नव्या ऑपरेटिंग सिस्टीमचा इंटरफेस हा कंपनीने सोपा ठेवला आहे. त्यामुळे यातील अनावश्यक बार आणि बटन्स काढून टाकण्यात आली आहेत. अॅप्लिकेशनच्या आयकॉनला नवे डिझाइन देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. वेदर अॅप हे अॅनिमेटेड आहे आणि वादळी वातावरण किंवा ढगाळ वातावरण कसे दिसू शकते , याची आभासी प्रतिमा कशी दिसू शकते , याचा डेमो देण्यात आलेला आहे. त्यामुळे हे अॅप सुंदर दिसत आहे. पूर्वीचे मेसेज अॅप बंद झाले आहे. नव्या सिस्टीममध्ये याच्या रंगसंगतीतही बदल करण्यात आला आहे. त्यामुळे नवे व्हर्जन हे पूर्णपणे वेगळे जाणवत आहे. नोटिफिकेशन सेंटर हे वरील बाजूस कायम असून , आता मेल , मिस कॉल आदी नोटिफिकेशन या ठिकाणी पहायला मिळणार आहेत. यात ‘ टुडे ‘ या नव्या फीचरचा समावेश करण्यात आला असून , दिवसभरात काय करायचे आहे , याची कल्पना यातून मिळणार आहे. स्क्रीन लॉक असतानाही नोटिफिकेशनवरील माहिती पाहता येऊ शकण्याची सोय यात आहे. नवे कंट्रोल पॅनल यात असून , ते खालील बाजूस आहे आणि खालून वरील दिशेने स्लाइड करून यूजर त्याचा अॅक्सेस करू शकतो. एअरप्लेन मोड चालू बंद करणे , वाय-फाय , ब्लूटूथ , डू नॉट डिस्टर्ब , व्हॉल्यूम आदी त्यात आहे ; तसेच कंट्रोल पॅनलमधून स्क्रीनचा ब्राइटनेस निश्चित करता येतो. कॅमेरा ,कॅलक्युलेटर , फ्लॅशलाइट , टायमर आदीही अॅक्सेस करता येते.
एखादे अॅप विशिष्ट वेळेला पाहण्याची सवय असणाऱ्या यूजरला नव्या सिस्टीममध्ये विशेष सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. आपोआपच संबंधित अॅपचा फीड स्क्रीनवर येतो. कॅमेऱ्यासाठी फिलरचे फीचर यात देण्यात आले आहे. फोटोसाठी अॅप नवे देण्यात आले असून , यात फोटो वेगवेगळ्या ठिकाणी सेव्ह होण्याऐवजी वेळ ,ठिकाण यानुसार सेव्ह होणार आहे ; तसेच फोटो अल्बममध्ये स्टोअर होऊ शकणार आहे. एअरड्रॉप हे नवे फीचर समाविष्ट करण्यात येणार आहे. यामुळे व्हिडीओ , ई-मेल , फोटो आदी आयओएसवर अन्य यूजरशी शेअर करता येणार आहे. एअरड्रॉपला सपोर्ट करणाऱ्या कोणत्याही अॅपवर हे सपोर्ट करू शकणार आहे.
नव्या ऑपरेटिंग सिस्टीममधील वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे अॅपलने यामध्ये आयट्युन्स रेडिओ हे एक नवे फीचर अॅड केले आहे. आयट्युन्समध्ये यूझर्सने ऐकलेल्या आणि खरेदी केलेल्या गाण्यांच्या आधारे ही सर्व्हिस पर्सनलाइज्ड होणार आहे. येत्या काही महिन्यात अमेरिकेत जाहिरातींसह ही सेवा सुरू होणार आहे. जाहिरातींशिवाय या सुविधेचा लाभ घ्यायचा असल्यास दरवर्षी २५ डॉलर मोजावे लागतील. आयट्युन्स रेडिओमध्ये यूझर्सला विविध गाणी , कलाकारांनुसार स्टेशन्स तयार करावी लागतील. त्यानुसार युझर्स विविध गाणी या स्टेशन्समध्ये टाकून ती ऐकता येतील. पण इतर गाणी त्या स्टेशन्समध्ये कशी अॅड करायची हे अॅपलने स्पष्ट केलेले नाही. मात्र यामध्ये विशिष्ट गाण्याचे नाव टाइप करून ते ऐकण्याची सुविधा उपलब्ध नाही. गेल्याच महिन्यात गुगलने ऑल अॅक्सेस नावाची अशाच प्रकारची सेवा सुरू केली आहे. त्यासह पँडोरा , स्पॉटिफाय , रापसोडी या इतर सेवाही उपलब्ध आहेत.