कागद पेनाचा वापर कधी संपणार, असा प्रश्न कुणी विचारला तर त्याचं उत्तर कदाचित नाही देता येणार. कारण कागद पेन हे आज आपण ज्या फॉर्ममध्ये वापरतो ते कदाचित कालबाह्य होईल. सॅमसंगने गॅलक्सी नोटद्वारे त्याचीच प्रचिती दिली होती. नोट-१ ला मिळालेला प्रतिसाद पाहून आता सॅमसंगने नोट-२ बाजारात दाखल केला आहे. गॅलक्सी नोट कॅटेगरीमधील नोट-२ कल्पनाशक्तीला वाव देणारा स्मार्टफोन आहे. अधिक जलद माहिती शोधण्यासाठी, नवीन कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आणि सूत्रबद्ध पद्धतीने व्यक्त होण्यामध्ये नोट-२ महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
५.५ (१४०.९ एमएम) एचडी सुपर अॅमोलीड स्क्रीन, एचडी व्हिडीओ पाहण्यासाठी चित्रपटाच्या पडद्याचा अनुभव देणारा स्क्रीन, अतिशय स्लीम आणि आकर्षक बाह्यरचना ही गॅलक्सी नोट-२ ची काही वैशिष्टय़े.
यातील नवीन एस पेन हे लांबीला मोठे, जाड आणि हाताळण्यासाठी विशिष्ट पद्धतीने तयार करण्यात आले आहे, ज्यामुळे ते लिहिण्यासाठी, चित्र काढण्यासाठी सहज वापरता येते. मोबाइलवर करावयाच्या टास्कसाठी एस पेन सवरेत्कृष्ट साधन आहे.
एअर व्यू – एस पेनच्या साहाय्याने तुम्ही ईमेल, एस प्लानर, इमेज गॅलरी किंवा व्हिडीओ, मेसेज हे पूर्णपणे उघडल्याशिवाय पाहू शकता. ज्यामुळे युजरला सर्चमध्ये क्षणात जाता येते आणि एका स्क्रीनवरून दुसऱ्या स्क्रीनवर जाण्याआधीच अधिक माहिती मिळते.
तुमच्याकडे असलेली अफलातून कल्पना मोबाइलच्या स्क्रीनवर एस पेनच्या साहाय्याने उतरवता येते. एस पेनवरील बटण दाबून तुम्हाला एखादी गोष्ट एडिट करायची आहे यावरून मजकूर स्वत:हून सिलेक्ट करते. यातील इझी क्लिप वैशिष्टय़ामुळे तुम्हाला स्क्रीनवरील कोणताही मजकूर सेव्ह, शेअर किंवा पेस्ट करता येतो. एकदा क्रॉपिंग झाले की युजर तो मजकूर अथवा फोटोला रंग देऊ शकतो, त्याच्या शेड्स बदलू शकतो आणि स्वत:च्या हस्ताक्षरात त्यावर काहीही मेसेज लिहू शकतो.
पॉप-अप नोट
जेव्हा युजर एस पेन मोबाइलमधून बाहेर काढतो तेव्हा आपोआप नोट पॉप-अप होते. ज्यामुळे युजरला एखादा मेसेज ताबडतोब लिहायला मदत होते. तसेच एस पेन वापरून युजर प्रत्येक फोटोच्या मागे मेसेज लिहून तो खासगी करू शकतो. फोटोच्या मागे हाताने लिहिलेली नोंद इतरांसोबत जेपीजी फॉरमॅटमध्ये सेव्ह करून शेअरही करता येते.
यामध्ये क्विक कमांड हे नवीन फीचर आहे. एस पेनच्या साहाय्याने तुम्ही नियमित वापरणारे अॅप्लिकेशन्स क्षणात उघडूू शकता. जेव्हा तुम्ही एस पेनवरील बटण प्रेस करून स्क्रीनवर खालच्या बाजूने ते वर सरकवता तेव्हा कमांड पॅड येतो. ईमेल, फोन, एखादे ठिकाण शोधण्यासाठी याचा मोठय़ा प्रमाणावर उपयोग करता येणार आहे.
आताच्या सर्व मोबाइलमध्ये तुम्हाला एखादा व्हिडीओ पाहायचा असेल तर जुनी अॅप्लिकेशन्स बंद करावी लागतात. पण यामधील पॉप-अप व्हिडीओ ऑप्शनमुळे तुम्ही व्हिडीओ पाहताना इतर अॅप्लिकेशन्सही सुरू ठेवू शकता. एवढंच नव्हे तर स्क्रीनवर तो तुम्हाला हवा तिथे सेट करता येतो. याचाच अर्थ युजर ऑनलाइन ब्राऊ झिंग, मित्रांसोबत कनेक्ट करण्यासाठी किंवा स्वत:चा दिवस प्लान करण्यासाठी याचा वापर करू शकतो.
नोट-२ मध्ये नवीन हार्डवेअर तंत्रज्ञान वापरण्यात आलंय. १.६ गिगाहर्ट्स क्वाड कोर प्रोसेसर, तसेच तो अॅन्ड्रॉइड ४.१ जेली बीन या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतो. याची साठवण क्षमता १६ जीबी असून ती एसडी कार्डद्वारे ६४ जीबीपर्यंत वाढवता येते. ३,१०० एमएएच बॅटरीमुळे तुम्ही सर्व अॅप्लिकेशन्सचा कसलीही चिंता न करता सलग दहा तासांच्या वर आनंद घेऊ शकता.
यामध्ये मुख्य कॅमेरा हा ८ मेगापिक्सलचा असून समोरील कॅमेरा १.९ मेगापिक्सलचा आहे. ज्यामध्ये एचडी व्हिडिओ रेकॉर्डिगसुद्धा करता येते. पहिल्यांदाच बेस्ट फेसेस हे ऑप्शन देण्यात आले आहे. त्यामुळे ग्रुफ फोटो काढताना त्यातील आवडता चेहरा निवडून त्याला फोकस करता येते.
गॅलक्सी एस थ्रीमध्ये वापरण्यात आलेला स्मार्ट स्टे मोड नोट-२ मध्येही वापरण्यात आला आहे. या मोडमुळे कॅमेरा स्टॅन्डबायला न जाता तुम्ही मनाप्रमाणे फ्रेमची मांडणी करू शकता.
नोट-२ तुम्ही तुमच्या सॅमसंग एचडी टीव्ही, फोन, मोबाइल टॅब्लेट, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसशी जोडून एकाच नेटवर्कवर गोष्टी शेअर करू शकता. यामधील ऑलशेअर कास्ट याद्वारे तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स, प्रेझेंटेशन्स आणि इमेजेस वेगवेगळ्या लोड न करता रिअल टाइमवर एकत्रितपणे करू शकणार आहात.
नवीन नोट-२ हा मार्बल व्हाइट आणि टायटेनियम ग्रे रंगात उपलब्ध आहे.
किंमत ३९, ९०० रुपये.

ADVERTISEMENT
really a great one