Tag: Windows 8

विंडोजची ‘आठवी’ खिडकी : Windows 8 येत आहे भन्नाट सुविधांसह

विंडोजची ‘आठवी’ खिडकी : Windows 8 येत आहे भन्नाट सुविधांसह

' विंडोज फोन ८ ' हे मायक्रोसॉफ्टचं सर्वात प्रसिद्ध आणि प्रगत व्हर्जन. सध्या ' विंडोज ८ ' पीसी ओएसच्या बाबतीत जितकी उत्सुकता आहे. तितकीच उत्सुकता ' विंडोज फोन ८ ' या ...

आठवी खिडकी उघडली! विंडोज ८ बाजारात

कम्प्युटर , स्टायलसवर आधारित स्मार्टफोन , टचस्क्रीन फोन, टॅब्लेट पीसी , लॅपटॉप आदी सर्व आधुनिक युगातील संदेशवहन आणि माहितीसाठा करणाऱ्या गॅजेट्सना पूरक ठरणारी बहुचर्चित ' विंडोज ८ ' ही नवी ऑपेरेटिंग सिस्टिम गुरुवारी मायक्रोसॉफ्ट कंपनीने बाजारात आणली .  विंडोज यूजरना ' विंडोज ८ ' साठी अपग्रेड करणे शक्य होणार असून, तशी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे .  या नव्या सिस्टिममुळे संधीची नवी खिडकी उघडण्याबरोबरच तंत्रज्ञान क्षेत्रात कंपनी पुन्हा एकदा झेपावेल , अशी अपेक्षा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ( सीईओ ) स्टीव्ह बालमेर यांनी व्यक्त केली . विंडोज अपग्रेडची सुविधा ३९ . ९९डॉलरपासून उपलब्ध असेल , असे कंपनीच्या विंडोज विभागाचे अध्यक्ष स्टीव्हन स्निफेस्की यांनी जाहीर केले .  दीर्घकाळ चालणारी बॅटरी , वेगवान बूटिंग , लहान मेमरी याबरोबर ' विंडोज ७ ' च्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरना ' विंडोज ८ ' पूरक असणार आहे . माउस , की - बोर्ड आणि टचबरोबर काम करता येऊ शकेल , असेयाचे डिझाइन आहे आणि हेच या ऑपरेटिंग सिस्टिमचे वैशिष्ट्य आहे . ' विंडोज ८ ' आणि ' सरफेस टॅब्लेट ' ची विक्री शुकव्रारपासून सुरू होणार आहे .  सध्याच्या स्टार्ट मेनू आणि आयकन्सच्या पलीकडचा विचार करून ' विंडोज ८ ' चा डिस्प्ले तयार करण्यात आला आहे . अॅप्लिकेशनच्या अपडेट्सची माहिती यावरून मिळू शकणार आहे . टचस्क्रीनचा लक्षात घेऊन यावरील टाइल मोठ्या करण्यात आल्या आहेत . त्यामुळे ' टच ' करणे सोपे जाणार आहे . स्पीकरचा आवाज नियंत्रित करण्यासाठी ऑयकॉन आपोआप झाकला जातो .यापूर्वी लाँच झालेल्या काहीऑपरेटिंग सिस्टिमची चर्चा आणि त्यांना मिळालेला प्रतिसादही चांगला होता .  विंडोज ८ या ऑपरेटिंग सिस्टिमचाही गाजावाजा होण्यासाठी कंपनीने प्री - लाँचसाठी प्रयत्न केले आहेत . मात्र ,कंपनीकडून पूर्वी लाँच झालेल्या ऑपरेटिंग सिस्टिमला मिळालेला प्रतिसाद विंडोज ८ ला मिळणार का यावर तज्ज्ञांकडून शंका व्यक्त केली जात आहे .  विंडोज ८ मध्ये प्रत्येकासाठी नवे काही ना काही तरी असेल ,असा अंदाज आहे . टॅब्लेट पीसीप्रेमींसाठी टचस्क्रीन सुविधा ,नवा इंटरफेस आणि डेस्कटॉपबरोबरच येत असलेल्या पारंपरिक सॉफ्टवेअरना पूरक असे हे नवे सॉफ्टवेअर असणार आहे . मात्र , असे असले तरी ही ऑपरेटिंग सिस्टिम का घ्यावी, असा प्रश्न अनेक कंपन्यांना आहे . कंपनीने काही वर्षांपूर्वी विंडोज ७ बाजारात आणले . मात्र , अजूनही अनेक यूजर हे विंडोज एक्सपीवरून विंडोज ७ ला अपग्रेड होऊ शकलेले नाहीत . विंडोज ८ चा प्लॅटफॉर्म हा बिझनेस प्लॅटफॉर्मपेक्षा कन्झ्युमर प्लॅटफॉर्म असल्याचे वाटते आहे . त्यामुळे कंपन्यांना याकडून फारशा अपेक्षा नाहीत .परिणामी , कंपन्यांकडून विंडोज ८ ला मागणी असण्याची शक्यता कमी आहे . कम्प्युटरच्या ऑपरेटिंग सिस्टिमचा मोठा ग्राहक हा बिझनेस कॅटेगरीतला आहे . पर्सनल कॅटेरीचे प्रमाण तुलनेत कमी आहे . भारतासारख्या ठिकाणी पर्सनल कम्प्युटरवर लायसन्स प्रॉडक्ट वापरण्याबाबत फारशी जागरूकता नाही . एखादी कंपनी किंवा प्रॉडक्टला चांगला वा वाईट प्रतिसाद या गोष्टी घडत असतात . व्यवसाय कशा पद्धती बदलत आहे याचे उदाहरण म्हणून विंडोज ८ कडे पाहायला हवे . मात्र , कंपनी ग्राहक आणि वैयक्तिक ग्राहक यांच्यातील अंतर कमी होत असल्याचे हे संकेत आहेत , असाही कयास काही तज्ज्ञांनी बांधला आहे . टॅब्लेट पीसी आणि पीसी यांबाबत कोणतीही तडजोड करण्यास व्यावसायिक ग्राहक तयार नाहीत . त्यामुळे विंडोज ८ ला थोडाफार प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे .टच एक्सपिरिअन्समध्ये आपण मास्टर आहोत , याची चुणूक मायक्रोसॉफ्टकडून नव्या ऑपेरिंग सिस्टिमच्यामाध्यमातून दाखविली जाण्याची शक्यता आहे . कंपनी करत असलेले मार्केटिंग हे तरुण ग्राहकांना समोर ठेवून करण्यात आले आहे .  विंडोज ८ चे ट्रायल व्हर्जन वर्षभरापूर्वी बाजारात उपलब्ध करून देण्यात आले . मात्र , कंपन्यांकडून याला थंड प्रतिसाद मिळालेला आहे . फोक्सवॅगन कंपनीने गेल्या वर्षी साठ हजार कम्प्युटरवर विंडोज ७ ही ऑपरेटिंग सिस्टिम बसविली . वर्षानंतर कंपनी नव्या ऑपरेटिंग सिस्टिमला अपग्रेड होण्याची शक्यता कमी आहे . त्यामुळे व्यावसायिक ग्राहकांकडून विंडोज ८ ला थंड प्रतिसाद मिळण्याची शक्यता अधिक असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करीतआहेत . 

नोकियाचा विंडोज-8 लुमिया फोन धमाका सादर (वायरलेस चार्जिंग,विंडोज -8,प्युअर मोशन एचडी टच

नोकियाचा विंडोज-8 लुमिया फोन धमाका सादर (वायरलेस चार्जिंग,विंडोज -8,प्युअर मोशन एचडी टच

न्यूयॉर्क- नोकियाने न्यूयॉर्कमध्ये बुधवारी रात्री आपले ल्युमिया 920 आणि 820 हे बहुप्रतीक्षित स्मार्टफोन सादर केले. पहिल्यांदाच नोकियाच्या स्मार्टफोनमध्ये मायक्रोसॉफ्टच्या विंडोज-8 आॅपरेटिंग ...

Page 4 of 4 1 3 4
ADVERTISEMENT
error: Content is protected!