आगामी वर्षात बाजारात नव्या उत्पादनांचा संच बाजारात आणण्यात येणार आहे. या उत्पादनांच्या ब्रँडिंगमध्ये एकसमानता असावी, यासाठी हा नवा लोगो तयार करण्यात आला आहे. सुमारे २५ वर्षांनंतर मायक्रोसॉफ्टने आपला लोगो बदलला आहे.
मायक्रोसॉफ्टच्या नव्या लोगोविषयीचा व्हिडिओ येथे पाहा
कंपनीने १९८७ साली पहिला लोगो बनवला होता. चार चौरसांच्या शेजारी मायक्रोसॉफ्टचे नाव असा नवा लोगो आहे. मात्र, पूर्वीचा इटॅलिक (तिरपा) लोगो बदलून, आता चार चौरसांमध्ये चार वेगवेगळे रंग भरण्यात आले आहेत.
मायक्रोसॉफ्ट आपल्या जुन्या उत्पादनांना फाटा देत, ‘ऑफिस’ व फोन ही नवी सॉफ्टवेअर्स, तसेच ‘विंडोज् ८’ ही ऑपरेटिंग सिस्टिम सुरु करणार असून, नव्या लोगोमुळे ऍप्पल इनकॉर्पोरेशन प्रमाणेच आपल्या ग्राहकांना एका ब्रँडचा एकसमान अनुभव व प्रतिसाद मिळेल, अशी कंपनीला आशा आहे.