Tag: VOIP

फेसबुकवरून मोफत कॉल?

एसएमएसपाठोपाठ फेसबुकने आता मोफत व्हॉइल कॉलिंगचीसुविधाही देण्याची तयारी सुरू केली आहे . सध्या कॅनडातीलस्मार्टफोन युझर्सना ही सुविधा देण्यात येत आहे . फेसबुक मेसेंजर अॅप अपडेट केलेल्यांना या माध्यमातून व्हॉइसओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल ( व्हीओआयपी ) सुविधा देण्यात येत आहे .  फेसबुकने तीन जानेवारीपासून अपडेट केलेल्या मेसेंजर अॅपच्या माध्यमातून जगभरातील युझर्सना व्हॉइस मेसेजपाठविण्याची सुविधा देऊ केली आहे . या माध्यमातून व्हाइस मेसेज पाठविण्यासाठी + बटन प्रेस केल्यानंतरव्हॉइस मेसेज पाठविण्याची सुविधा सुरू होते . यात रेकॉर्ड बटन प्रेस ठेवल्यापासून रेकॉर्डिंग सुरू होते व त्याबटनावरून हात बाजूला केल्यास रेकॉर्डिंग बंद होते आणि मेसेज पाठवला जातो . बोट स्लाइड केल्यानंतर मेसेजरद्द करता येतो . याचबरोबर कंपनीने इंटरनेटवरून मोफत व्हॉइस कॉल देण्याचीही सुविधा सुरू करण्याच्या दृष्टीनेपावले टाकायला सुरुवात केली आहे . सध्या कॅनडातील आयफोन युझर्सवर या सुविधेची चाचणी घेण्यात येत आहे. त्यात अॅपवरील ' आय ' प्रेस केल्यावर फ्री कॉलचा पर्याय निवडता येतो . फेसबुक या कॉलसाठी कुठलेही शुल्कघेत नसले , तरी यासाठी युझरच्या डेटा प्लॅनमधील डेटा वापरला जातो . त्यामुळे रूढार्थाने यासाठी कुठलेही शुल्कद्यावे लागत नसले , तरी डेटा मात्र वापरला जातो आहे .  सध्या सुमारे एक अब्ज ७ लाख फेसबुक युझर्स असून त्यापैकी ६० कोटी यूझर्स मोबाइलवरून फेसबुक वापरतात .त्यातील सुमारे ४७ कोटी लोक अॅपच्या माध्यमातून फेसबुक वापरतात आणि उर्वरित फेसबुकची मोबाइल व्हर्जनवापरतात . सुमारे १४ कोटी आयफोन युझर्स तर साडेचार कोटी आयपॅड युझर्स आयपॅडवरून फेसबुक वापरतात .त्यामुळेच सुरुवातीला कंपनीने त्यांच्यासाठी हे व्हर्जन चाचणीसाठी उपलब्ध करून दिले असावे , असा अंदाज आहे.  आगामी काळात फेसबुक व्हिडिओ मेसेजिंगची सुविधाही देईल , अशी अपेक्षा आता या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करूलागले आहेत . पण पारंपारिक नंबरवरून कॉल करण्याच्या पद्धतीकडे दुर्लक्ष करून फेसबुकच्या माध्यमातून कॉलकरण्याच्या नव्या प्रयत्नांसाठी ग्राहकांचे मन वळविणे मात्र कंपनीला कठीण जाईल , अशी शक्यता वर्तवली जातआहे . पण मोफत मिळणारी सुविधा पाहून ग्राहक याकडे आकर्षित होतील . त्यामुळे भविष्यात कुणाचाहीमोबाइलनंबर सेव्ह करण्याची गरज राहणार नाही . थेट फेसबुक फ्रेण्ड्समधून संबंधित व्यक्ती शोधायचा आणि थेटकॉल करायचा . 

ADVERTISEMENT
error: Content is protected!