अँड्रॉइडमधील ‘ मॅप्स ‘ मध्ये खूप नवी फीचर्स डेव्हलप केलेले आहेत. त्यातील ‘ फ्युज्ड लोकेशन प्रोव्हायडर ‘ हे एक फीचर आहे. हे फीचर आपल्या फोनमधील सगळे सेन्सर वापरते आणि आपल्याला आपली तंतोतंत लोकेशन शोधयला मदत करते. हे सगळे करण्यासाठी प्रत्येक तासाला बॅटरीमधील एक टक्क्यापेक्षाही कमी पॉवर खर्ची पडते. मॅप्समध्ये आपण किती चालतो, धावतो किंवा ड्रायव्हिंग करतो हे एका गतिरोधक मीटरचा वापर करून आपल्या यूजर्सना कळते. याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जिओफेन्सिंग फीचर्समध्ये आधुनिक बदल केले आहेत. जिओफेन्सिंग आपल्या मॅपमध्ये अचूकता आणण्यास मदत करते. या फीचर्सचा उपयोग मार्केटिंगसाठीही होऊ शकतो. बिझनेस यूजर्सना लोकल टार्गेट सेट करण्यासाठी याचा उत्तम वापर होऊ शकतो. निश्चित अंतरातून बाहेर गेल्यावर हे फीचर वायफायच्या आधारे चालते आणि व्हायब्रेटर मोडवर असते.
प्ले स्टोर
सर्वात महत्वपूर्ण बदल म्हणजे थर्ड पार्टी अॅप्स वापरायला आता फक्त एकदाच साइन इन करावे लागणार आहे. या नवीन फीचरला क्रॉस प्लॅटफॉर्म म्हणतात, ज्यात एकाच आयडीचा वापर करून इतर अॅप्समध्येही रजिस्टर करता येते. जर तुम्ही बॉक्स, नेटमध्ये साइन इन केले, तर तुम्ही तुमच्या फोनमध्ये, टॅबलेट आणि डेस्कटॉपमध्येही साइन इन होऊ शकणार आहे. या फीचरचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे. तुमचे नोटिफिकेशनही सिंक होणार आहे. म्हणजे समजा तुम्ही टॅबलेटमध्ये नोटिफिकेशन बदलले तर तुमच्या इतर जोडलेल्या डिवाइसमध्येही नोटिफिकेशनमध्ये बदल दिसेल. डेव्हलपर्ससाठी ही खूप मोठी गोष्ट आहे, की आता तुम्हाला बेटा टेस्टर्सना प्ले स्टोअरद्वारे डायरेक्ट निमंत्रण देता येणार आहे. पूर्वी बेटा टेस्टर्सना आपले अॅप्स दुसऱ्या डिव्हाइसवर लोड करायला लागायचे. प्ले स्टोअरमधील डेव्हलपर्सना आता बेटा टेस्टर्सकडून थेट फीडबॅक मिळू शकतो.
हँगआउट्स
हँगआउट्स हे गूगल चॅटला रिप्लेस करत आहे. या अॅपच्या वापरात अनुभव अद्भुत आहे. हे तुम्हाला स्मार्टफोन किंवा आयओएसमध्ये वापरता येणार आहे. टेक्स्ट चॅटच्या व्यतिरिक्त तुम्हाला व्हिडिओ चॅटसुद्धा करता येणार आहे. १० लोकांशी संवाद साधण्याची त्याला मर्यादा असून हे सगळ्या प्लॅटफॉर्म्ससाठी उपलब्ध आहे. ऑफलाइन असताना हे तुम्हाला एसमेस अॅलर्टद्वारे मेसेज पाठवत. चॅट करताना तुमचा संवाद अपुरा राहिला तर तुम्ही कधीही कुठेही आणि कुठच्याही प्लॅटफॉर्मवर तुमचा संवाद पुन्हा सुरू करू शकता.
गुगल+
आपल्या अँड्रॉइड स्मार्टफोनमधील गूगल नाऊसारखेच नवीन अॅनिमेशन आणि कार्ड्स आता आपल्या गूगल+ मध्येही दिसणार आहेत. हे गुगल+ चे नवीन वेबसाइट इंटरफेस असणार आहे. ही वेबसाइट आपल्या कंटेंटला अनेक भागांमध्ये विभाजून स्क्रीन साइज आणि रिझोल्यूशनआधारे आपोआप अॅडजस्ट करून दाखवणार आहे. हॅश टॅग हे नवीन फीचर फोटोजसाठी गुगल+ मध्ये अॅड केले आहे. गुगल+ आपल्या फोटोजचा सूक्ष्म अभ्यास करतो आणि त्याला हॅश टॅग त्यांच्या लोकेशन, मॉन्युमेंट,किंवा स्ट्रक्चरच्या हिशोबाने देतो. हॅश टॅग असलेले फोटोज किंवा पोस्टवर क्लिक केल्यावर तुम्हाला याचसारखे पोस्ट किंवा फोटोज दिसतील. फुल साइज फोटोज स्टोअर करण्यासाठी आता स्टोरेज स्पेस ५ जीबीवरून १५जीबी केली आहे. यात ऑटो हाइलाइट फीचरही आहे ज्यात शंभर फोटोजमधून सर्वात चांगले फोटो निवडले जातात.
ऑटो एन्हॅन्स या फीचरद्वारे आपल्याला वन टच इमेज करेक्शन करता येते. हे इमेज करेक्शन व्हाइट बॅलेन्स फिक्सिंग, शार्पनिंग इमेजस, रिमूव्हिंग रेड आय आणि ऑटो अॅड्जस्टिंग कलर टोन्स अशा तऱ्हेने होते.
गेमिंग
तुम्ही आता तुमचा गेम प्रोग्रेस क्लाउडवरही सेव्ह करू शकता. त्यामुळे तुम्ही कधीही आणि कुठेही तुमचा अपूर्ण गेम पुन्हा सुरू करू शकता. तेही अँड्रॉइड असो आयओएस किंवा इंटरनेट बेस्ड असो. यामध्ये तुम्हाला लीडरबोर्ड सुद्धा दिसतो. गूगल + अकाऊंटद्वारे साइन इन करून तुम्ही गूगल प्ले सर्व्हिसचा वापर करून आपल्या मित्रांशी आपल्या स्कोअर्सची तुलना करू शकता आणि त्यांना हरवल्याचा आनंद घेऊ शकता.