गुगल ग्लासबद्दल लोकांमध्ये बरीच उत्सुकता दिसत आहे. या चष्म्याची काही वैशिष्टये जाणून घेऊया…
1 एचडी स्क्रीनचा आभास : प्रोजेक्ट ग्लासचा पहिला व्हिडिओ अतिशय प्रभावी होता. तो जवळून पाहिल्यावर त्यातील बारकावे कळतात. हा चष्मा घातल्यानंतर 640 बाय 360 रिझोल्यूशनचा डिस्प्ले मिळतो. त्यामुळे आपल्याला आठ फूट लांबून 25 इंची एचडी स्क्रीन पाहिल्यासारखे वाटते.
2 वाय-फाय, जीपीएस फीचर : गुगल ग्लासमध्ये वाय-फाय आणि जीपीएस फीचर असल्याने यास स्मार्टफोन एक्सटेन्शन म्हणता येईल. मात्र यात सिम कार्डसाठी स्लॉट नाही. चष्मा फोनसोबत सिंक केल्यानंतर फोनमधील विविध डाटाचा उपयोग करता येतो.
3 आवाजाने नियंत्रण : हा चष्मा मानवी आवाजानेही नियंत्रित होतो. चष्म्याचे हे फीचर अँक्टिव्हेट करण्यासाठी फ्रेमच्या साइडवर थोपटावे लागते किंवा डोक्यावर चष्मा खालीवर करावा लागतो. या इशार्यांना चष्मा प्रतिसाद देऊ लागतो तेव्हा ‘ओके ग्लास’ असा संदेश मिळतो आणि गुगलवर सर्च, डायरेक्शन, फोटो काढणे किंवा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी कमांड देता येतात. U
4 आपण पाहाल तेच पाहील चष्मा : जे काही दृश्य आपण पाहाल तेच हा चष्मा पाहू शकेल. याद्वारे 720 पी व्हिडिओ आणि 5 एमपी फोटो काढता येतील. याच्या इंटर्नल मेमरीत 12 जीबी डाटा स्टोअर करता येईल. हँगआउटने फोटो किंवा व्हिडिओ ब्रॉडकास्ट करता येईल.
5 समजेल अनेक भाषा, कूल लूक : गुगल ग्लास फोन किंवा ब्राउझरमध्ये उपलब्ध असलेल्या परदेशी भाषांतून भाषांतर करू शकतो. तो आपल्याला शब्दांचे उच्चारण करून ऐकवेल. त्यातून शब्द समजणे सोपे होईल. हाय-फाय गुगल ग्लासचे फ्रेमलेस शेड्समध्ये रूपांतर करता येते. त्यामुळे कूल लूक मिळेल. यातील इलेक्ट्रॉनिक्स सर्किट काढून ठेवता येते.
6 बातम्यांच्या हेडलाइन चष्म्यावर : ई-मेल, मॅप्स आणि व्हिडिओ स्किल्सप्रमाणे गुगलवर अँप्स चालतील. उदाहरणार्थ न्यूयॉर्क टाइम्स अँपने त्या दिवशीच्या ताज्या बातम्यांच्या सर्व हेडलाइन डोळ्यांपुढून सरकतील. फ्रेमवर थोपटल्यास हा चष्मा त्यातील बातमी वाचूनही दाखवेल.
7 डोक्याचा वापर : बोन कंडक्शन ट्रान्सड्यूसरद्वारे गुगल ग्लास ऑडिओ आउटपुट देईल. त्याचा अर्थ असा की, संगीत ऐकण्यासाठी आणि इतर कामे करण्यासाठी हार्डवेअरबरोबरच आपला मेंदूही सहभागी असेल. काही वर्षांपूर्वी असे तंत्रज्ञान असलेले हेडफोन पॅनासॉनिक आणि शॉक्स या कंपन्यांनी तयार केले होते.

Related Keywords ;
Google Glass
new technology
smartglass
google products
ADVERTISEMENT