अनेकवेळा ऑफिसात, सायबर कॅफेमध्ये गेल्यावर जीमेल, फेसबुकवर लॉगइन केले जाते पण लॉग आऊट करण्याचा विसर पडतो. अशावेळी कुणीतरी त्याचा गैरवापर करेल, अशी भिती सदैव वाटत असते. पण तिथे लगेच जाऊन लॉग आऊट करणे शक्य नसते. अशावेळी दुसऱ्या ठिकाणी बसूनही आपण ते लॉग आऊट करू शकतो. त्यामुळे त्याचा गैरवापर होण्याची शक्यताही संपुष्टात येते.
जीमेलच्या विंडोमध्ये उजव्या हाताच्या कोप-यात सर्वात खाली Last account activity अशी एक लिंक असते. त्याखाली दिलेल्या details वर क्लिक केल्यावर Activity on this account अशी एक नवीन विंडो ओपन होते. त्यात यापूर्वी १० वेळा कोणत्या ठिकाणी संबंधित अकाऊंट अॅक्सेस करण्यात आले होते ते ठिकाण, वेळ आणि ब्राऊझर अशी माहिती येते. सध्या कोणकोणत्या ठिकाणी हे अकाऊंट लॉग इन आहे, याचीही विस्तृत माहिती मिळते. उदा. मोबाइलवर लॉग इन असल्यास कंपनीचे नाव, मॉडेल, सॉफ्टवेअर, मोबाइल ऑपरेटर यासारखी माहिती मिळते. कम्प्युटरवरून केले असल्यास ब्राऊझर, आयपी अॅड्रेस हे देखील कळून येते. या विंडोमध्ये वरच्या बाजूला sign out all other sessions या बटनावर क्लिक केल्यावर सध्या सुरू असलेल्या ठिकाणी वगळता इतर सर्व ठिकाणी लॉग आऊट करता येते.
फेसबुकमध्येही ही सुविधा उपलब्ध आहे. फेसबुकच्या विंडोमध्ये उजव्या हाताला सेटींग्जचा टॅब असतो. त्यावर क्लिक केल्यावर नवीन पेज ओपन होते. त्यात security च्या टॅबवर क्लिक केल्यावर Active Sessions म्हणून एक पर्याय समोर येतो. त्यामध्ये सध्या कोणकोणत्या ठिकाणी तुमचे फेसबुक अकाऊंट लॉग इन आहे, याची माहिती मिळते. इतरत्र कुठे जर ते अकाऊंट लॉग इन असेल तर end activity या बटनावर क्लिक करून ते लॉग आऊट करता येईल.
अनेक वेळा काही वेबसाइटवर लॉग इन करण्यासाठी मेल आयडी द्यावा लागतो. त्यानंतर मग त्याठिकाणाहून स्पॅम मेलचा मारा सुरू होतो. त्यामुळे इनबॉक्स चेक करण्याचा कंटाळा येतो. अशावेळी बनावट इमेल आयडी हाताशी असेल तर बराच त्रास वाचतो. हा इमेल आयडी तयार करणे अगदीच सोपे काम आहे. आऊटलूक मेलमध्ये उजव्या हाताला वरच्या बाजूला सेटींग्ज ऑप्शन आहे. त्यात More mail settings > Managing your account > Your email accounts या मार्गाने गेल्यावर Create an Outlook alias हा पर्याय दिसेल. त्याठिकाणी या बनावट आयडीसाठी फोल्डर तयार होईल. या आयडीवरून तुम्हाला इमेलही पाठवता येईल. याहूमध्येही उजव्या हाताला वरच्या बाजूला असलेल्या सेटींगच्या ऑप्शनवर क्लिक केल्यावर Mail optionsनंतर Disposable addresses वर क्लिक करून base name तयार करता येते. याठिकाणीही बनावट फोल्डर तयार करून त्यात सर्व नकोसे मेल जमा होतात.

Related keywords : how to secure email or facebook accounts
ADVERTISEMENT