स्टायलिश सोनी वायो इ१४ए
शाळा, महाविद्यालयांमध्ये असणारे विद्यार्थी ...
शाळा, महाविद्यालयांमध्ये असणारे विद्यार्थी ...
कम्प्युटर ऑपरेटिंग सिस्टिमची मक्तेदारी असलेल्या मायक्रोसॉफ्टने ' विंडोज ८ ' च्या माध्यमातून कम्प्युटर वापराला नवा आयाम दिला आहे. यामुळे कम्प्युटर वापरातील धम्माल आणखी वाढणार ...
बाजारात दररोज कितीही वेगवेगळी उपकरणे दाखल झाली तरी त्यामध्ये सर्वप्रथम पाहिली जाणारी गोष्ट म्हणजे ऑपरेटींग सिस्टिम. मोबाईल, टॅब्लेट, पीसी यामध्ये ...
गुगलच्या अँड्राइड मोबाइल ऑपरेटिंग प्लॅटफॉर्मसाठी अॅप्लिकेशन (अॅप) डेव्हलप करणाऱ्या भारतीय कंपन्यांना ...
गेल्या ११ वर्षांपासून विंडोज एक्सपी ही कम्प्युटर युझर्सचीआवडती ऑपरेटिंग सिस्टीम झाली आहे . त्यानंतर विंडोजच्यानव्या एडिशन्स आल्या असल्या तरी एक्सपी एवढी लोकप्रियता कुणालाही मिळालेली नाही . त्यामुळेच कदाचितमायक्रोसॉफ्ट , अॅडोबसह इतर सॉफ्टवेअर कंपन्यांनी आता आपल्या नव्या सॉफ्टवेअरच्या एडिशन्स एक्सपीलासपोर्ट करणार नाहीत असे जाहीर केले आहे . त्यामुळे एक्सपीच्या युझर्सला नजिकच्या भविष्यात नव्या ऑपरेटिंगसिस्टीमबरोबर जुळवून घ्यावे लागणार आहे . गुगलनेही सर्व इंटरनेट एक्सप्लोअर धारकांना त्यांचा ब्राऊझर अपडेट करायला सांगितला आहे . इंटरनेटएक्सप्लोअरर १० येत्या २६ ऑक्टोबरला बाजारात दाखल होणार आहे . त्यानंतर म्हणजे १५ नोव्हेंबरपासूनइंटरनेट एक्सप्लोअर ८ किंवा त्यापूर्वीच्या एडिशन्सला गुगल अॅप्स सपोर्ट करणार नाहीत . त्यामुळे एक्सपीयुझर्सनी नवीन एक्सप्लोअरर इन्स्टॉल करायचा म्हटला तर मायक्रोसॉफ्ट ते करू देत नाहीय . इंटरनेटएक्सप्लोअररच्या नव्या एडिशन्स एक्सपीला सपोर्ट करणार नाही असे कंपनीने जाहीर करून टाकले आहे . यायुझर्सला फायरफॉक्स , ऑपेरा , क्रोम यासारखे ब्राऊझर इन्स्टॉल करण्याची सोय आहे . पण फोटोशॉप युझर्सला तर ही सोय देखील उपलब्ध नाही . फोटोशॉपची सीएस ६ ही एक्सपीला सपोर्ट करणारीशेवटची व्हर्जन असेल असे अॅडोबने जाहीर केले आहे . कारण फोटोशॉपच्या आगामी व्हर्जनसाठी मॉडर्न हार्डवेअरग्राफिक्स लागणार असून ते एक्सपीमध्ये नाहीत , असे कंपनीचे प्रोडक्स मॅनेजर टॉम होगार्टी यांनी म्हटले आहे .विंडोजच्या नव्या एडिशन्समध्ये हे फीचर्स उपलब्ध आहेत . ग्राफीक कार्ड , ग्राफीक ड्रायव्हर्समुळे थ्रीडी , ब्लर गॅलरी, लाईटींग इफेक्ट यासारखे फीचर्स विंडोजच्या नव्या एडिशन्स युझर्सला वापरता येतील . फोटोशॉपची नवीएडिशन कधी दाखल होणार हे कंपनीने जाहीर केले नसले तरी आगामी एडिशन एक्सपीला सपोर्ट करणार नाही हेजाहीर करून ग्राहकांना ऑपरेटिंग सिस्टीम बदलण्यासाठी वेळ देत असल्याचा दावा कंपनीने केला आहे . यापूर्वीचअडोब लाइटरुमच्या अपडेटेड एडिशन्स एक्सपीला सपोर्ट करत नाहीत . नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार ऑगस्टमध्ये विंडोज ७ च्या युझर्सच्या संख्येने विंडोज एक्सपीच्यायुझर्सला क्रॉस केले आहे . त्यामुळे आगामी काळात कराव्या लागणा - या बदलांची तयारी कम्प्युटर युझर्सनेही सुरूकेल्याचे दिसून येते आहे .
© MarathiTech 2024 A Product by BagalTech
© MarathiTech 2024 A Product by BagalTech