Tag: Samsung

सॅमसंगचा एस-4 मोबाइल बाजारात दाखल

सॅमसंगचा एस-4 मोबाइल बाजारात दाखल

कोरियन कंपनी सॅमसंगने गॅलक्सी श्रेणीतील चौथ्या पिढीचा एस-4 हा मोबाइल हँडसेट शुक्रवारी गुडगाव येथे सादर केला. फीचर्स : प्रोसेसरनिहाय दोन मॉडेल्स. ...

निकृष्ट दर्जाचा मोबाईल विकण्याबद्दल ‘सॅमसंग’ला न्यायालयाचा दणका

निकृष्ट दर्जाचा मोबाईल विकण्याबद्दल ‘सॅमसंग’ला न्यायालयाचा दणका

१८ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याबरोबरच नवा अ‍ॅडव्हान्स फोन देण्याचेही आदेश जोगेश्वरी येथील रहिवाशी रिझवान खत्री यांनी ३१ डिसेंबर २०११ रोजी ...

स्टायलिश… ‘स्मार्ट टीव्ही’

आपल्याकडे सणासुदीचे विशेष महत्व आहे. याच सणासुदीच्या नि​मित्ताने हल्ली इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस घरी आणण्याचा ' ट्रेंड ' वाढीस लागला आहे. इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेसच्या बाजारात वर्षभर कायम ...

राज्य टॅबलेटचं : २०१३मधील टॉप टेन टॅबलेट्स

तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात येत्या वर्षात टॅबलेटचे राज्य असेल , हे सांगायला आता कोणा तज्ज्ञाचीही गरज पडणार नाही. व्यावसायिक उपयोगाबरोबरच खासगी उपयोगासाठीही सर्वत्र टॅबलेटचा वापर सुरू होणार हे आजूबाजूच्या परिस्थितीवरून दिसू लागले आहे . पण सर्वच टॅबलेट कंपन्यांना या ट्रेंडचा लाभ उठवता येणार नाही . सध्या तरी अॅपल , सॅमसंग , गुगल यांसारख्याच कंपन्या या मार्केटवर वर्चस्व गाजवणार हे स्पष्ट आहे . त्यामुळे ओळख करून घेऊया २०१३मधील टॉप टेन टॅबलेट्सची ...  गुगल नेक्सस १०  चालू वर्षात नेक्सस १० हा आयपॅडला टक्कर देणारा सर्वात आघाडीचा टॅब असणार आहे . चांगल्या तऱ्हेने डिझाइन केलेला हा गुगलचा एक उत्कृष्ट टॅब आहे . याची १० इंची स्क्रीन अनेक युजर्ससाठी खूपच फायद्याची ठरणार आहे . अँड्रॉइडच्या अत्यंत अद्ययावत व्हर्जनसह येणारा हा टॅब जुन्या किंवा कमी सुरक्षित ऑपरेटिंग सिस्टीमचा तिटकारा असणाऱ्यांसाठी आकर्षण ठरणार आहे .  सॅमसंग गॅलेक्सी टॅब २  सॅमसंग गॅलेक्सी टॅब २मध्ये अनेक पर्याय उपलब्ध असल्याने ग्राहकांमध्ये नेमका कोणता घ्यावा , याविषयी गोंधळ निर्माण होऊ शकतो . तरीही हा एक उत्तम टॅब आहे . ७ इंची किंवा १० . १ इंची स्क्रीनमधून निवडण्याचा पर्याययामध्ये उपलब्ध आहे . दोन्हींमध्ये केवळ वायफाय असणारा किंवा ४ जीवर चालणारा पर्याय उपलब्ध आहे .त्यामुळे हा एक अतिशय चांगला टॅब असून त्याच्या बलस्थानांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही .  अॅमेझॉन किंडल फायर एचडी ८ . ९  ७ इंची आणि ९ - १० इंची टॅबलेटच्या दरम्यानचा हा एक चांगला टॅब आहे . याची किंमत जरा जास्त असली ,तरी त्यातील फीचर्सही तितकेच आकर्षक आणि उपयुक्त आहेत . अँड्रॉइडवर चालणारा अतिशय उत्तमरित्या डिझाइन केलेला किंडल तसाच दर्जेदारही आहे . सोबतच त्याचे अॅप स्टोअर थेट गुगलच्या प्ले स्टोअरला टक्कर देते. त्यामुळे या वर्षात किंडलला यश मिळणारच .  गुगल नेक्सस ७  नुकताच प्ले स्टोअरवरून भारतात दाखल झालेला गुगलचा नेक्सस ७ हा ७ इंची श्रेणीतील सर्वोत्कृष्ट टॅब आहे .जेलीबिनवर चालणार हा टॅब अतिशय सुरेख डिझाइनमध्ये उपलब्ध आहे . नेक्सस हा या श्रेणीतील एक अतिशय परवडणारा टॅब आहे .  बार्नेस अँड नोब नूक एचडी प्लस  भारतीयांना तुलनेने कमी माहिती असलेला हा टॅब त्याच्या श्रेणीतील किमतींना अगदी योग्य न्याय देणार आहे .२६ जीबी मेमरीसह मिळणाऱ्या या टॅबमध्ये १९२० बाय १२८० इतके फुल एचडी रिझोल्यूशन मिळते .वाचनाची आवड असणारे तर बार्नेस अँड नोबलच्या इ - बुक लायब्ररीला धन्यवादच देतील . किंडलला हा एक उत्तम पर्याय आहे .  आयपॅड मिनी  काहीजण आयपॅड मिनीला टॅबलेटच्या क्षेत्रातील चमत्कार मानतात . ७ . ९ इंची स्क्रीन असलेला मिनी मूळ आयपॅडपेक्षा खूप लहान आहे . पण तरीही त्यात आयओएसचा पूर्ण अनुभव मिळतो , जो अॅपलच्या अनेक चाहत्यांचा वीक पॉइंट आहे . सोबतच हा भल्यामोठ्या स्क्रीनच्या टॅबलेटपेक्षा पुष्कळसा मोबाइलच वाटतो .  सॅमसंग गॅलेक्सी नोट १० . १  गॅलेक्सी नोट १० . १ हा व्यावसायिक आणि वैयक्तिक अशा दोन्ही प्रकारच्या युजर्सचा आवडता टॅबलेट ठरला आहे. १० . १ इंची भलीमोठी स्क्रीन , दमदार प्रोसेसर आणि यातील इतर काही फीचर्स ग्राहकांना खूप आवडतात .यात असलेल्या अनेक गोष्टी इतर कुठल्याही टॅबलेटमध्ये मिळत नसल्याने गॅलेक्सीला यंदाही चांगला प्रतिसादमिळेल .  मायक्रोसॉफ्ट सरफेस प्रो  लोकांच्या नजरा वळलेल्या अनेक टॅबलेट्सपैकी हा एक . विंडोज ८ चालेल का ? युजर फ्रेंडली आहे का ? असे एक ना अनेक सवाल उठविले जातात . त्यामुळे लोकांच्या वळलेल्या नजरांचा अजून तरी कंपनीला फायदा झालेलानाही . पण हा एक अतिशय उत्तमरित्या तयार करण्यात आलेला टॅब असून येत्या वर्षात मायक्रोसॉफ्टचे चाहते त्याकडे अवश्य वळतील .  आयपॅड  आयपॅड या नावातच सर्व काही आले . टॅबलेटच्या जगाला दिशा देण्याचे कामच अॅपलने केले . त्यामुळे टॉप१०मध्ये आयपॅड असणे स्वाभाविकच आहे . हा आतापर्यंतचा सर्वाधिक खपलेला टॅबलेट आहे . आता ,आयपॅडला सध्या उपलब्ध असलेला बेस्ट टॅबलेट म्हणायचे किंवा नाही , हा वादाचा विषय असू शकतो , पण तरीही तो टॉपमध्ये राहणारच .  असूस ट्रान्सफॉर्मर पॅड इन्फिनिटी  ...

Page 20 of 26 1 19 20 21 26
ADVERTISEMENT
error: Content is protected!