Tag: Microsoft

स्कायड्राइव्हचं ऑफिस : मायक्रोसॉफ्ट ऑफिस ३६५

एमएस ऑफिस आणि कम्प्युटर यांचे एक अनोखे नाते . परंतु मध्यंतरीच्या काळात ओपन ऑफिस आणि गुगल डॉक यांनी मायक्रोसॉफ्टला शह देण्याचा प्रयत्न केला . तो प्रयत्नतितकासा यशस्वी झाला नसला तरी मायक्रोसॉफ्टला या दोन्ही उत्पादनांतील सुविधांचा विचार करून एमएस ऑफिसमध्ये बदल करणे क्रमप्राप्त झाले . ऑफिस २०१०मध्ये पूर्वीपेक्षा अनेक सुधारणा करण्यात आल्या होत्या .मात्र त्याही पलीकडे जाऊन काही सुधारणा आवश्यक होत्या म्हणून मायक्रोसॉफ्टने नुकतेच ऑफिस ३६५ लाँचकेले आहे . यामध्ये वर्ल्ड , एक्सेल , पॉवर पॉइंट , वन नोट , आऊटलूक , पब्लिशर अॅण्ड अॅक्सेस याचबरोबर २०जीबीपर्यंतचा स्कायड्राइव्ह स्टोअरेज मिळणार आहे .  मायक्रोसॉफ्ट ऑफिसचं हे व्हर्जन आपल्याला मासिक किंवा वार्षिक सबस्क्रिप्शन भरून वापरू शकतो . याचावापर आपण एकावेळी पाच कम्प्युटर्स आणि पाच मोबाइल्समध्ये वापरू शकतो . आजपर्यंत ऑफिसची अशाप्रकारची कोणतीही सुविधा नव्हती . मायक्रोसॉफ्ट वेब अॅपच्या माध्यमातून आपण हे ऑफिस वापरू शकतो .याचा वापर करणाऱ्या प्रत्येकाला मायक्रोसॉफ्ट आऊटलूक ही नवी मेल सुविधाही वापरता येणार आहे . तसेच मायक्रोसॉफ्टच्या वन नोट या नवीन सुविधेचा वापरही या ऑफिसच्या माध्यमातून करता येईल . वन नोट म्हणजे आपण आपली कामे यामध्ये स्टोअर करून ठेऊ शकतो . तसेच काही वाक्य जी आपण नेहमी आपल्या लिखाणात वापरत असतो ती वाक्यही सेव्ह करून ठेवता येतील .            ऑफिसच्या या व्हर्जनची आणखी एक खासियत म्हणजे यामध्ये आपल्याला स्कायड्राइव्ह वापरायला मिळणार आहे . या स्कायड्राइव्हमध्ये आपल्याला २० जीबीपर्यंतचा डेटा स्टोअर करता येणार आहे . यासाठी आपल्याला वेगळे पैसे मोजावे लागणार नाहीत . ते आपल्या ऑफिसच्या पॅकेजमध्येच मिळते . सध्या याचे ट्रायल व्हर्जन ३० दिवसांसाठी मोफत उपलब्ध आहेत . यापुढे येणाऱ्या विंडोज८ च्या सर्व कम्प्युटर्सवर ऑफिस ३६५ इंस्टॉल अॅप्लिकेशन म्हणून असेल . ऑफिसच्या या व्हर्जनमध्ये आपल्याला थर्ड पार्टी अॅप्स वापरता येणार आहे . यामध्ये पीडीएफ हे सर्वात उपयुक्त अॅप वापरता येईल . यामध्ये विंडोज७ प्रमाणेच आपण फाइल पीडीएफ फॉरमॅटमध्ये सेव्ह करू शकतो . याशिवाय लवकरच यामध्ये भारतीय युजर्सना उपयुक्त ठरतील असे रिड अॅण्ड राइटचे २०० अॅप्स येतील , असे मायक्रोसॉफ्टने स्पष्ट केले आहे . यामध्ये ऑफिसहोम , स्टुडंट आणि प्रिमियम असे तीन व्हर्जन्स उपलब्ध आहेत .

आठव्या खिडकीत डोकावताना विंडोज ८ नाविन्य

कम्प्युटर ऑपरेटिंग सिस्टिमची मक्तेदारी असलेल्या मायक्रोसॉफ्टने ' विंडोज ८ ' च्या माध्यमातून कम्प्युटर वापराला नवा आयाम दिला आहे. यामुळे कम्प्युटर वापरातील धम्माल आणखी वाढणार ...

स्मार्ट ‘विन्डोज ८’

स्मार्ट ‘विन्डोज ८’

बाजारात दररोज कितीही वेगवेगळी उपकरणे दाखल झाली तरी त्यामध्ये सर्वप्रथम पाहिली जाणारी गोष्ट म्हणजे ऑपरेटींग सिस्टिम. मोबाईल, टॅब्लेट, पीसी यामध्ये ...

आठवी खिडकी उघडली!

आठवी खिडकी उघडली!

कम्प्युटर , स्टायलसवर आधारित स्मार्टफोन , टचस्क्रीन फोन, टॅब्लेट पीसी , लॅपटॉप आदी सर्व आधुनिक युगातील संदेशवहन आणि माहितीसाठा करणाऱ्या गॅजेट्सना पूरक ठरणारी बहुचर्चित ' विंडोज ८ ' ही नवी ऑपेरेटिंग सिस्टिम गुरुवारी मायक्रोसॉफ्ट कंपनीने बाजारात आणली .  विंडोज यूजरना ' विंडोज ८ ' साठी अपग्रेड करणे शक्य होणार असून, तशी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे .  या नव्या सिस्टिममुळे संधीची नवी खिडकी उघडण्याबरोबरच तंत्रज्ञान क्षेत्रात कंपनी पुन्हा एकदा झेपावेल , अशी अपेक्षा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ( सीईओ ) स्टीव्ह बालमेर यांनी व्यक्त केली . विंडोज अपग्रेडची सुविधा ३९ . ९९डॉलरपासून उपलब्ध असेल , असे कंपनीच्या विंडोज विभागाचे अध्यक्ष स्टीव्हन स्निफेस्की यांनी जाहीर केले  . गॅजेटप्रेमींसाठी खुशखबर आहे. ती म्हणजे जगातील अग्रेसर आयटी कंपनी 'मायक्रोसॉफ्ट'ने भारतात 'विंडोज- 8' लॉन्च केले आहे. गेल्या ...

वेबसाइट खेळ होणार मल्टिडायमेन्शनल

वेबसाइट खेळ होणार मल्टिडायमेन्शनल

इंटरनेटच्या महाजालातील वेबसाइट मल्टिडायमेन्शनल व्हाव्यात , यासाठी मोठ्या प्रमाणावर चाललेल्या प्रयत्नांना लवकरच मूर्त रूप मिळणार असून ' मल्टिडायमेन्शनल वेबसाइट्स ' ही संकल्पना लवकरच प्रत्यक्षात येणार आहे .२६ ऑक्टोबरला सादर होणारे इंटरनेट एक्स्प्लोअरर १० आणि विंडोज ८ यांच्या वेगवेगळ्या फीचर्सची झलक 'कॉन्टर जूर ' या गेमने नुकतीच दाखवली . केवळ स्मार्टफोन आणि टॅब्लेटमध्येच असणाऱ्या या गेमने आता वेबवर एन्ट्री केली आहे . त्यामुळे अॅप्सना वेबचे दरवाजे खुले झाले आहेत . टचस्क्रीनचा समावेश असल्याने वेबवर हा गेमखेळताना नक्कीच वेगळ्याच विश्वात गेल्यासारखे वाटेल .  ' कॉन्टर जूर ' हा खेळ म्हणजे वेबची मजल कुठपर्यंत जाईल याची झलक आहे , अशी प्रतिक्रिया इंटरनेट एक्स्प्लोअररचे जनरल मॅनेजर रायान गाविन यांनी दिली . अॅप्सप्रमाणेच वेबसाइट या अधिक ' यूजफूल ' असतात, हे दाखवण्यासाठी ' मायक्रोसॉफ्ट ' ने ' आयफोन ' आणि ' आयपॅड ' वरील ' कॉन्टर जूर ' हा गेम ' ऑनलाइन 'स्वरुपात आणला आहे . इंटरनेट एक्स्प्लोअरर १० चे वेब ब्राउझिंग कसे असेल , याचाही अंदाज त्यांनी त्यामधूनदिला आहे .  हा गेम भौतिकशास्त्रावर आणि ' द लिटल प्रिन्स ' या कादंबरीवर आधारित आहे . व्हिडिओ गेमच्या धर्तीवर असलेल्या बटनांद्वारे त्यांनी खेळ खेळून दाखवला . जमिनीचा काही भाग वर किंवा खाली करून त्यांनी यागेममधील ' पेटिट ' या कॅरॅक्टरला त्या अडथळ्यांवरून जायला सांगितले . विंडोज ८ वर आयई १०च्या सहाय्यानेया गेमचे अतिशय उत्कृष्ट असे सादरीकरण झाले . जवळपास दोन्ही हातांच्या सर्व म्हणजे दहा बोटांनी एकाच वेळी कमांड दिली , तरी त्याची अमलबजावणी करण्याची क्षमता या प्रोग्रॅममध्ये आहे . गेमच्या तिसऱ्या लेव्हलला खेळताना प्लेयरला टच स्क्रीनवर किमान तीन बोटांचा वापर करावा लागतो . हा खेळ ऑनलाइन होणे म्हणजे स्मार्टफोन आणि टॅब्लेटमधील ' अॅप्स ' ना वेबचे दरवाजे खुले होण्यासारखेच आहे . यासंदर्भात गाविन म्हणाले ,आजचे वेब हे उद्याचे नसेल . अधिकाधिक सुंदर , आकर्षक वेबसाइट्स लोक पाहत जातील . यामध्ये टच स्क्रीनचाही समावेश असेल . वेब हे आजच्यासारखे ' वन डायमेन्शनल ' नसेल , हे लोकांना दाखवून देण्याचेच आमचे काम आहे. मात्र टच स्क्रीनचा वापर आला , तरी ब्राउझिंगसाठी माऊसवर अवलंबून राहावे लागणार आहे , अशी खंत त्यांनी व्यक्त केली .

Page 15 of 17 1 14 15 16 17
ADVERTISEMENT
error: Content is protected!