१९७१ ः QWERTYUIOP हा जगातील पहिला ई-मेल. अमेरिकेतील प्रोग्रामर रेमंड टोमलिसन याने पाठविलेला हा पहिला नेटवर्क ई-मेल. रेमंड हा असा पहिला व्यक्ती होता की , ज्याने आपल्या कम्प्युटरचा मेलबॉक्स @ चिन्ह वापरून कनेक्ट केला.
१९७७ ः रेमंड यांची ई-मेलची पद्धत वापरण्यासाठी ई-मेल पाठवणा-याच्या आणि ई-मेल स्वीकारण्याच्या दोघांच्याही कम्प्युटरमध्ये एक विशिष्ट प्रकारचे सॉफ्टवेअर असण्याची गरज होती. त्याकाळात ‘ डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स अॅडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी नेटवर्क ‘ ( एआरपीए) याचा वापर होत होता. यामुळे रमेंडच्या ई-मेल प्रणालीचा फारसा उपयोग होत नव्हता.
१९८१ ः नेटवर्कमध्ये अक्षरे , सिम्बॉल्स आणि स्पेशल कॅरॅक्टर्सचा वापर करता यावा यासाठी अमेरिकन स्टॅर्ण्डड कोड फॉर इन्फॉरमेशन इंटरचेंजचा वापर करण्यात आला.
१९८५ ः या कालावधीत अमेरिकेन सरकार , सुरक्षा जवान , विद्यार्थी आणि प्राध्यापक यांना प्रत्येकी एक ई-मेल आयडी देण्यात आला.
१९९१ ः इंटरनेट सिक्युरिटी प्रोटोकॉल्सने (आयएसपी) इंटरनेटच्या वापराच्या कक्षा रूंदावण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यालाही खूप मर्यादा होत्या. अखेर टीम बेरनर्स ली यांनी वर्ल्ड वाइड वेब ही संकल्पना मांडली आणि इंटरनेटचा कायापाटल झाला.
१९९१ ः अंतराळवीर शॅनन लुसिड आणि जेम्स अॅडम्सन याने अंतराळातून स्टीव जॉब्ज यांनी तयार केलेल्या मॅकिन्टोश या मशीनवर ‘ हॅलो अर्थ , ग्रीटींग्ज फ्रॉम एसटीएस-४३ क्रू. हा अंतराळातून आलेला अॅपल लिंकवरचा पहिला मेसेज आहे. हॅविंग ग्रेट टाइम. ‘ असा ई-मेल पाठवला.
१९९३ ः फोन , कॅल्क्युलेटर , फॅक्स , ई-मेल आणि पेजर असं एकाच यंत्रात वापरता येणारे अनोखे गॅजेट आयडीएम आणि बेल साऊथ यांनी तयार केले.
१९९७ ः मायक्रोसॉफ्टने जगातील पहिली-वहिली ई-मेल सेवा हॉटमेल ४०० दशलक्ष डॉलर्सला विकत घेतली.
१९९८ ः इंटरनेटचा याचबरोबर ई-मेला वापर सुरू झाला. मात्र त्यात वापरण्यात आलेल्या शब्दांना भाषेच्या दृष्टीने कोणतेही महत्त्व नव्हते. अखेर ऑक्सफोर्ड डिक्शनरीमध्ये ‘ स्पॅम ‘ हा शब्द दाखल झाला आणि या शब्दांना रोजच्या जीवनात महत्त्व प्राप्त होऊ लागले.
२००३ ः रिसर्च इन मोशन या कंपनीने ८५० आणि ८५७ हे दोन ब्लॅकबेरीचे फोन बाजारात आणले. यातून पहिल्यांना मोबाइलवर ई-मेल वापरण्याची सुविधा उपलब्ध झाली.
२००४ ः अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी पॉर्नोग्राफी आणि मार्केटिंग कायदा मंजूर केला. मात्र या कायद्यात दोषींवर कारवाई करण्याची कोणतीही तरतूद नव्हती.
२०१२ ः जगभर ई-मेल वापरणा-यांची संख्या ही तीन अब्ज इतकी आहे. दिवसाला २९४ अब्ज ई-मेल्स पाठविले जातात. यातील ७८ टक्के मेल्स हे स्पॅम असतात.