अॅपलच्या ‘आयफोन ५’ला टक्कर देण्यासाठी आणि जागतिक स्मार्टफोनची बाजारपेठ काबीज करण्यासाठी आघाडीच्या स्मार्टफोनमेकर ‘सॅमसंग’ने गुरुवारी ‘सॅमसंग गॅलक्सी एस फोर’हा नवा अँड्रॉइड फोन न्यूयॉर्कमध्ये लाँच केला. अँड्रॉइडची सुधारीत आवृत्ती असलेल्या या मोबाइलने अवघ्या चार सेकंदात ४०० फोटो काढता येणार आहेत.
हा स्मार्टफोन बाजारात सध्या उपलब्ध असणाऱ्या अॅपल आयफोन, एचटीसी वन, नोकिया ल्युमिया ९२०, सोनी एक्स्पेरिया झेड आणि अन्य हाय एंड स्मार्टफोनशी स्पर्धा करेल, असा विश्वास कंपनीला आहे. मात्र, या नेक्स्ट जेन स्मार्टफोनची किंमत किती असेल, या विषयी कंपनीने मौन बाळगले आहे. ‘बाजारातील नवीनतम तंत्रज्ञान आणि संकल्पना यांचे अनोखे मिश्रण असलेला हा स्मार्टफोन आहे. भविष्यात विकसित होणारे नवे तंत्रज्ञान पाहता या फोनमध्ये अत्याधुनिक फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे,’ अशी माहिती ‘सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स’चे जे. के. शिन यांनी दिली.
साधारणतः एप्रिल महिन्याच्या अखेरीस हा फोन भारतीय बाजारपेठेत दर्शन देईल, असा जाणकारांचा होरा आहे. या मोबाइलची किंमत सांगण्यास कंपनीतर्फे नकार देण्यात आला असला, तरी भारतात या फोनची किंमत ४० हजार रुपये असेल अशी शक्यता आहे. १६, ३२ आणि ६४ जीबी या तीन प्रकारांमध्ये ‘सॅमसंग गॅलक्सी एस फोर’ उपलब्ध होणार आहे. केवळ १३० ग्रॅम वजन असलेल्या या स्मार्टफोनची बॅटरी २६०० मिलीअॅम्पिअर तास (mAh) असणार आहे.अतिशय खास फिचर्सनी हा स्मार्टफोन सज्ज आहे. यामध्ये 13 मेगापिक्सेल कॅमेरा असून अवघ्या 4 सेकंदात 100 छायाचित्रे घेण्याची जबरदस्त क्षमता आहे. याशिवाय रिअल टाईम ट्रांसलेटर एस-4 मध्ये आहे. त्याद्वारे भाषांतर सहज शक्य आहे.एस-4मध्ये 2600 एमएएच क्षमतेची बॅटरी दिलेली आहे. तसेच त्यात इन्फ्रारेड जेस्चर आणि तापमापक सेंसरही आहे. यामुळे वेगवेगळ्या तापमानात फोन ऍडजस्ट होईल.एस-4ला फाईल्स स्टोर करण्यासाठी एका पर्सनल सर्व्हरप्रमाणे वापरता येऊ शकते. या फिचरमुळे 8 जण एकाचवेळी वापर करु शकतात.
वैशिष्टे
> १३ मेगापिक्सलचा बॅक कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा
> अवघ्या ४ सेकंदात या हॅण्डसेटमधून तब्बल १०० छायाचित्रे काढली जाऊ शकतात.
> एस४ रियल टाइम ट्रान्सलेटरच्या माध्यमातून हॅण्डसेटमध्ये भाषांतराची सोय.
> आंतरराष्ट्रीय भाषांचे भाषांतर करणे शक्य.
> आय ट्रॅकिंग फिचरमुळे कॅमऱ्यावरून आपले लक्ष हटल्यास आपोआप हा कॅमेरा बंद होईल. पुन्हा

कॅमेऱ्याकडे लक्ष गेल्यास कॅमेरा सुरू होईल. व्हिडिओ बघतानाही आपले लक्ष दुसरीकडे गेल्यास आपोआप व्हिडिओ पॉझ होईल.
> ग्रुप प्लेमुळे सॅमसंगच्या इतर हॅण्डसेटमध्ये एकच गाणे एकाचवेळी वाजवले जाऊ शकते.
> ग्लोव्हज घालूनही या हॅण्डसेटमधील टचस्क्रिन वापरता येईल.
> १६, ३२ आणि ६४ जीबीच्या इंटर्नल मेमरीचे पर्याय यामध्ये देण्यात आले आहेत.
> १०८० पिक्सलची हाय डेफिनेशनची स्क्रिन
> ८ कोअर प्रोसेसर
ADVERTISEMENT