Tag: Microsoft

विंडोजची निळाई : मायक्रोसॉफ्ट विंडोज

' मायक्रोसॉफ्ट विंडोज ' हा शब्द कधीही कम्प्युटर नहाताळलेल्या व्यक्तीलाही माहिती असेल . मायक्रोसॉफ्टनेएमएस - डॉसचे विस्तारक म्हणून २० नोव्हेंबर , १९८५ रोजी ' विंडोज ' नामक ऑपरेटिंग सिस्टिम आणली .१९८४ मध्ये सादर झालेल्या ' अॅपल ' च्या ' मॅकिंटॉश ' ला मागे टाकत विंडोजने पर्सनल कम्प्युटर ( पीसी )बाजार काबीज केला आहे . ऑक्टोबर २०११ च्या माहितीनुसार ग्राहक संचालन प्रणालीच्या बाजारात नव्वदटक्क्याहून जास्त वाटा विंडोजचा आहे . पर्सनल कम्प्युटर , ' विंडोज ७ ', सर्व्हरसाठी ' विंडोज सर्व्हर २००८आरटू ' व मोबाइल फोनसाठी ' विंडोज फोन ८ ' या विंडोजच्या सर्वात नवीन आवृत्त्या आहेत . आता मायक्रोसॉफ्ट' विंडोज ब्ल्यू ' या नावाने नवीन ऑपरेटिंग सिस्टिम बाजारात आणत आहे . यानिमित्ताने मायक्रोसॉफ्टच्याऑपरेटिंग सिस्टिमच्या प्रवासाचा अक्षय पेंडभाजे यांनी घेतलेला हा आढावा .  विंडोजचा इतिहास  विंडोजचा इतिहास जाणून घेण्यासाठी आपल्याला सप्टेंबर १९८१ पर्यंत मागे जावे लागते , जेव्हा ' इंटरफेसमॅनेजर ' हा प्रकल्प सुरू झाला . तो ' विंडोज ' या नावाने नोव्हेंबर १९८३ मध्ये घोषित झाला खरा , पण नोव्हेंबर१९८५ पर्यंत ' विंडोज ' प्रकाशित झाली नाही . ' विंडोज १ . ० ' चे बाह्यावरण ' एमएस - डॉस एक्झिक्युटिव्ह 'नावाचा प्रोग्रॅम होता . कॅल्क्युलेटर , कॅलेंडर , कार्डफाइल , क्लिपबोर्ड दर्शक , घड्याळ , कंट्रोल पॅनल , नोटपॅड ,पेंट , रिव्हर्सी , टर्मिनल , राइट हे इतर पुरवलेले प्रोग्राम होते .  विंडोज ३ . ० व ३ . १  विंडोज ३ . ० ( १९९० ) व ३ . १ ( १९९२ ) या ऑपरेटिंग सिस्टिम खऱ्या अर्थाने व्यावसायिक दृष्ट्या यशस्वीहोत्या . अॅपल विरुद्ध विंडोज या युद्धाच्या सुरुवातीला अॅपलच्या ओएसला टक्कर देण्यासाठी विंडोजने नवीनजीयूआय , इंटेलचा ८०२८६ आणि ८०३८६ या सीपीयूना चांगला सपोर्ट या गोष्टी ३ . ० मध्ये , तर ३ . १ मधेविंडोज राजिस्ट्री , ट्रू टाइप फॉन्ट्स , मिनीस्वीपर या गोष्टींचा समावेश केला . विंडोज ३ . १ च्या दोन महिन्यांतएक लाख कॉपीज विकल्या गेल्या .  विंडोज ९५  ' विंडोज ९५ ' ऑगस्ट १९९५ साली प्रकाशित झाली . चार दिवसात एक लाख कॉपीज विकल्या गेल्या , असे हेओएस होते . यात विंडोजने पहिल्यांदाच स्टार्ट बटणचा समावेश केला होता .  विंडोज ९८  मायक्रोसॉफ्टचे दुसरे प्रकाशन ' विंडोज ९८ ' जून १९९८ साली प्रकाशित झाले . मायक्रोसॉफ्टने १९९९ सालीयाचीच दुसरी आवृत्ती प्रकाशित केली . तिचे नाव विंडोज ९८ , सेकंड एडिशन होते . ' विंडोज ९८ एसई ' हात्याचा शॉर्टफॉर्म . या ओएसला जगभरातून चांगला प्रतिसाद मिळाला . थीम सपोर्ट , थंबनेल्स , वन - क्लिकलाँच , गेमिंग साठी डायरेक्ट एक्स ६ . १ , अशा अनेक गोष्टींचा समावेश त्यात करण्यात आला होता .  विंडोज एमई  फेब्रुवारी २००० मध्ये ' विंडोज २००० ' बाजारात आले . या पाठोपाठ लगेजच विंडोज मिलेनियम एडिशन (एमई ) बाजारात आली . ' विंडोज एमई ' ने ' विंडोज ९८ ' कडून गाभा अद्ययावत केला असला , तरी ' विंडोज२००० ' कडूनही काही पैलू अद्ययावत केले व ' बूट इन डॉस मोड ' हा पर्याय काढला .  विंडोज एक्सपी  ' विंडोज एक्सपी ' खासगी कम्प्युटरवर ( गृह , व्यापारी , मीडिया केंद्रांसह ) चालणारी ओएस आहे . २४ ऑगस्ट२००१ रोजी ती प्रथम कम्प्युटर उत्पादकांना मिळाली . कम्प्युटरवर प्रस्थापित केलेली आणि वापरण्याससोयीस्कर अशी ही विंडोजची सध्याची सर्वात लोकप्रिय ऑपरेटिंग सिस्टम आहे . ' एक्सपी ' हे नाव'experience' याचा शॉर्टफॉर्म आहे . निर्मितीपूर्व काळात तिचे सांकेतिक नाव ' व्हिसलर ' असे होते . ' विंडोजएक्सपी ' ची रिटेल विक्री २५ ऑक्टोबर २००१ ला सुरू झाली . जानेवारी २००६ मध्ये ' विंडोज एक्सपी ' च्या४० कोटीहून अधिक प्रती वापरात होत्या , असे एका आयडीसी विश्लेषकाचा अंदाज आहे . ' एक्सपी ' नंतर 'विंडोज व्हिस्टा ' व्यावसायिकांना ६ नोव्हेंबर २००६पासून व सामान्य जनतेला ३० जानेवारी २००७ पासूनमिळू लागली . ...

इंटरॅक्टिव्ह व्हाइटबोर्ड ‘ मायक्रोसॉफ्ट ‘

टेक्नॉलॉजी हा बदलता आणि सतत संधोधनाचा विषय आहे .टेक्नॉलॉजीमघील काही घडामोडी आणि संशोधन पाहिले , की हा ' जादूचाच कारखाना ' वाटावा , इतक्याघडामोडी अत्यंत वेगाने घडताना दिसत आहेत . स्मार्टफोन क्षेत्रात सध्या जी तीव्र स्पर्धा चालू आहे , त्यातून थोडेसेबाहेर डोकावून पाहिले , की सॉफ्टवेअर क्षेत्रातही नवनवे संशोधन चालू आहे आणि त्यासाठी अब्जावधी रुपयांचानिधी खर्च केला जात आहे , हे लक्षात येते . ' मायक्रोसॉफ्ट ' लवकरच ' इंटरॅक्टिव्ह व्हाइटबोर्ड ' लाँच करणारआहे . या प्रॉडक्टची तयारी कंपनीत सध्या जोरात चालू आहे . ' लार्ज स्क्रीन टेक्नॉलॉजी ' प्रकारात हे संशोधन येत असून अशा प्रकारची विविध संशोधने कंपनीमध्ये चालू आहेत . ' मायक्रोसॉफ्ट ' कंपनी तयार करत असलेल्या या संवादात्मक बोर्डमुळे लोकांशी ' संवाद ' साधणे सोपे होणार आहे. हा संवाद म्हणजे संभाषण नव्हे , तर तो असेल प्रेझेंटेशनरूपी संवाद आणि त्यासाठी मदत होणार आहे स्केचेसची. युझरने काही स्केचेस काढले , तर त्यावरून पूर्ण ग्राफिक , चार्ट पूर्ण करता येईल . घरी , ऑफिसमध्ये ; तसेचजवळपास सगळ्याच ठिकाणी या ' इंटरअॅक्टिव्ह व्हाइटबोर्ड ' चा वापर करता येईल . यूझरना त्यांना हव्याअसलेल्या डायग्राम्स तयार करता येतील . प्रेझेंटेशन अधिकाधिक ' इंटरअॅक्टिव्ह ' करण्यासाठी याचा उपयोगहोईल . सध्या ' मायक्रोसॉफ्ट ' चेच पॉवरपॉइंट हे सॉफ्टवेअर प्रेझेंटेशनसाठी अनेक ठिकाणी वापरले जाते . ' टेकफेस्ट ' या कंपनीच्या तंत्रज्ञानाच्या मेळ्यामध्ये हे संशोधन सादर होईल . या ठिकाणी अनेक देशांतील शास्त्रज्ञत्यांचे संशोधन सादर करतात . ' मायक्रोसॉफ्ट ' ही आपले नवीन संशोधन सादर करणार आहे . वर्षातून एकदाहोणाऱ्या या ' टेकफेस्ट ' मध्ये व्हाइटबोर्डचे प्रोटोटाइप सादर केले जाणार आहे . या संशोधनासाठी कंपनीने इतरकंपन्यांच्या तुलनेत मोठा निधी खर्च केला आहे . अब्जावधी डॉलरची गुंतवणूक या संशोधनामागे आहे .  ' टेकफेस्ट ' मध्ये या बोर्डाचे प्रत्यक्ष काम कंपनीच्या वॉशिंग्टनमधील रेडमंड येथील हेडक्वार्टरच्या बोंगशिन लीसादर करतील . एका मोठ्या टचस्क्रीनवर एक इमेज काढली जाईल . ही इमेज आणि प्री - लोडेड डेटा यांचावापर करून ग्राफिक , चार्ट , डायग्राम , नकाशे तयार करता येतील . यासाठी ' डिजिटल कॅनव्हास ' तयार केलाआहे . हा बोर्ड बनवण्याचे काम मायक्रोसॉफ्ट करत असून ' लार्ज स्क्रीन टेक्नॉलॉजी ' मध्ये कंपनी करत असलेल्याअनेक प्रयोगांपैकी हा एक आहे . मायक्रोसॉफ्टच्या या प्रयत्नाला यश आले , तर तंत्रज्ञानामधील ती एक मोठीअचिव्हमेंट ठरणार आहे . 

‘जी-मेल’ने केला प्रायव्हसीचा भंग? ‘ गुगल ‘ ची खेळी संशयास्पद.

यूजरने पाठविलेला (सेन्ट) किंवा स्वीकारलेला (इनबॉक्स) प्रत्येक मेल गुगलतर्फे वाचला जातो , असा खळबळजनक दावा सॉफ्टवेअरनिर्मात्या ' मायक्रोसॉफ्ट ' ने केला आहे.  ' डोंट गेट स्क्रूगल्ड बाय जी-मेल ' या ...

स्कायड्राइव्हचं ऑफिस : मायक्रोसॉफ्ट ऑफिस ३६५

एमएस ऑफिस आणि कम्प्युटर यांचे एक अनोखे नाते . परंतु मध्यंतरीच्या काळात ओपन ऑफिस आणि गुगल डॉक यांनी मायक्रोसॉफ्टला शह देण्याचा प्रयत्न केला . तो प्रयत्नतितकासा यशस्वी झाला नसला तरी मायक्रोसॉफ्टला या दोन्ही उत्पादनांतील सुविधांचा विचार करून एमएस ऑफिसमध्ये बदल करणे क्रमप्राप्त झाले . ऑफिस २०१०मध्ये पूर्वीपेक्षा अनेक सुधारणा करण्यात आल्या होत्या .मात्र त्याही पलीकडे जाऊन काही सुधारणा आवश्यक होत्या म्हणून मायक्रोसॉफ्टने नुकतेच ऑफिस ३६५ लाँचकेले आहे . यामध्ये वर्ल्ड , एक्सेल , पॉवर पॉइंट , वन नोट , आऊटलूक , पब्लिशर अॅण्ड अॅक्सेस याचबरोबर २०जीबीपर्यंतचा स्कायड्राइव्ह स्टोअरेज मिळणार आहे .  मायक्रोसॉफ्ट ऑफिसचं हे व्हर्जन आपल्याला मासिक किंवा वार्षिक सबस्क्रिप्शन भरून वापरू शकतो . याचावापर आपण एकावेळी पाच कम्प्युटर्स आणि पाच मोबाइल्समध्ये वापरू शकतो . आजपर्यंत ऑफिसची अशाप्रकारची कोणतीही सुविधा नव्हती . मायक्रोसॉफ्ट वेब अॅपच्या माध्यमातून आपण हे ऑफिस वापरू शकतो .याचा वापर करणाऱ्या प्रत्येकाला मायक्रोसॉफ्ट आऊटलूक ही नवी मेल सुविधाही वापरता येणार आहे . तसेच मायक्रोसॉफ्टच्या वन नोट या नवीन सुविधेचा वापरही या ऑफिसच्या माध्यमातून करता येईल . वन नोट म्हणजे आपण आपली कामे यामध्ये स्टोअर करून ठेऊ शकतो . तसेच काही वाक्य जी आपण नेहमी आपल्या लिखाणात वापरत असतो ती वाक्यही सेव्ह करून ठेवता येतील .            ऑफिसच्या या व्हर्जनची आणखी एक खासियत म्हणजे यामध्ये आपल्याला स्कायड्राइव्ह वापरायला मिळणार आहे . या स्कायड्राइव्हमध्ये आपल्याला २० जीबीपर्यंतचा डेटा स्टोअर करता येणार आहे . यासाठी आपल्याला वेगळे पैसे मोजावे लागणार नाहीत . ते आपल्या ऑफिसच्या पॅकेजमध्येच मिळते . सध्या याचे ट्रायल व्हर्जन ३० दिवसांसाठी मोफत उपलब्ध आहेत . यापुढे येणाऱ्या विंडोज८ च्या सर्व कम्प्युटर्सवर ऑफिस ३६५ इंस्टॉल अॅप्लिकेशन म्हणून असेल . ऑफिसच्या या व्हर्जनमध्ये आपल्याला थर्ड पार्टी अॅप्स वापरता येणार आहे . यामध्ये पीडीएफ हे सर्वात उपयुक्त अॅप वापरता येईल . यामध्ये विंडोज७ प्रमाणेच आपण फाइल पीडीएफ फॉरमॅटमध्ये सेव्ह करू शकतो . याशिवाय लवकरच यामध्ये भारतीय युजर्सना उपयुक्त ठरतील असे रिड अॅण्ड राइटचे २०० अॅप्स येतील , असे मायक्रोसॉफ्टने स्पष्ट केले आहे . यामध्ये ऑफिसहोम , स्टुडंट आणि प्रिमियम असे तीन व्हर्जन्स उपलब्ध आहेत .

Page 14 of 17 1 13 14 15 17
ADVERTISEMENT
error: Content is protected!