Tag: URL Shortners

शॉर्ट अँड बंडल लिंक (bit.ly, goo.gl)

फेसबुक आणि ट्विटरने पुन्हा एकदा ' शेअरिंग ' ची सोयउपलब्ध करून दिली आहे . त्यामुळे तरुण पिढीला नव्याशेअरिंगची सवय लागली आहे . त्यामुळे दररोज कित्येक गोष्टीविविध लिंक्सच्या माध्यमातून शेअर केल्या जातात . मात्रआता या अनेक लिंक्स शेअर करायचाही कंटाळा येतो . लिंकशेअर तर करायचीय पण अनेक लिंक शेअर करायचा कंटाळा. ट्विटरवर तर १४० शब्दांची मर्यादा असल्याने आणखीनचप्रॉब्लेम होतो . या समस्येवर सोल्युशन्स देणाऱ्या काहीवेबसाइट्स आहेत . त्यात अनेक लिंक एकाचवेळी शेअर करतायेतात .  1. Bit.ly  यूआरएल छोटी करून देण्याची सेवा देणाऱ्या वेबसाइट्समध्ये ही एक आघाडीची वेबसाइट . यामध्ये तुम्हालासुरुवातीला इ - मेल आयडी वापरून अकाऊंट तयार करावे लागते . त्यानंतर तुम्ही यूआरएल अॅड करू शकता . हीयूआरएल शेअर करताना शॉर्ट स्वरुपात दिसते . याठिकाणी बंडल करून अनेक यूआरएल एकाचवेळी शेअरहीकरता येतात . याठिकाणी युआरएल बरोबरच फोटो , डॉक्युमेंट , ई - बुक अॅड करता येतात . हे बंडल किंवा सिंगलयुआरएल तुम्ही फेसबुक , ट्विटरवर शेअर करू शकता किंवा ई - मेलही करता येईल .  2. BridgeURL  यूआरएल शॉर्ट करण्यासाठी ही वेबसाइट bit.yl चीच मदत घेते . पण तरी त्यासाठी कुठलंही अकाऊंट तयार करावंलागत नाही हा या वेबसाइटचा मोठा प्लस पॉइंट . याठिकाणीही यूआरएलसाठी टायटल देऊन यूआरएल अॅडकरून थेट शेअर करू शकता . एकापेक्षा अधिक यूआरएल बंडल केल्या असतील तर ओपन करताना त्या स्लाइड शोप्रमाणे दिसतात . याठिकाणी अकाऊंटही तयार करता येते . त्याचा उपयोग करून लिंक अॅड करता येतात , काढूनटाकता येतात .  3. MinMu  यूआरएल शॉर्ट करण्याची किंवा बंडल करण्याची ही आणखी एक वेबसाइट . कुठलेही पाच नंबर टाइप करा ,टायटल द्या , यूआरएल टाइप करा किंवा पेस्ट करा आणि जनरेट मेन्यूवर क्लिक करून तुम्ही शॉर्ट लिंक तयार करूशकता . ही लिंक फेसबुक किंवा ट्विटरमध्ये पेस्ट करून शेअर करू शकता . मात्र या हायपरलिंक नसल्याने कॉपी -पेस्ट करूनच काम करावे लागते , ही या वेबसाइटची एक त्रुटी आहे . याठिकाणी लॉगिनची सोय नसल्याने तुमच्यालिंक साठवून ठेवता येत नाहीत .  4. Fur.ly  लिंक शॉर्ट करण्याची किंवा बंडल करण्याची ही सर्वात सोपी पद्धत आहे . केवळ यूआरएल टाइप करा , सिक्युरिटीकोड टाइप करा आणि एंटर क्लिक केले की झाली तुमची शॉर्ट लिंक तयार . या लिंकला तुमच्या सोयीचे टायटलदेण्याचीही पर्याय याठिकाणी उपलब्ध आहे . या वेबसाइटवर तुमचे अकाऊंट असेल तर सिक्युरिटी कोड टाइपकरण्याचीही गरज नाही . मात्र याठिकाणी ५ पेक्षा अधिक यूआरएल बंडल करायचे असल्यास थोडी अडचण होते .

ADVERTISEMENT
error: Content is protected!