अॅपल , विंडोज , ब्लॅकबेरी आणि अँड्रॉइड अशा चार ऑपरेटिंग सिस्टिमची सध्या मार्केटमध्ये चांगलीच चलती आहे . विंडोज मार्केटमध्ये नवीनच असल्याने अजून त्याची म्हणावी , तशी स्पर्धा सुरू झालेली नाही . पण अॅपल आणि अँड्रॉइड या दोन ऑपरेटिंग सिस्टिममध्ये चांगलीच स्पर्धा रंगली आहे . या दोन्ही ओएसमध्ये नेमकी कोण बाजी मारतो , याकडे मार्केटचं नेहमीच लक्ष असतं . नवीन वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यात अँड्रॉइड अॅप्स सर्वाधिक डाऊनलोड झाले आहेत , अशी माहिती कॅनलिस या आयटी सर्वेक्षण संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात समोर आली आहे .
जानेवारी २०१३ ते मार्च २०१३ या कालावधीत डाऊनलोड झालेल्या अॅप्लिकेशन्सपैकी ५१ टक्के अॅप्लिकेशन्सही अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिमवर चालणारी होती . गुगल प्लेवरून ही सर्व अॅप्लिकेशन्स डाऊनलोड करण्यात आली होती . उर्वरित ४९ टक्क्यांमध्ये ब्लॅकबेरी , अॅपल आणि विंडोज या ओएसचा क्रमांक येतो .डाऊनलोडिंगमध्ये अँड्रॉइड आघाडीवर असलं तरी उत्पन्न कमविण्यामध्ये अॅपलने बाजी मारली आहे .
या तीन महिन्यांच्या कालावधीत डाऊनलोड झालेल्या अॅप्लिकेशनच्या उत्पन्नाचा विचार केल्यास त्या उत्पन्नातील ७४टक्के उत्पन्न हे अॅपलला मिळाले आहे . उर्वरित २६ टक्क्यांमध्ये ‘ गुगल प्ले ‘ चा वाटा सर्वाधिक आहे . ब्लॅकबेरीवर्ल्ड आणि विंडोज फोन स्टोअरमध्ये सर्वात कमी उत्पन्न मिळाल्याचे या सर्वेक्षणात निदर्शनास आले आहे .पहिल्या तीन महिन्यांमध्ये एकूण १३ . ४ अब्ज अॅप्लिकेशन्स डाऊनलोड झाली आहेत . यातून सुमारे २ . २ अब्ज अमेरिकन डॉलर्सचे उत्पन्न मिळाले आहे . अॅपल अॅप स्टोअर आणि गुगल प्ले यांच्यात चांगलीच स्पर्धा आहे . पण ब्लॅकबेरी वर्ल्ड आणि विंडोज फोन स्टोअर हे या दोन्ही ब्रॅण्डसच्या स्पर्धेत कुठेही तोडीस तोड येत नाहीत , असे मत कॅनलिसचे ज्येष्ठ अभ्यासक टीम शेफर्ड यांनी सांगितले . या तीन महिन्यांमध्ये सर्वाधिक अॅप्लिकेशन्स डाऊनलोड करण्यात आल्याचेही या सर्वेक्षणात म्हटले आहे . यावरून असे स्पष्ट होते की , जगभरात स्मार्टफोन वापरणा -यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे .
इंडोनेशिया , दक्षिण आफ्रिका आणि ब्राझील या देशांमध्ये सर्वाधिक अॅप्लिकेशन्स डाऊनलोड झाली आहेत . पण तेथून उत्पन्न फार कमी आले आहे . याचाच अर्थ असा आहे की येथे या भागात फ्री अॅप्लिकेशन्स सर्वाधिक डाऊनलोड करण्यात आले आहेत . भारतात स्मार्टफोन युजर्सच्या संख्येत ४२ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे या सर्वेक्षणात समोर आले आहे .

ADVERTISEMENT