गुगल प्ले स्टोअरचे पर्याय
अॅपलच्या युझर्सना केवळ अॅपल स्टोअरमधून अॅप डाऊनलोडकरण्याची मुभा आहे . पण अँड्रॉइडचे तसे नाही . ओपन सोर्सअसल्याने गुगल प्ले स्टोअरसोबतच इतरही अनेक ठिकाणाहून अॅप्स डाऊनलोड करता येतात . या ठिकाणाहूनअॅप्स डाऊनलोड करण्यात तसा फार धोका नाही . गुगलने त्यांच्या ऑपरेटिंग सिस्टीमच्या युझर्सला सुविधादेण्याची परवानगी त्यांना दिली यातच खूप काही आले . गेट जार अब्जावधी डाऊनलोड्समुळे गेट जार अनेक प्रस्थापित अॅप्स स्टोअरसाठी आव्हान म्हणून समोर आले आहे .याठिकाणी फोनच्या प्रकारानुसार अॅप्स फिल्टर करण्याची सुविधा उपलब्ध आहे . जगभरात सर्वत्र उपलब्धअसल्यामुळे अनेक डेव्हलपर याला प्राधान्य देतात . आजकाल काही डेव्हलपर्सला आर्थिक सहाय्य देण्यासही गेटजारने सुरुवात केली असून त्यांच्या अॅप्स मात्र ग्राहकांना मोफत वितरीत केल्या जातात . याठिकाणी ब्लॅकबेरीआणि विंडोज मोबाइलसाठीच्या अॅप्सही उपलब्ध आहेत . अॅप ब्रेन अॅप ब्रेन हे अँड्रॉइड मार्केट ब्राऊझरला पर्याय म्हणून उपलब्ध आहे . त्यामुळे याठिकाणी अॅप्सची थेट विक्री होतनाही . मात्र , सर्च आणि विविध आकर्षक पर्यायांमुळे अनेक जण याकडे आकर्षित होतात . याठिकाणी मोफत , पेड, नव्याने दाखल झालेले , अपडेट केलेले अशा प्रकारचे फिल्टरचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत . मात्र , यातीलकाही अॅप्स व्हर्जननुसार देण्यात आले असून त्यामुळे काही अमेरिकेबाहेर डाऊनलोड करता येत नाहीत . स्लाइड मी सॅम (SAM) या अॅप्लिकेशनद्वारे अँड्रॉइड युझर्स स्लाइड मी वरील अॅप्स ब्राऊज आणि डाऊनलोड करू शकतात .याठिकाणी छोट्या आणि उदयोन्मुख डेव्हलपर्सवर विशेष लक्ष दिले जात असल्याने नवीन काहीतरी याठिकाणीपहावयास मिळू शकते . या ठिकाणी पेड आणि फ्री अशी दोन्ही प्रकारची अॅप्स उपलब्ध आहेत . अॅप्सफायर अॅप्सफायर स्वतः कुठल्याही प्रकारचे अॅप्स देत नाही . केवळ अधिकृत अॅप्स स्टोअरचे सहयोगी म्हणून हे कार्यकरते . तुमच्या नेहमीच्या वापराच्या अॅप्लिकेशनवरून हे तुमच्यासाठी काही अॅप्स सुचवतेही . हे सुचविलेले अॅप्ससोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून तुम्ही इतरांसोबत शेअर करू शकतात . याठिकाणी निवडक तज्ञांनी अॅप्सलादिलेल्या रेटिंगच्या आधारे त्यांची लोकप्रियता ठरविली जाते . तसेच , मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या ऑफरअॅप्सवर देण्यात येतात . अप्रूव्ह अप्रूव्ह हे नव्यानेच सादर करण्यात आलेले अॅप्स स्टोअर असून त्याचे प्रमुख लक्ष अँड्रॉइड अॅप्स आहे . याठिकाणीविविध कॅटेगरीजमधून अॅप्स पाहता येतात . युझर्सच्या सूचना , रिव्ह्यू , व्हिडीओ अपलोड यासारख्या गोष्टीयाठिकाणी करता येतात . तुलनेने हे नवीन मार्केट असल्याने याला युझर्सचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणेउत्सुकतेचे ठरेल . याव्यतिरीक्त मोबिहँड म्हणूनही एक अॅप्स स्टोअर बऱ्याच काळापासून उपलब्ध होते .याठिकाणी विविध अॅप्सवर अनेक प्रकारचे डिस्काऊंड मिळत होते . अॅपसह विविध अॅक्सेसरीजचीही विक्रीयाठिकाणी होत होती . मात्र , दोन - तीन महिन्यांपूर्वी त्यांनी ही साइट बंद केली .