गेम्स , अॅप्स , या गोष्टी बघून पूर्वी स्मार्ट फोनची निवड व्हायची. मात्र आता हीच निवड ‘ ऑपरेटिंग सिस्टिम ‘ वरून केली जाऊ लागलीय. यामुळे सध्या स्मार्टफोनच्या मार्केटमध्ये तुंबळ युद्ध रंगलं आहे ते ‘ ऑपरेटिंग सिस्टिम्स ‘ चं. यामध्ये अॅपल , गुगल आणि मायक्रोसॉफ्ट या कंपन्यांमध्ये जोरदार स्पर्धा बघायला मिळतेय. या कंपन्यांच्या ऑपरेटिंग सिस्टिम्सविषयी…
फुलप्रूफ अॅपल
अॅपलच्या आयओएस६ यामध्ये २०० पेक्षा जास्त नवीन फिचर्स असून ही अॅपलची आतापर्यंतची सर्वात प्रगत ओएस आहे. याआधी अॅपल ‘ मॅप्स ‘ साठी ‘ गुगल ‘ वर अवलंबून होते. परंतु आयओएस६साठी अॅपलने स्वतःचे मॅप्स डिझाइन केले आहेत. टर्न बाय टर्न नेविगेशन , रिअल टाइम ट्रॅफिक , फ्लायओव्हर ही अॅपल मॅप्सची वैशिष्ट्यं. यामध्ये तुम्ही ओडी व्ह्यू असलेले नेव्हिगेशन आणि हाय रिझोल्युशन मॅप्सचा अनुभव घेऊ शकता. टर्न बाय टर्न टर्न नेविगेशनच्या सहाय्याने तुमच्या फोनची स्क्रीन लॉक असतानासुद्धा प्रत्येक वळणावर कॅमेरा अँगल्स बदलत राहतात. रिअल टाइम ट्रॅफिकमुळे तुम्हाला ज्या मार्गाने जायचं आहे. त्यावर त्यावेळी किती ट्रॅफिक आहे याची माहितीसुद्धा तुम्हाला मिळू शकते. तसंच या मॅप्समध्ये देण्यात आलेल्या ‘ सिरी ‘ या सुविधेमुळे आपल्या फोनला आपण केवळ कुठं जायचं ते सांगायचं मग आपल्याला सर्व रस्ते , फ्लायओव्हर आदी माहिती काही क्षणात उपलब्ध होऊ शकते.
अॅपल सिरीविषयी बऱ्याच तक्रारी होत्या. पण ‘ आयओएस६ ‘ मधल्या ‘ सिरी ‘ तुमच्या सगळ्या कमांड ऐकतो. ‘आयओएस ६ ‘ मध्ये सिटीमध्ये अधिक भाषा उपलब्ध करून दिल्या आहेत. तसंच सिटी अधिक प्रभावीपणे कार्यरत आहे. या ओएसमध्ये सिटीद्वारे तुम्ही मेसेजेस पाठवू शकता. मीटिंगचं शेड्यूल तयार करून ठेवू शकता. स्पोर्टस ,फिल्म्स , रेस्तराँ इत्यादीची माहिती ‘ सिरी ‘ ला विचारू शकता. अॅपल ‘ आयओएस६ ‘ मध्ये सिरीद्वारे तुम्हाला हवामानाचीसुद्धा माहिती मिळू शकते. ‘ आयओएस ६ ‘ मध्ये ‘ सिरी ‘ तुमचं अॅप्ससुद्धा ओपन करू शकतो. मेसेजेस ,इमेल्सचा रिप्लाय तुम्ही सिरीद्वारे करू शकता. स्पेशल नेटवर्किंगमध्येही ‘ सिरी ‘ तुम्हाला मदत करेल. ‘ सिरी ‘ द्वारे आता तुम्ही फेसबुकवर स्टेटस अपडेट करणं तसंच ट्विटही करू शकता.
तुम्ही ड्रायव्हिंग करत असताना हा फोन एकाद्या मित्राप्रमाणे तुमचं काम करू लागतो. तुमचे कॉल घेणं , मेसेजेस ,इमेल , नोटिफिकेशन वाचून दाखवणं हे सर्वच सिरी करू शकतो. यामध्ये मॅपवर एखाद्या लोकेशनवर क्लिक केलं तर त्याचं रेटिंग्ज , रिव्हयूजच्या संबंधित फोटोज , वेबसाइटस तिथला काँटॅक्ट नंबर , पत्ता अशा सर्वच गोष्टींची माहिती तुम्हाला मिळू शकते. या ओएसमध्ये तुमचे सगळे फेसबुक इव्हेंटस आणि फेसबुक काँटॅक्टस तुमच्या डिव्हाइसवर स्टोर होतात. ‘ आयओएस६ ‘ मध्ये ‘ फेसटाईम ‘ या अॅपलद्वारे तुम्ही मोबाईल नेटवर्कच्या सहाय्याने फेस टू फेस संवाद साधू शकता. अॅपल ‘ आयओएस६ ‘ मधल्या फोन अॅपमुळे तुम्ही तुमचे कॉल्स कंट्रोल करू शकता. एखाद्या व्यक्तीला मेसेजद्वारे रिप्लाय देऊ शकता किंवा द्यायचा नसेल तर ‘ रिमाईंड मी लेटर ‘ हा पर्यायसुद्धा उपपलब्ध आहे. या ओएसमध्ये प्रायव्हसी सेटिंगसुद्धा प्रगत केलेली आहे. ठराविक वेळेत तुम्हाला कोणाचाच कॉल रिसिव्ह करायचा नसेल तर ‘ डू नॉट डिस्टर्ब ‘ हा ऑप्शन वापरून तुम्ही तेसुद्धा करू शकता. अॅपलचं वैशिष्ट्य असलेला ‘ सफारी ‘ ब्राऊझर तुम्ही यामध्ये अधिक चांगल्या प्रकारे अनुभवू शकता.
‘ आयओएस६ ‘ मधल्या ‘ फाईंड माय आयफोन ‘ या अॅपद्वारे तुम्ही तुमचा हरवलेला आयफोन शोधू शकता. फाइंड माय फ्रेन्डस या अॅपद्वारे तुम्ही तुमच्या फॅमिली आणि फ्रेंडस सोबत तुमचं लोकेशन शेअर करू शकता. आयओएस ६ असलेले डिव्हाइस इतर अॅपल डिव्हायसेसच्या तुलनेत अधिक जलद आहेत.
गुगलची जेलीबीन
मोबाइल ओएसमध्ये सर्वाधिक वापरली जाणारी प्रसिद्ध ओएस म्हणजे ‘ गुगल अँड्रॉइड जेलीबीन ‘. हे आतापर्यंतच्या अँड्राईड वर्जन्सपैकी सर्वात जलद सुधारित अणि प्रगत वर्जन. जेलीबीनमध्ये तुम्हाला अधिक चांगला टच रिस्पॉन्स अनुभवता येईल. नोटिफिकेशन्ससाठी अँड्रॉईड पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. अँर्ड्राइड ४.१ मध्ये नोटिफिकशन मधूनच तुम्हाला बरंच काही करता येऊ शकतं. जेलीबीनमध्ये नोटिफिकेशन बारमध्येच व्हॉइस मेसेजेसचेसुद्धा नोटिफिकेशन्स येतात. यामध्ये नोटिफिकेशनमध्येच पूर्ण एसएमएस वाचण्याची आणि एसएमएस पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे. जेलीबीनमध्ये कस्टमायझेशन आणि पर्सलनलायझेशन तुम्ही अधिक प्रगत प्रकारे अनुभवू शकता. यामध्ये तुम्हाला फोटो पाहण्यासाठी आणि शेअर करण्यासाठी फिल्मस्ट्रिप मोड हा पर्याय उपलब्ध आहे.
आईस्क्रीम सँडविचच्या तुलनेत जेलीबीनमध्ये फेस अनलॉक तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे अनुभवता येईल. जेलीबीनमध्ये गुगलने १८ नवीन भाषा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामध्ये हिंदी , कन्नड , तेलगु , मल्याळम या काही भारतीय भाषांचासुद्धा समावेश आहे. यामध्ये की बोर्ड इनपुट सिलेक्शनमध्येसुद्धा अधिक पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये सुधारित डिक्शनरी वॉइस टाइपिंग टेक्स्ट टू स्वीप इ. चा अनुभव तुम्ही घेऊ शकता.नवीन ‘ गुगल सर्च ‘ हे जेलीबीनचं अजून एक वैशिष्ट्य. यामध्ये एखादी गोष्ट सर्च केली असता गुगल तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती देईल. या वर्जनमध्ये वॉइस सर्चशी क्वालिटी सुधारीत आहे. यामध्ये कॅलेंडरमध्ये तुम्ही दिवसाचे सर्व इव्हेंटस स्टोअर करून ठेवू शकता. तसेच अपकमिंग इव्हेंटसचा रिमाईंडरसुद्धा ठेवू शकता जेलीबीनमध्ये ‘ अँड्रॉइड बीन ‘ हे फिचर बीन असलेले दोन डिव्हाइस एकावर एक ठेवून तुम्ही सहजपणे फोटोज , व्हिडिओ अॅपल्स कंटेन्टस वेब पेजेस शेअर करू शकता. अंध व्यक्तींनासुद्धा फोन वापरता यावा यासाठी अँड्रॉइडच्या या वर्जनमध्ये गेस्चर मोड आहे. यामध्ये कॉल लॉग डायल पॅड अधिक रिस्पॉन्सिव्ह आहे. जेलीबीनमध्ये तुम्ही कॉल लॉग्समधले नंबर रोड ओन्ली काँटॅक्टसवरसुद्धा सेव्ह करू शकता. अँड्रॉइडच्या या वर्जनमध्ये गुगल अकाऊंट सेटिंग्जमधून गुगल प्रायव्हसी सेटिंग अॅक्सेस करू शकता. जेलीबीनमधील पीपल अॅपद्वारे हायरिझोल्युशन फोटो गुगल काँटॅक्टसाठी गुगल+द्वारे स्टोअर करता येतात. तसंच या अॅपमुळे तुम्हाला तुमचे काँटॅक्टससुद्धा ऑर्गनाइज करता येऊ शकतात. तुमच्या फेव्हरेट काँटॅक्टसपैकी हवे ते काँटॅक्टस लॉग स्क्रीनवर अॅड करू शकता. या ओएसमध्ये स्क्रीन शॉट घेतल्यानंतर त्याचा प्रिव्ह्यू तुम्ही नोटिफिकेशन्समध्ये पाहू शकता आणि तिथून शेअरदेखील करू शकता. अँड्रॉईड जेलीबीनमध्ये पॉवर ऑफ बटन लॉग प्रेस करून ठेवलं तर तुम्हाला रिस्टार्ट आणि सेफ मोडमध्ये ओपन करण्याचा पर्यायही उपलब्ध आहेत. या व्हर्जनमध्ये तुमचं नेट कनेक्शन बंद असतानासुद्धा तुम्ही व्हॉइस टायपिंग करू शकता. जेलीबीनमध्ये ‘ गुगल नव्ह ‘ या अॅपद्वारे गुगल तुम्हाला योग्य वेळी योग्य माहिती पुरवू शकतो. हवामान , बस , ट्रेन, चलन , स्पोर्टस , ट्रॅफिक या सर्व गोष्टींचे लाईव्ह अपडेटस तुम्ही पाहू शकता. जेलीबीनमध्ये ‘ गुगल मॅप्स ‘ सुद्धा सुधारित आहेत. डेटा कनेक्शन नसतानाही ऑफलाईन मोडवर तुम्ही मॅच अॅक्सेस करू शकता. यामध्ये कंपास मोड, अधिक चांगला स्ट्रीट व्ह्यू , डायरेक्शन या सुविधा ही उपलब्ध आहेत. गुगल प्लेसोबतच यामध्ये गुगल प्ले म्युझिक , गुगल प्ले बुक , गुगल प्ले मूव्हीज अँड टीव्ही शोज हे अॅप्ससुद्धा उपलब्ध आहेत. गुगल प्ले मूव्हीज आणि टीव्ही शोजद्वारे तुम्ही आवडते टीव्ही शोज आणि मूव्हीज डाऊनलोड करून पाहू शकता. गुगलचे जीमेल , युट्यूब ,गुगल असे इनचिल्ट अॅप्स तुम्हाला जेलीबीनमध्ये अधिक जलद अति सहजपणे अनुभवता येतील. याद्वारे गुगल क्रीमसुद्धा उलपलब्ध करून देण्यात आलं आहे. ज्यामुळे वेबपेजेस अधिक जलद ओपन होण्यास मदत होईल. अँड्रॉइड ४.१ (जेलीबीन) काही अँड्रॉइड डिव्हायसेसमध्ये इनबिल्ट आहे. सॅमसंग , सोनी , एचटीसी यांनी आपल्या काही फोन्ससाठी ‘ जेलीबीन ‘ अपडेट उपलब्ध करून दिलं जाईल असं सांगितलंय. काही अँड्रॉइड फोन्स असेही आहेत. ज्यांना जेलीबीन अपडेट अद्याप उपलब्ध नाही. परंतु लवकरच ते उपलब्ध होईल. अॅपलच्या ‘ आयओएस ६ ‘ या टक्कर देण्यासाठी गुगलने अनेक नवनवीन फिचर्स ‘ जेलीबीन ‘ मध्ये उपलब्ध करून दिली आहेत. परंतु आयओएस ६च्या ‘ सिरी ‘ या अॅपसारखे अॅप अजूनपर्यंत अँड्रॉईडमध्ये नाही. आयरिस , असिस्टंट यासारखे काही अॅप्स अँड्रॉइड युजर्सना गुगलने उपलब्ध करून दिली आहेत. परंतु याच्या तुलनेत ‘ आयओएस६ ‘ मधलं ‘ सिरी ‘ खूप वरचढ आहे.