एका एसएमएसवर मोबाइल चार्ज
मोबाइल हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. त्यामुळे जेथे जाईल तेथे त्याची सोबत ठरलेलीच . असेअसताना कामाच्या गडबडीत , व्यापात मोबाइल चार्ज करणं चुकून राहून गेलं आणि अचानक बॅटरी डाउनझाल्यास मात्र धांदल उडते . मग मोबाइल चार्ज करण्याची पळापळ ठरलेलीच . आता मात्र या पळापळीला एकसोपा पर्याय उपलब्ध झाला आहे . फक्त एक टेक्स्ट एसएमएस पाठवायचा की बॅटरी चार्ज्ड ! बुचकळयात पडलात ना ? पण हे खरंच आहे . लंडनस्थित ' बफेलो ग्रिड ' नामक कंपनीने सौर ऊर्जेवर आधारितमोबाइल चार्जिंग स्टेशनची कल्पना प्रत्यक्षात आणली आहे . या चार्जिंग स्टेशनचा वापर करण्यासाठी फक्त एकएसएमएस पाठविण्याची आवश्यकता आहे . मात्र हा पर्याय सध्या युगांडा येथील मोबाइलधारकांना उपलब्धअसून जगभरात पोहोचायचा आहे . आफ्रिका आ णि आशिया खंडात दिवसेंदिवस मोबाइलधारकांचे प्रमाण वाढत आहे . त्यातही शहरी भागापेक्षाग्रामीण भागात विजेचा खेळखंडोबा असल्याने तेथील मोबाइलधारकांना हे स्टेशन वरदानच ठरणार आहे . 'बफेलो ग्रिड ' ने या तंत्रज्ञानाचा वापर सर्वप्रथम आफ्रिकेतील युगांडा या देशात केल्याचे वृत्त ' न्यू सायंटिस्ट ' नेदिले आहे . चार्जिंग स्टेशनमध्ये साठविण्यात आलेली उर्जा मोबाइलच्या बॅटरीला ' मॅक्सिमम पॉवर पॉइंट ट्रॅकिंग 'या ( एमपीपीटी ) तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्राप्त होणार असल्याचेही ' न्यू सायंटिस्ट ' ने म्हटले आहे . मात्र ,तत्पूर्वी वर म्हटल्याप्रमाणे एक टेक्स्ट एसएमएस या ' ग्रिड ' ला पाठविणे आवश्यक आहे . हे सौर स्टेशन ६० वॉटक्षमतेचे आहे . हे स्टेशन तयार करण्यासाठी सर्व प्रकारच्या पर्यावरणाच्या निकषांचे पालन करण्यात आल्याचेहीकंपनीने म्हटले आहे . मात्र , मोबाइलचे चार्ज होणे सर्वस्वी स्टेशनच्या परिसरातील तापमान आणि सूर्याचाप्रकाश यावर अवलंबून असल्याचे ' बफेलो ग्रिड ' ने स्पष्ट केले आहे . ' एमपीपीटी ' ला जोडण्यात आलेले कम्प्युटर्सतापमान आणि त्यातील बदल यांची निरीक्षणे नोंदवणार आहेत . जेणेकरून यूजरना बॅटरी चार्ज होण्यासाठीलागणारा वेळ आणि शक्यता यांची माहिती मिळणार आहे . कशी चार्ज होईल बॅटरी ? युगांडातील मोबाइलधारकांना बॅटरी चार्ज करण्यासाठी ( एका एसएमएससाठी ) ११० शिलिंग ( भारतीयचलनात दोन रुपये ) खर्च येतो . स्टेशनला मेसेज आल्यानंतर मोबाइलमधील बॅटरी सॉकेटशी स्टेशन जोडण्यातयेते आणि नेहमीप्रमाणे बॅटरी चार्ज होण्यासाठी तयार असल्याचा संकेत दिला जातो . पण संबंधित मोबाइलचीबॅटरी चार्ज होण्यासाठी दीड तासांचा अवधी लागत असल्याचेही ' न्यू सायंटिस्ट ' ने म्हटले आहे . युगांडामधील हेस्टेशन पूर्ण चार्ज झाल्यानंतर तीन दिवस कार्यरत राहू शकते आणि दिवसाला ३० ते ५० मोबाइल चार्जिंगचीत्याची क्षमता आहे .