जंगलामध्ये रस्ता हरवला, तर मदतीसाठी पूर्वी आरडाओरडा केला जायचा. माहितगार व्यक्ती होकायंत्राने दिशा शोधून मार्ग काढण्याचा प्रयत्न करायच्या . इंटरनेट क्रांतीनंतर मॅपचा आधार घेऊन दिशा शोधल्या जाऊ लागल्या . आपण नेमकेकोठे आहोत आणि कुठे जायचे आहे , याचे मार्ग मोबाईलवर दिसू लागले आणि अवघड वाटणारा प्रवास सोपा झाला . या सर्व तंत्रज्ञानाचे जनक म्हणजे गुगल , अॅपल , फेसबुकयांसारख्या कंपन्यांनी पुरवलेल्या या तंत्रज्ञानाचा वापर अक्षरशः कोट्यवधी लोक करतात.
‘ गुगल ‘ ने या मॅपसंदर्भात नुकतेच एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे . त्यामुळे मॅपिंगच्या क्षेत्रातील चेहरामोहराच बदलला जाईल . मूळचे इस्रायलचे असणारे ‘ वेझ ‘ तंत्रज्ञान खरेदी करण्याचा निर्णय गुगलने घेतला आहे . १ . ३ अब्जडॉलरचा करार गुगलने यासाठी केला आहे . गुगलच्या यूजर्सची जगभरातील संख्या पाहिली , तर ‘ वेझ ‘ हीगुगलसाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडीच ठरण्याची शक्यता आहे . यापूर्वी अब्जावधी डॉलरचा करार गुगलने तिघांबाबततच केला आहे . त्यात यू – ट्यूबचाही समावेश आहे . इस्रायलमधील भरघोस यशानंतर वेझ हे तंत्रज्ञान चार वर्षांपूर्वीच अमेरिकेत आले आहे . मोटारींना ट्रॅफिकमधून मार्ग दाखवणे , स्पीडलेन सांगणे , शॉटकट कुठेआहेत , अपघात कुठल्या रस्त्यावर झाले आहेत , धोक्याचे रस्ते कुठले आहेत , या सर्वांची कल्पना ड्रायव्हरलादेण्याचे काम ‘ वेझ ‘ करते .
मोठे करार
१५ वर्षांच्या इतिहासात गुगलने आतापर्यंत केलेल्या सर्वांत मोठ्या किमतीच्या २४० करारांपैकी ‘ वेझ ‘ चा क्रमांकचौथा लागतो . मोटोरोला मोबिलिटी – १२ . ४ अब्ज डॉलर , डबल क्लिक – ३ . २ अब्ज डॉलर आणि यू – ट्यूब- १ . ७६ अब्ज डॉलर हे तीन करार यापूर्वी केले आहेत . यू – ट्यूबसारख्या साइटचे भारतातील यश पाहता आगामी काळात वेझ तंत्रज्ञानही येथे झपाट्याने वापरले जाईल , याची खात्री वाटते .
वेझचा १९० देशांमध्ये वापर
‘ वेझ ‘ ने सांगितले आहे , की मॅपिंग तंत्रज्ञान १९० देशांमध्ये वापरले जाते . ट्रॅफिक जॅम , जॉब आणि इतरठिकाणी जाण्यासाठी सर्वांत जलद उपलब्ध रस्ता शोधण्यासाठी याचा वापर केला जातो . कंपनीचे ७० हजारसदस्य नकाशांचे संपादन करण्यावर काम करतात . नकाशांखेरीज विविध टिप्सही यामध्ये दिल्या जातात . वेझच्या आगमनाने गुगलचीही दोन वर्षांपूर्वीची ‘ प्लस ‘ नावाची सोशल नेटवर्किंग सर्व्हिस अपडेट होण्याची शक्यता आहे .
‘ गुगल ‘ चे भारतातील यूजर पाहता मॅपिंगच्या सुविधेचा येथेही मोठ्या प्रमाणावर केला जाईल . आपल्या देशातील वाहतुकीची समस्या पाहता ‘ वेझ ‘ मुळे ती दूर होईल , असे वाटत नाही ; पण दूरच्या प्रवासासाठी ,महामार्ग ठिकाणी या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर झाला , तरी नव्याने फिरणाऱ्यांच्या अनेक समस्या सुटण्यास हातभार लागेल , असे वाटते .

ADVERTISEMENT