बीएसएनएलच्या नव्या इंटरनेट ऑफर्स : 333 रुपयात 270 जीबी डाटा!!!
बीएसएनएल या सरकारी टेलिकॉम कंपनीने प्रिपेड ग्राहकांसाठी नवे इंटरनेट डेटा प्लॅन्स सादर केले असून सध्याच्या इतर टेलिकॉम कंपन्यापेक्षा खूपच स्वस्त ...
बीएसएनएल या सरकारी टेलिकॉम कंपनीने प्रिपेड ग्राहकांसाठी नवे इंटरनेट डेटा प्लॅन्स सादर केले असून सध्याच्या इतर टेलिकॉम कंपन्यापेक्षा खूपच स्वस्त ...
रिलायन्स जिओ ही मुकेश अंबानी यांनी बहुप्रतीक्षित टेलीकॉम कंपनीची सेवा 5 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. आज झालेल्या Reliance AGM वार्षिक ...
दिवाळीनिमित्त इंटरनेट ग्राहकांना खुशखबर देण्यासाठी वोडाफोन इंडियाने डाटा दरांत चक्क 80 टक्क्यांनी कपात करण्याची घोषणा केली आहे. उद्यापासून (शुक्रवार) नवीन ...
टाटा डोकोमो या कंपनीने इंटरनेट दरात सुमारे ९० टक्क्यांनी कपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. येत्या १ जु्लैपासून प्रति एककिलोबाईट ...
मोबाइलवरून इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या वेगाने वाढत आहे . मात्र , कनेक्ट होताना निर्माण होणाऱ्या अडचणी , वेग आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे महिन्याच्या शेवटी येणारे अव्वाच्या सव्वा बिल , यामुळे मोबाइलवर इंटरनेट वापरताना बहुतेकांच्या पोटात गोळा येतोच . मात्र ,त्यावरही आता नामी उपाय पुढे आला असून , मोबाइलवरून इंटरनेट वापरताना पूर्ण कालावधीसाठी कनेक्शन असण्याची गरज उरणार नाही . एखादी माहिती हवी असल्यास , एका विशिष्ट नंबरवर एसएमएस पाठवा आणि हवी ती माहिती मिळवा , अशी कल्पना पुढे आली आहे . यातून विकीपिडिया, गुगल यांसारख्या वेबसाइटवरून मोबाइलवर माहिती मिळणे , शक्य होणार आहे . टेक्स्टवेब , गूगल आणि इनोजटेक्नॉलॉजीज् या कंपन्यांनी अशा प्रकारची सेवाही सुरू केली आहे . समजा , आपल्याला टेक्स्ट वेबवरून एखादी माहिती हवी असल्यास , ९२४३३४२००० या क्रमांकावर एसएमएस पाठविणे गरजेचे आहे . दिवाळीविषयी माहिती हवी असल्यास @Wikipedia Diwali असा एसएमएस या क्रमांकावर पाठविता येईल . क्रिकेटविषयी माहिती हवी असल्यास @cricket असा एसएमएस पाठविल्यानंतर ,त्यावेळी सुरू असणा - या सर्व मॅचेसची माहिती सहज मिळू शकेल . अगदी एखाद्या शहरातील दोन ठिकाणांमध्ये जाण्यासाठी ऑटोरिक्षाने किती भाडे होईल , याचा अंदाजही या सेवेतून मिळू शकेल . तर गुगलच्या सेवेवरून तूर्तछोट्या शंकांची उत्तरे मिळत आहेत . कंपनीच्या ९७७३३००००० या क्रमांकावर शंका पाठविल्यास त्याचे उत्तर तुम्हाला येईल . यामध्ये डॉलरचा विनिमय दर , हवामान यासारख्या माहितीचा समावेश आहे . जर इनोजटेक्नॉलॉजीज्वरून माहिती हवी असेल तर अपेक्षित माहितीचा किवर्ड ५५४४४ या नंबरवर पाठवावा लागेल . भारतामध्ये मोबाइलची संख्या वाढत आहे , या क्षेत्राच्या मार्केटनेही उड्डाणे घेतली आहेत . मात्र , इंटरनेटवापरातील अडचणी दूर करण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे . बहुसंख्य हँडसेट हे फक्त कॉल आणि एसएमएस या वापरांसाठीच योग्य आहेत . स्मार्टफोनची संख्या वाढत असली , तरी इंटरनेटसाठीचे योग्य डाटाप्लॅन मिळत नाहीत . तसेच , या दोन्ही अडचणींचे समाधान झाल्यानंतरही , बँडविड्थ आणि महागडे दरयांमुळे या ग्राहकांचे समाधान झालेले नाही . या तीन मुख्य अडचणींमुळे मोबाइलचे इंटरनेट क्षेत्र या कंपन्यांना खुणावत होती आणि त्याचा फायदा उठविण्यासाठी या कंपन्या सज्ज झाल्या आहेत .
© MarathiTech 2024 A Product by BagalTech
© MarathiTech 2024 A Product by BagalTech