असूसने तैवानमध्ये नवा पॅडफोन लॉंन्च केला आहे. या डिव्हाईसचे नामकरण त्यांनी पॅडफोन- 2 असे ठेवले आहे. असूस ग्राहकांना क्वॉड कोअर स्मार्टफोन आणि टॅबलेट दोन्हीही देणार आहे. याचबरोबर 4.7 इंचीचा अॅड्रायड स्मार्टफोन आहे. जो पॅडफोन- 2 स्टेशनमध्ये बसवल्यानंतर बनतो 10.1 इंचाचा टॅबलेट.
पॅडफोन-2 मध्ये असूसने आधीच्या पॅडफोनपेक्षा चांगल्या फिचर्सचा समावेश केला आहे. 4.3 इंचाच्या मागील पॅडफोनपेक्षा वेगळया डिव्हाईसच्या स्मार्टफोनमध्ये सुपर IPS+ टेक्निकने युक्त 4.7 इंचाची स्क्रीन आहे.
जर तुम्हाला या फोनची स्क्रीन छोटी वाटत असेल तर पॅडफोन स्टेशनबरोबर याला कनेक्ट करा. म्हणजे तुम्हाला मिळेल 10.1 इंचाची स्क्रीन जी 1280×800 रिझोल्यशून इतकी असेल.
पॅडफोन-2 मध्ये अॅड्राएड 4.0 आईस्क्रीम सँडविच ऑपरेटिंग सिस्टिमची सुविधा पुरवण्यात आली आहे. मात्र असूसने लवकरच ते जेलीबेनने अपग्रेड करण्यात येणार असल्याचे सांगितले. या डिव्हाईसमध्ये आपल्याला f/2.4 BSI सेन्सरबरोबर 13 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. हा कॅमेरा 1080 पिक्सलवर 30 फ्रेम प्रति सेकंदवर व्हिडिओ शूट करता येऊ शकतो. चॅटिंगसाठी 1.2 मेगापिक्सलचा कॅमेराही देण्यात आला आहे.पॅडफोन-2 चे सर्वात मोठे वैशिष्ट म्हणजे याचे 1.5 GHz चे क्वालकॉम स्नॅपड्रॅगन एस-4 क्वॉड कोअर प्रोसेसर आणि 2 जीबी रॅम पुरवण्यात आली आहे. यामुळे या डिव्हाईसचा वेग निश्चितच वाढेल.
या डिव्हाईसमध्ये NFC फिचरही आहे. असूस वेबस्टोअरमध्ये 2 वर्षांसाठी 50 जीबी वेबस्टोरेजची सुविधा आहे. यामध्ये 5,000mAh ची बॅटरी लावण्यात आली आहे.
पॅडफोन-2 चे वजन 649 ग्रॅम आहे. जे आधीच्या मॉडेलपेक्षा कमी आहे. पॅडफोनचे वजन 854 ग्रॅम आहे. तैवानमध्ये या डिव्हाईसची किंमत $620 (32,739) $750 (39,607) रूपये ठेवण्यात आली आहे.
ADVERTISEMENT