इंटरनेटचे दर आवाक्यात आल्याने आणि स्पर्धेमुळेमोबाइलच्या , विशेषतः फीचर फोनच्या किमती कमी झाल्याआहेत . त्यामुळे अनेक तरुणांच्या हातात अशा प्रकारचे फोन दिसू लागले आहेत . साहजिकच एवढा मोठा ग्राहकवर्ग कशाला हातातून सोडायचा ?
नफा थोडा कमी झाला , तरी चालेल . मात्र , दीर्घकालीन ग्राहक मिळतील या हेतूने कंपन्यांनीदेखील स्वस्तातइंटरनेट प्लॅन उपलब्ध करून दिले आहेत . सोशल नेटवर्किंगचा वापर हा आता नेटवर्किंगपुरता राहिलेला नाही .विशेषतः तरुणांमध्ये अशा साइटची ‘ क्रेझ ‘ वाढली आहे . काही प्रमाणात वरिष्ठही त्यातून सुटलेले नाहीत . त्यामुळेएखादी गोष्ट शेअर झाल्याने पंचाईत होईल का , याचीही फारशी काळजी घेतली जात नाही . आयुष्यात घडेल तीगोष्ट ( अपवाद ) मग ती खासगी असो किंवा सार्वजनिक स्वरूपाची ; ती शेअर करण्याची हौस वाढत चालली आहे .त्यावरील अनेक कॉमेंटही अंगाशी येण्याची शक्यता नाकारली जात नसतानाही ‘ क्रेझी किया रे ‘ असेच काहीसेसोशल नेटवर्किंगबाबत झालेले आहे . आज बायकोने अमूक एक भाजी केली होती , असेच सोशल नेटवर्किंगसाइटवर शेअर झाले होते . अर्थात , त्याला सर्वच पातळीवरून कॉमटेंरूपी फोडणीचा तडका मिळाला . अखेरपंचाईत झाली . सोशल नेटवर्किंगवरून कोणती गोष्ट शेअर करावी याचे भान हरपून जात असल्याचे यातून पुढे येतआहे .
ब्रिटनमध्ये सोशल नेटवर्किंगवरून शेअर केल्या जाणाऱ्या गोष्टींबाबत पाहणी करण्यात आली . सोशल नेटवर्किंगसाइटवरून शेअर होणारे फोटो हा तरुणांच्या काळजीचा विषय बनला आहे . त्यांनी याबाबत मोठी चिंता व्यक्तकेली आहे . आपले अनाकर्षक फोटो अपलोड होणार नाहीत ना , हीच काळजी त्यांना अधिक लागली आहे . एकाताज्या पाहणीनुसार दहापैकी चार तरुणांना याबाबत भीती वाटत आहे . स्वतःचे अनाकर्षक फोटो आपले मित्रअपलोड , तर करणार नाहीत ना याची काळजी महिलांमध्ये सर्वाधिक आहे . ब्रिटनमध्ये फेसबुकचा वापर सरासरीएक तास वीस मिनिटे केला जातो . मात्र , त्यापेकी दहा टक्के जणांचा वापर हा दिवसाला आठ तासांहून अधिक आहे. एकाच ड्रेसमधील फोटो दोन वेळा प्रसिद्ध झाल्यास अॅपिअरन्सवर परिणाम होण्याची भीती २५ टक्क्यांहूनअधिक जणांना वाटत आहे ; तसेच एखाद्या कार्यक्रमाचे निमंत्रण नसल्यास मित्र सोशल नेटवर्किंग साइटवरत्याबद्दल चर्चा करत असल्यास नैराश्य येते , वा आपण लोकप्रिय नसल्याची खंत वाटते . सोशल नेटवर्किंगमुळे नवीपिढी चिकित्सक होत चालली आहे , असे मानसोपचारतज्ज्ञ ग्राहम जोन्स यांनी नमूद केले आहे . त्यामुळेतरुणांमध्ये वाढलेल्या या सोशोमेनियाचे प्रमाण कमी व्हायला हवे .