मोबाइल ‘ओएस’वॉर मायक्रोसॉफ्ट विंडोज फोन ८ अपडेट
मोबाइल ऑपरेटिंग सिस्टममधील वॉर दिवसेंदिवस अधिकच ठळक होत आहे. अँड्राइडने किटकॅटची घोषणा केल्यानंतर विंडोज फोन ८मध्येही अपडेट देण्याची घोषणा मायक्रोसॉफ्टने ...
मोबाइल ऑपरेटिंग सिस्टममधील वॉर दिवसेंदिवस अधिकच ठळक होत आहे. अँड्राइडने किटकॅटची घोषणा केल्यानंतर विंडोज फोन ८मध्येही अपडेट देण्याची घोषणा मायक्रोसॉफ्टने ...
आजकाल नवा डेस्कटॉप पीसी किंवा नोटबुक घेतल्यावर 'विंडोज ८' ही ऑपरेटिंग सिस्टिम त्यावर आधीच लोड असते. 'विंडोज सेव्हन', 'व्हिस्टा', 'एक्स्पी' ...
विंडोजच्या वेगवेगळ्या व्हर्जन्सशी सगळेच परिचित आहेत .बहुतेक सगळेच जण ' विंडोज ' ची ऑपरेटिंग सिस्टीम वापरतात . ' विंडोज व्हिस्टा ', ' विंडोज ७ ', ' विंडोज ८ 'नंतर आता ' विंडोज ब्लू ' किंवा ' विंडोज ८ . १ ' येऊ घातलेआहे . विंडोजच्या आधीच्या व्हर्जनमध्ये असलेल्या उणीवा दूर करून नवीन व्हर्जन अधिक आकर्षक आणि यूझर फ्रेंडली करण्याची ' मायक्रोसॉफ्ट ' ची हातोटी आहे . पण , ' विंडोज८ ' च्या बाबतीत ही ' हातोटी ' तितकीशी यशस्वी झाली नाही . टच स्क्रीनची सुविधा नसलेल्या कम्प्युटरवर ही सिस्टीम तितकी समर्थपणे ऑपरेट झाली नाही आणि थेट डेस्कटॉपला बूट न होणे या बाबी अनेकांना पटल्या नाहीत . त्यामुळे किमान या दोन बाबींचे समाधान ' विंडोज 'ने द्यावे , अशी मागणी यूझरकडून बराच काळ होत होती . ग्राहकांचा हा तक्रारींचा सूर ' मायक्रोसॉफ्ट ' पर्यंत पोहोचला असावा . येऊ घातलेल्या ' विंडोज ब्लू ' मध्ये ' स्टार्टबटन ' पुन्हा दिसणार असल्याची चर्चा कम्प्युटर जगतात आहे . थेट डेस्कटॉपलाही बूट करता येणार आहे . या नव्या व्हर्जनमध्ये हे बदल होण्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे . खात्रीशीर वृत्त मात्र नाही . त्यामुळे हे नक्की काय गौडबंगाल आहे , हे जाणून घेण्याचे कुतूहल ग्राहकांमध्ये आहे . मात्र , असा बदल झाला , तर तो ग्राहकांसाठी इष्टच आहे . असे झाले , तर कंपनीच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच असे होईल , की मायक्रोसॉफ्ट ' बॅक फूट' वर गेली आहे आणि पुन्हा एकदा यूझरच्या मागणीला अनुसरून आपल्या सिस्टीममध्ये ती पूर्वीप्रमाणे बदल करेल. नव्या व्हर्जनमध्ये पहिल्यांदा हे बदल प्रस्तावित नव्हते . पण , ते होण्याची दाट शक्यता आहे . वेगवेगळ्या माध्यमांतून गेल्या आठवड्यांपासून ही वृत्ते येत आहेत . ' मेट्रो स्टाइल ' मध्ये होणाऱ्या बूटिंगला फाटा देऊन थेट डेस्कटॉप बूटिंग यूझरना करता येईल , अशी सुविधा पुरवण्याकडे मायक्रोसॉफ्टची वाटचाल सुरू आहे . ' विंडोज 'वर ' स्टार्ट बटन ' ही पुन्हा येण्याची शक्यता असल्याचे विविध सूत्रांनी सांगितले आहे . ' विंडोज ब्लू ' चे उत्पादन या वर्षी कदाचित सुरुवात होईल . त्यावेळी हे दोन्ही बदल होतील , की नाही हे सर्वांना कळेलच . तत्पूर्वी काही अधिकृत घोषणा झाली , तर ग्राहकांसाठी उत्तमच ! ' विंडोज ८ ' चा यूझर इंटरफेस हा चांगला आहे . मात्र , टच स्क्रीन नाही , त्यांच्यासाठी ' विंडोज ' चे जुनेच व्हर्जन चांगले , असे सध्या म्हणावे लागत आहे . बरेचसे यूझर त्यामुळे जुन्याच व्हर्जन्सना पसंती देत आहेत . ' विंडोज ब्लू ' मधील नव्या बदलाने हा त्रास टळून विंडोज अधिक यूझर फ्रेंडली सिस्टीमचा वापर सर्वांना करता येईल , याची आशा बाळगूया .
' मायक्रोसॉफ्ट विंडोज ' हा शब्द कधीही कम्प्युटर नहाताळलेल्या व्यक्तीलाही माहिती असेल . मायक्रोसॉफ्टनेएमएस - डॉसचे विस्तारक म्हणून २० नोव्हेंबर , १९८५ रोजी ' विंडोज ' नामक ऑपरेटिंग सिस्टिम आणली .१९८४ मध्ये सादर झालेल्या ' अॅपल ' च्या ' मॅकिंटॉश ' ला मागे टाकत विंडोजने पर्सनल कम्प्युटर ( पीसी )बाजार काबीज केला आहे . ऑक्टोबर २०११ च्या माहितीनुसार ग्राहक संचालन प्रणालीच्या बाजारात नव्वदटक्क्याहून जास्त वाटा विंडोजचा आहे . पर्सनल कम्प्युटर , ' विंडोज ७ ', सर्व्हरसाठी ' विंडोज सर्व्हर २००८आरटू ' व मोबाइल फोनसाठी ' विंडोज फोन ८ ' या विंडोजच्या सर्वात नवीन आवृत्त्या आहेत . आता मायक्रोसॉफ्ट' विंडोज ब्ल्यू ' या नावाने नवीन ऑपरेटिंग सिस्टिम बाजारात आणत आहे . यानिमित्ताने मायक्रोसॉफ्टच्याऑपरेटिंग सिस्टिमच्या प्रवासाचा अक्षय पेंडभाजे यांनी घेतलेला हा आढावा . विंडोजचा इतिहास विंडोजचा इतिहास जाणून घेण्यासाठी आपल्याला सप्टेंबर १९८१ पर्यंत मागे जावे लागते , जेव्हा ' इंटरफेसमॅनेजर ' हा प्रकल्प सुरू झाला . तो ' विंडोज ' या नावाने नोव्हेंबर १९८३ मध्ये घोषित झाला खरा , पण नोव्हेंबर१९८५ पर्यंत ' विंडोज ' प्रकाशित झाली नाही . ' विंडोज १ . ० ' चे बाह्यावरण ' एमएस - डॉस एक्झिक्युटिव्ह 'नावाचा प्रोग्रॅम होता . कॅल्क्युलेटर , कॅलेंडर , कार्डफाइल , क्लिपबोर्ड दर्शक , घड्याळ , कंट्रोल पॅनल , नोटपॅड ,पेंट , रिव्हर्सी , टर्मिनल , राइट हे इतर पुरवलेले प्रोग्राम होते . विंडोज ३ . ० व ३ . १ विंडोज ३ . ० ( १९९० ) व ३ . १ ( १९९२ ) या ऑपरेटिंग सिस्टिम खऱ्या अर्थाने व्यावसायिक दृष्ट्या यशस्वीहोत्या . अॅपल विरुद्ध विंडोज या युद्धाच्या सुरुवातीला अॅपलच्या ओएसला टक्कर देण्यासाठी विंडोजने नवीनजीयूआय , इंटेलचा ८०२८६ आणि ८०३८६ या सीपीयूना चांगला सपोर्ट या गोष्टी ३ . ० मध्ये , तर ३ . १ मधेविंडोज राजिस्ट्री , ट्रू टाइप फॉन्ट्स , मिनीस्वीपर या गोष्टींचा समावेश केला . विंडोज ३ . १ च्या दोन महिन्यांतएक लाख कॉपीज विकल्या गेल्या . विंडोज ९५ ' विंडोज ९५ ' ऑगस्ट १९९५ साली प्रकाशित झाली . चार दिवसात एक लाख कॉपीज विकल्या गेल्या , असे हेओएस होते . यात विंडोजने पहिल्यांदाच स्टार्ट बटणचा समावेश केला होता . विंडोज ९८ मायक्रोसॉफ्टचे दुसरे प्रकाशन ' विंडोज ९८ ' जून १९९८ साली प्रकाशित झाले . मायक्रोसॉफ्टने १९९९ सालीयाचीच दुसरी आवृत्ती प्रकाशित केली . तिचे नाव विंडोज ९८ , सेकंड एडिशन होते . ' विंडोज ९८ एसई ' हात्याचा शॉर्टफॉर्म . या ओएसला जगभरातून चांगला प्रतिसाद मिळाला . थीम सपोर्ट , थंबनेल्स , वन - क्लिकलाँच , गेमिंग साठी डायरेक्ट एक्स ६ . १ , अशा अनेक गोष्टींचा समावेश त्यात करण्यात आला होता . विंडोज एमई फेब्रुवारी २००० मध्ये ' विंडोज २००० ' बाजारात आले . या पाठोपाठ लगेजच विंडोज मिलेनियम एडिशन (एमई ) बाजारात आली . ' विंडोज एमई ' ने ' विंडोज ९८ ' कडून गाभा अद्ययावत केला असला , तरी ' विंडोज२००० ' कडूनही काही पैलू अद्ययावत केले व ' बूट इन डॉस मोड ' हा पर्याय काढला . विंडोज एक्सपी ' विंडोज एक्सपी ' खासगी कम्प्युटरवर ( गृह , व्यापारी , मीडिया केंद्रांसह ) चालणारी ओएस आहे . २४ ऑगस्ट२००१ रोजी ती प्रथम कम्प्युटर उत्पादकांना मिळाली . कम्प्युटरवर प्रस्थापित केलेली आणि वापरण्याससोयीस्कर अशी ही विंडोजची सध्याची सर्वात लोकप्रिय ऑपरेटिंग सिस्टम आहे . ' एक्सपी ' हे नाव'experience' याचा शॉर्टफॉर्म आहे . निर्मितीपूर्व काळात तिचे सांकेतिक नाव ' व्हिसलर ' असे होते . ' विंडोजएक्सपी ' ची रिटेल विक्री २५ ऑक्टोबर २००१ ला सुरू झाली . जानेवारी २००६ मध्ये ' विंडोज एक्सपी ' च्या४० कोटीहून अधिक प्रती वापरात होत्या , असे एका आयडीसी विश्लेषकाचा अंदाज आहे . ' एक्सपी ' नंतर 'विंडोज व्हिस्टा ' व्यावसायिकांना ६ नोव्हेंबर २००६पासून व सामान्य जनतेला ३० जानेवारी २००७ पासूनमिळू लागली . ...
अल्ट्राबुक आणि टॅब्लेटहीविंडोज ८ ही ऑपरेटिंग सिस्टिमची नवीन अद्ययावत आवृत्ती मायक्रोसॉफ्टने बाजारात आणली त्यावेळेस अल्ट्राबुक्स बाजारात आणणाऱ्या अनेक कंपन्यांसोबत त्यांनी ...
© MarathiTech 2024 A Product by BagalTech
© MarathiTech 2024 A Product by BagalTech