आज शेकडो वाहिन्यांवर ताज्या बातम्या ऐकणाऱ्या, पाहणाऱ्या नव्या पिढीला कदाचित याची भुरळ पडणार नाही की त्याचे फारसे अप्रूप वाटणार नाही. पण बातम्या म्हणजे आकाशवाणी आणि आकाशवाणी म्हणजे खात्रीशीर व निष्पक्ष बातम्या असे समीकरणच तेव्हा तयार झाले होते. पुढे दूरदर्शन आले तरी आकाशवाणीचे महत्त्व कमी झाले नाही की दूरदर्शनला आकाशवाणीची जागा घेता आली नाही. आज अनेक मोठ मोठे उद्योगसमूह रेडिओ माध्यमात उतरले आहेत, एफएमचा तर सुकाळच झाला. तरी आजदेखील एक मोठा घटक आकाशवाणीचा चाहता आहे. याच चाहत्या वर्गासाठी आणि मोबाइलवर जगणाऱ्या नव्या पिढीसाठी आकाशवाणीने ‘एआयर न्यूज अॅप’ च्या माध्यमातून अॅप्सच्या दुनियेत प्रवेश केला आहे. त्यामुळे केवळ रेडिओवरून ठराविक वेळी ऐकल्या जाणाऱ्या बातम्या आता तुमच्या सोयीनुसार केव्हाही आणि कोठेही मोबाइलवरून ऐकण्याची सोय त्यामुळे झाली आहे.
मागच्याच आठवडय़ात आकाशवाणीने हे अनोखे एआयआर न्यूज अॅप सुरू केले आहे. वापरण्यासाठी अतिशय साधे सोपे आणि तांत्रिकदृष्टय़ा उत्तम असे हे अॅप आहे. या अॅपच्या आधारे आपण आकाशवाणीवरील इंग्लिश व िहदीबरोबरच तब्बल ३० भारतीय भाषांमधील बातम्या ऐकू आणि वाचू शकता. स्थानिक, राज्य, देशपातळीवरील आणि आंतरराष्ट्रीय असे बातम्यांचे व्यवस्थित वर्गीकरण या अॅपवर केले असल्यामुळे आपणास हवा तो पर्याय निवडणे सोपे जाते. या अॅपवर भाषेची तसेच बातम्यांची निवड करण्याची पद्धत देखील अतिशय सोपी आहे. आकाशवाणी हे जरी श्राव्य माध्यम असले तरी, तुम्हाला बातम्या फक्त वाचायच्या असतील तर ती सुविधा देखील या अॅपवर उपलब्ध आहे. कामाच्या घाई गडबडीत तुमचा एखादा आवडता कार्यक्रम चुकला तर आता काळजी करायचे कारण नाही. कारण या अॅपवर जुने कार्यक्रम ऐकायची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. चेंज ब्रॉडकास्ट या मेनूवर दैनंदिन, साप्ताहिक आणि विशेष कार्यक्रम आपणास कधीही निवडता येतात. त्यामुळे आपल्या सोयीनुसार बातम्या, कार्यक्रम ऐकणे सहज शक्य झाले आहे. हे अॅप नुकतेच सुरू झाले असल्यामुळे सध्या तरी मागील दोन आठवडय़ांचे कार्यक्रम यावर उपलब्ध आहेत. ध्वनी स्पष्टता हे या अॅपचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणावे लागेल. तसेच हे अॅप कार्यरत असताना तुम्ही मोबाईलवर दुसरे कामदेखील आरामात करू शकता. पण या अॅपवरून बातमी अथवा कार्यक्रम ऐकताना तो पॉज करायची, फॉरवर्ड अथवा रीवाईंड करायची सुविधा यात दिलेली नाही. त्यामुळे एकदा बातम्या चालू केल्या की त्या पूर्ण ऐकूनच थांबावे लागते. असे असले तरी आजच्या मोबाइल युगात अॅप्सच्या माध्यमातून आकाशवाणीने केलेला हा प्रवेश निश्चितच उल्लेखनीय आणि स्वागतार्ह असा आहे. नव्या तंत्रामुळे नव्या पिढीला आकाशवाणीची ओळख तर होईलच पण जुन्या पिढीतील (जे आज सहजपणे स्मार्ट फोन वापरतात) मंडळींना त्यांच्या लाडक्या आकाशवाणीचा नव्या स्वरूपात आनंद घेता येईल.
>>>>>>>>>>>>>>> www.allindiaradio.gov.in <<<<<<<<<<<<<<<<<<<<
या वेबसाईटवरून हे अॅप मोफत डाऊनलोड करता येते. सध्या तरी हे अॅप अँड्रॉइड प्रणालीवर आधारित मोबाइलवर व टॅबलेटवर वापरता येते. हे अॅप वापरताना मोबाइलवर इंटरनेट सुविधा असणे अनिवार्य आहे.
Tech इट