Tag: Operating Systems

फायरफॉक्सचीही मोबाइल ऑपरेटिंग सिस्टिम

गेल्या दोन वर्षांत मोबाइल डिव्हाइसमध्ये कोणाचे राज्य निर्माण झाले , असा प्रश्न विचारल्यास उत्तर अँड्रॉइड डिव्हाइस असे आहे. ओपन ऑपरेटिंग प्लॅटफॉर्म असल्याने ...

अँड्रॉइडला दोन नवे पर्याय? फायरफॉक्स आणि उबंटू ऑपरेटिंग सिस्टीम

फीचर फोनवरून स्मार्टफोनपर्यंत झालेला प्रवास हा गॅजेट प्रेमींसाठी सुखद राहिला. स्मार्टफोनच्याही पुढे आता तो सुरू झाला आहे. स्मार्टफोन लोकप्रिय ठरण्यासाठी ...

भारतीय ऑपरेटिंग सिस्टीम

तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारतीयांनी खूप मोठी झेप घेतली आहे. विंडोज , लिनक्स , अँड्रॉइडसह विविध ऑपरेटिंगसिस्टीमच्या विकासात हातभार लावला आहे . पण संपूर्ण भारतीय ऑपरेटिंग सिस्टीम बनविण्यात भारताला अद्याप यश आलेले नाही . पण येत्या तीन वर्षांत ही गोष्ट साध्य होऊ शकते . संरक्षण संशोधन व विकास संस्थाअर्थात डीआरडीओ इतर काही संस्थांच्या मदतीने यावर काम करते आहे . बाहेरील देशातून विंडोज , लिनक्स यासारख्या ऑपरेटिंग सिस्टीम आयात केल्याने व्हायरसचा धोका असतो .त्यामुळे आपली स्वतःची ऑपरेटिंग सिस्टीम असणे अनिवार्य असल्याचे डीआरडीओचे प्रमुख व्ही . के . सारस्वतम्हणाले . नवीन ऑपरेटिंग सिस्टीम विकसित करण्याचे काम गेल्या दीड वर्षांपासून सुरू असून त्याला मोठ्याप्रमाणात सॉफ्टवेअर इंजिनीअरची गरज लागणार आहे . सध्या देशभरातील १५० इंजिनीअर्स यावर काम करतअसून संपूर्ण भारतीय ऑपरेटिंग सिस्टीम पूर्ण व्हायला आणखी तीन वर्षं लागतील . विशेष म्हणजे यासाठी कुठल्याही प्रकारची परदेशी मदत घेतली जाणार नाही . त्यामुळे देशातील उद्योग , संशोधक , वैज्ञानिकांनीडीआरडीओ आणि इतर वैज्ञानिक विभागांच्या साथीने या कामाला हातभार लावावा . त्यामुळे पूर्णपणे स्वायत्तहोणे भारताला शक्य होईल , असे आवाहन त्यांनी केले . यापूर्वीही भारतीय ऑपरेटिंग सिस्टीम तयार करण्याचे काही प्रयत्न झाले होते . तामिळनाडूतील लोयोला इंजिनीअरिंग कॉलेजचा विद्यार्थी दीपक जॉन यानेही गेल्या वर्षी मायक्रोस ( मोबाइल इनक्युर्ड रिव्होल्युशनाइज्ड ऑपरेटिंग सिस्टीम ) ही ऑपरेटिंग सिस्टीम तयार केली होती . दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या दीपकची सिस्टीम क्रॅश झाल्याने त्याला ही प्रेरणा मिळाली होती . १०० एमबी आकाराची ही ओएस त्याने क्लाऊडवर तयार केली होती. त्यामुळे पेनड्राइव्हमधूनही ती वापरता येत होती . त्यासाठी कुठल्याही प्रकारच्या इन्स्टॉलेशनची गरज नव्हती पण सिस्टीममध्ये साठविलेल्या विविध फाइल्स यामध्ये अॅक्सेस करता येत होत्या व त्यावर कामंही करता येत होती . त्याने यामध्ये ओपन ऑफिसही दिले होते . यावर इंटरनेट आणि विंडोजवरील विविध अॅप्लिकेशन वापरता येतात . कम्प्युटर बंद केल्यावर त्यातील रॅममध्ये असणारी या संदर्भातील सर्व माहिती डिलीट होत असल्याने युझर्सला त्यांची गोपनीयता जपता येत होती .

आठव्या खिडकीत डोकावताना विंडोज ८ नाविन्य

कम्प्युटर ऑपरेटिंग सिस्टिमची मक्तेदारी असलेल्या मायक्रोसॉफ्टने ' विंडोज ८ ' च्या माध्यमातून कम्प्युटर वापराला नवा आयाम दिला आहे. यामुळे कम्प्युटर वापरातील धम्माल आणखी वाढणार ...

अँड्रॉइड धोक्यात येईल का ?

अँड्रॉइड धोक्यात येईल का ?

विंडोज ८  लॉचिंग अनेक गोष्टी पुन्हा चर्चेत आल्या आहेत . यामुळे अँड्रॉइड धोक्यात येईल का ? ग्राहक पुन्हा कम्प्युटर खरेदीकडे वळतील का ? विंडोजकडे पुरेसे अॅप्स आहेत का ? या प्रश्नांवर जगभरातील तज्ज्ञ चर्चा करत आहेत . मायक्रोसॉफ्टसह गुगलचे भवितव्यच नव्या लाँचवर अवलंबून असल्याने या चर्चा होणे स्वाभाविक आहे . अॅपलचे टॅबलेट मार्केटमधील स्थान मजबूत असल्याने त्यांचा याचा फरक पडणार नसला तरी सॅमसंग , आसुस , तोशिबा यासारख्या अँड्रॉइड टॅबलेट बनविणा - या कंपन्यांनी विंडोज ८ टॅबलेटच्या निर्मितीची तयारी करून स्वतःचे स्थान डळमळीत होणार याची काळजी घेण्यास सुरूवात केली आहे . आयपॅड नको असलेल्यांसाठी सध्या अँड्रॉइड टॅबलेटचा पर्याय उपलब्ध असला तरी त्याची विक्री म्हणावी तितकी नाही . गेल्यावर्षी लॉँच झाला तेव्हा गॅलेक्सी टॅब १० . १ हा आयपॅडला उत्तम टक्कर देईल अशी चर्चा होती . मात्र अॅपल विरुद्धच्या खटल्यात सॅमसंगने नमूद केलेल्या माहितीनुसार अमेरिकत केवळ ७ लाख १२ हजार गॅलेक्सीटॅबची विक्री झाली आहे . कंपन्यांनी निर्यात केलेल्या सर्व प्रकारच्या अँड्रॉइड टॅबलेट्सचे आकडे खूप मोठे दिसतअसले तरी कित्येक टॅब विक्रेत्यांकडे पडून असल्याचे आयडीसी या संशोधन संस्थेने म्हटले आहे . विडोंज ८ मुळे अँड्रॉइड पूर्णपणे इतिहासजमा होणार नाही हे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे . प्रामुख्याने स्वस्तातीलआणि ७ ते १० इंच आकारात उपलब्ध असलेल्या नॉन ब्रँडेड अँड्रॉइड टॅबलेटच्या विक्रीवर फारसा परिणाम होणार नाही अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे . ग्राहक प्रामुख्याने गेम खेळणे , व्हीडिओ पाहणे , गाणी ऐकणे , इंटरनेट अॅक्सेस यासारख्या गोष्टींसाठी अँड्रॉइड टॅबलेट वापरतील असे गार्टनरच्या कॅरोलिना मिलानेसी म्हणतात .हार्डवेअर उत्पादकांनी अॅपलच्या व्यतिरिक्त दुसरी कंपनी टॅबलेट निर्मितीस परवानगी देईल या आशेने अँड्रॉइडसाठी गुगलबरोबर करार केला होता . मात्र आता त्यांनी मायक्रोसॉफ्टसोबतही हातमिळवणी केली आहे . अँड्रॉइडचे एक बलस्थान म्हणून अॅप्सकडे पाहिले जाते . सध्या गुगल प्ले स्टोअरवर ६ . ७५ लाखाहून अधिक अॅप्सउपलब्ध आहेत . त्याचवेळी मायक्रोसॉफ्टने अजून अॅप स्टोअरची घोषणा केलेली नाही . मात्र विंडोजकडे अँड्रॉइडच्या कितीतरी पट अधिक अॅप्स असल्याचे तज्ज्ञ सांगतात . गुगलनेही विंडोज ८ चा धोका लक्षात घेऊन आता अॅप्स डेव्हलपर्ससाठी नवे दिशानिर्देश जाहीर केले आहेत . कारण हेच डेव्हलपर विंडोज ८ साठीही अॅप तयारकरणार आहेत . 

Page 10 of 11 1 9 10 11
ADVERTISEMENT
error: Content is protected!