यात विंडोज 8 ,स्मार्ट जॅकेट आणि कनेक्टिव्हिटीच्या अनेक सुविधा उपलब्ध आहेत.एचपीच्या ‘अॅलिएट पॅड’ची किंमत 43,500 हजार रूपये आहे. त्याचे वजन 0.63 किलो आणि जाडी 9.2 मिमी आहे.स्मार्टफोन आणि टॅब्लेट कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरु झाली आहे. गॅझेट जगतात दिवसागणिक स्मार्टफोन आणि टॅब्लेट बाजारात दाखल होत आहे. ‘एचपी’ (हॅवलेट पॅकार्ड) कंपनीनेही आता या स्पर्धेत उडी घेतली आहे. ‘अॅलिएट पॅड’ नामक टॅब नुकताच बाजारात सादर करण्यात आला आहे. बिजनेस क्लास व सरकारी वर्गासाठी हा टॅब फायदेशीर ठरणार आहे.’अॅलिएट पॅड’ बॅटरी खूप पॉवरफूल आहे. बॅटरी आठ तासापर्यंत सपोर्ट करते ;पण एक्सपांडेड बॅटरी 19 तासापर्यंत ही चालू शकते.