IFA 2015 : सोनी एक्सपीरिया Z5, लेनेवो, असुस, एसर, इ. भरपूर प्रॉडक्ट सादर
IFA(Internationale Funkausstellung) हा जर्मनी मध्ये पार पडत असलेला काही सर्वात जुन्या इंडस्ट्री कार्यक्रमांपैकी एक आहे. यावेळी हा कार्यक्रम बर्लिनमध्ये भरला असून ...
IFA(Internationale Funkausstellung) हा जर्मनी मध्ये पार पडत असलेला काही सर्वात जुन्या इंडस्ट्री कार्यक्रमांपैकी एक आहे. यावेळी हा कार्यक्रम बर्लिनमध्ये भरला असून ...
आपल्याकडे सणासुदीचे विशेष महत्व आहे. याच सणासुदीच्या निमित्ताने हल्ली इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस घरी आणण्याचा ' ट्रेंड ' वाढीस लागला आहे. इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेसच्या बाजारात वर्षभर कायम ...
इंटरनेट , मोबाइल संवादाच्या क्षेत्रात प्रगती होण्याबरोबरच संबंधित क्षेत्रांमधील तांत्रिक बाबींमध्ये लक्षणीयरित्या बदल झाला . कम्प्युटर , इंटरनेट क्षेत्रात मिनिटामिनिटाला अपडेट्स येत असतात . मोबाइल , स्मार्टफोनमध्येही सतत नवी व्हर्जन्स येत असतात . त्यातील तंत्रज्ञान आणि इतर फिचर्स अपडेट होताना कॅमेरा मात्र तितकासा प्रगत नव्हता .आता ही कमतरता दूर होणार असल्याने स्मार्टफोनला ' ऑल इन वन ' असे म्हटले तर वावगे ठरणार नाही . मोबाइल अथवा स्मार्टफोनमधील कॅमेरा ही कल्पना काही नवीन नाही . मात्र , या नव्या स्मार्टफोनमधील कॅमेऱ्यात फ्रेममधील कुठल्याही ऑब्जेक्टवर फोकस करता येणार आहे .त्यामुळे फोटोमधील एखादी ठराविक वस्तू स्पष्ट बघता येणारआहे . असा कॅमेरा येत्या काही वर्षांत तयार केला जाणार आहे. या क्षेत्रातील नवनवे शोध पाहिले , की मल्टिपरपझ तंत्रज्ञान बनवण्याकडे कंपन्यांचा ट्रेंड आहे , असे जाणवते .त्यातल्या त्यात स्मार्टफोनसारख्या तंत्रज्ञानाचा विचार केला , तर या एका स्मार्टफोनमध्येच इंटरनेट , फोन करण्याची सुविधा , फोटो काढण्याची सुविधा तयार आहे . जेणेकरून डेस्कटॉप कम्प्युटर , लॅपटॉप आदी बाबींना 'चालता - बोलता ' पर्याय तयार होईल . आता नव्याने सांगितलेल्या या कॅमेऱ्याच्या पर्यायामुळे अत्याधुनिक कॅमेऱ्यांनाही कदाचित पर्याय तयार होईल . तोशिबा कंपनी या कॅमेऱ्यावर काम करत आहे . या कॅमेऱ्यासाठी पाच लाख छोट्या लेन्सेसचा वापर कंपनी करणार आहे . हा कॅमेरा केवळ स्मार्टफोनसाठी नसेल , तर टॅब्लेटमध्येही वापरता येणार आहे . वेगवेगळ्या ' फोकल लेन्थ 'ने या लेन्सेस ' फिल्ड ऑफ व्ह्यू ' कॅप्चर करतील . यामुळे फोटोग्राफरना फोटोमध्ये नेमके कुठे फोकस करायचे , हे ठरवता येईल . एका किड्याच्या डोळ्याप्रमाणे या लेन्सची रचना तयार करण्यात आली आहे . ' कम्पाउंड लेन्स 'त्यामध्ये बसवण्यात आल्या आहेत . या वर्षाअखेरीला व्यावसायिक स्तरावर स्मार्टफोन कॅमेऱ्याच्या उत्पादनाला सुरुवात होईल . पाच वर्षांपूर्वी ' आयफोन ' च्या निर्मितीनंतर डिजिटल कॅमेऱ्यांच्या विक्रीत घट झाली होती . ' लिट्रो ' कंपनीकडून अशीच सुविधा ग्राहकांना उपलब्ध आहे . डिजिटल कॅमेऱ्याला तोडीस तोड सुविधा स्मार्टफोनमध्ये निघाल्यामुळे डिजिटल कॅमेऱ्यांच्या विक्रीवर परिणाम झाला आहे .
काम करण्यासाठी तुम्हाला वेगवान आणि वजनाने हलक्या लॅपटॉपची गरज असेल तर इन्स्टंट अल्ट्राबुक विकत घ्या. तो आता प्रतिष्ठेचे प्रतीक बनू ...
© MarathiTech 2024 A Product by BagalTech
© MarathiTech 2024 A Product by BagalTech