विकिपीडियाची भारतीय भाषांमधील लेखांसाठी प्रोजेक्ट टायगर लेखन स्पर्धा !
अलीकडच्या काळात भारतामध्ये वाढलेले इंटरनेट यूजर्स आणि त्यांची भारतीय भाषांमधील Content ची मागणी लक्षणीयरित्या वाढलेली आहे. मात्र त्या प्रमाणात विकिपीडिया ...
अलीकडच्या काळात भारतामध्ये वाढलेले इंटरनेट यूजर्स आणि त्यांची भारतीय भाषांमधील Content ची मागणी लक्षणीयरित्या वाढलेली आहे. मात्र त्या प्रमाणात विकिपीडिया ...
जगभरातील ' नेटक - यां ' साठी माहितीचा सर्वात मोठासाठा असणा - या विकिपिडियाने एक नवीन प्रकल्प हातीघेतला आहे . हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर विकिपिडियाच्यानोंदणीकृत सदस्यांना त्यांच्या पोर्टल सर्विसच्या सपोर्टनुसारविकिपिडियाच्या पानांमध्ये व्हिडिओ अपलोड करता येतील . विकिमीडीया फाऊंडेशनने दिलेल्या माहितीनुसार हे नवीनव्हिडिओ प्लेयर विकिपिडिया आणि विकिपिडियाशी संबंधीतइतर साइटच्या पानांवरच दिसतील . तसेच या व्हिडिओमुळेलोकांना अनेक भाषांमध्ये माहिती पुरवता येईल , अशीआशाही फाऊंडेशनने व्यक्त केली . सामान्य ज्ञान , संदर्भ तसेच सर्वच क्षेत्रात महत्वपूर्ण ठरणारीमाहिती आतापर्यंत विकिपिडियावर फक्त लिखित स्वरुपात उपलब्ध होती . मात्र विकिपिडियाच्या प्रयोगामुळेजगभरातील माहिती व्हिडिओ स्वरुपात मिळेल . व्हिडिओ अपलोडींगचा हा प्रकल्प मुक्त माहितीपुरवठ्याअंतर्गतउपलब्ध असणारा व्हिडिओ कलतुरा आणि गुगल सर्च इंजिनच्या मदतीने २००८ सालीच सुरु केला होता . मात्रअनेक तांत्रिक अडचणींमुळे या हा प्रकल्प अनेक वेळा रखडला . आता विकिपिडिया , गुगल आणि कलतुरा यांच्याएकत्रित प्रयत्नांनी एचटीएमएल - ५ ही नवीन संगणकीय भाषा तयार करण्यात आली आहे . तिचा या प्रकल्पातवापर करण्यात येणार आहे . सध्या विकिपिडियाच्या इंग्रजी भाषेतील पानांना रोज २५ कोटी लोक भेट देतात . तसेच सध्या विकिपिडियाच्यानावे १५ हजार व्हिडीओ इंटरनेटवर उपलब्ध आहेत . हे सर्व व्हिडीओ २००७ पर्यंत वापरत असलेल्या ओग थेओराव्हिडीओ प्लेअरद्वारे अपलोड करण्यात आले आहे किंवा ते एचटीएमएल - ५च्या चाचणीसाठी नवीन व्हिडीओप्लेअरमार्फत अपलोड करण्यात आले आहेत .
© MarathiTech 2024 A Product by BagalTech
© MarathiTech 2024 A Product by BagalTech