www.sourceforge.net– संगणक आणि इंटरनेटवर काम करणार्या व्यक्तींसाठी ही एक उपयुक्त साइट आहे. या साइटवर नियमित वापरले जाणारे अनेक सॉफ्टवेअर मोफतपणे उपलब्ध आहेत. या साइटच्या मदतीने तुम्ही फक्त सॉफ्टवेअर घेऊ शकत नाहीत, तर ओपन सोर्स साइटच्या माध्यमातून सॉफ्टवेअरमध्ये योग्य ते बदल करुन नव्या गोष्टी जोडून अधिक उपयोगी सॉफ्टवेअर बनवू शकता. बदल केलेले सॉफ्टवेअर नव्याने प्रसारित करू शकता. या साइटच्या स्टोअरमध्ये कामाशी निगडित हजारो सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत.
कामाचे किंवा आवडीचे सॉफ्टेअवर शोधण्यासाठी फक्त त्याचे नाव टाइप करावे लागते. साइटवरील सर्च विडोंज उपलब्ध साठय़ामधील अनेक सॉफ्टवेअरचे पर्याय तुमच्यासमोर ठेवतो. त्यातील योग्य तो सॉफ्टवेअर डाउनलोड करुन घ्यावा. बाजारात मोठी रक्कम मोजावी लागणारी अनेक सॉफ्टवेअर सुद्धा याठिकाणी मोफत उपलब्ध आहेत.