सौर ऊर्जेवर चालणार्या बोन्साय झाडाची निर्मिती एका फ्रेंच डिझायनरने केली असून हे झाड कॉफी टेबलची केवळ शोभाच वाढवत नाही तर तुमच्या मोबाईलला चार्ज देखील करू शकते. डिझायनर व्हिव्हिएन मुलर यांनी अशा प्रकारचे सिलिकॉनपासून झाड तयार केले आहे. द इलेक्ट्री प्लस असे त्याला नाव देण्यात आले आहे.
खरी झाडे पाहून आपण हे उत्पादन तयार केले आहे. याची पाने अगदी नैसर्गिक झाडांप्रमाणेच भासतात. हे झाड आयपॅड, फोनला चार्ज करू शकते. या उत्पादनाची किंमत सुमारे 24 हजार 500 रुपये असेल.
ADVERTISEMENT