्चेविषयी अथवा हॉट टॉपिकविषयी एका क्लिकवर जाणून घेता येणार आहे. # या चिन्हाचा वापर करून ही सुविधा वापरता येणार आहे. ‘ ट्विटर ‘ वर ही सुविधा लोकप्रिय असून , त्याद्वारे दिवसभरातील चर्चेचा विषय अथवा त्या विषयी माहिती मिळविता येते. आता ‘ फेसबुक ‘ यूजरनाही हॅशटॅगचा वापर करून या चर्चेत सहभागी होण्याची संधी एकाच पानावर मिळणार आहे. (उदाहरणार्थ..निवडणूक या विषयी ‘ फेसबुक ‘ पेजवर चर्चा सुरू असल्यास # ELECTION अशी पोस्ट टाकून यूजरला चर्चेत सहभागी होण्याची संधी मिळू शकते.)
‘ हॅशटॅग ‘ ची सुविधा म्हणजे ‘ यूजर फ्रेंडली इंटरफेस ‘ सुरू करण्याच्या दिशेने पुढचे पाऊल असल्याचे ‘ फेसबुक ‘ ने म्हटले आहे. लवकरच आणखी फीचर्स सादर करण्यात येणार आहेत. मात्र , त्याचा तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. बुधवारी ही सुविधा सुरू करण्यात आल्यानंतर केवळ २० टक्के यूजरना त्याचा उपयोग करता आला. उर्वरित यूजरना येत्या आठवडाभरात ही सुविधा वापरता येऊ शकेल.
‘ हॅशटॅग ‘ विषयी
‘ फेसबुक ‘ यूजरनी ‘ हॅशटॅग ‘ वापरून पोस्ट केलेली माहिती कोण पाहू शकेल , हे फिल्टरचा वापर करून ठरवता येईल. केवळ फ्रेंड्सनाच ही चर्चा वाचता येईल , असे सेटिंगही करता येणार आहे.

ADVERTISEMENT