बिल कमी करणारे ' स्मार्ट ' अॅप्स ' एसएमएस , फोन कॉल्स , व्हिडीओ कॉल्स या सर्वांमुळे आपले मोबाइलचे बिलाचे आकडे इतक्या झपाट्याने वाढतात की , ते आपल्या लक्षातही येत नाहीत . पण आपला फोन स्मार्ट असेल तर आपण आपले बिल नक्कीच कमी करू शकतो . अँड्रॉइड किंवा आयओएसवर चालणाऱ्या अॅप्सची त्यासाठी मदत होईल . आपले बिल वाचविणारे काही अॅप्स ... फ्री कॉलिंगला वाढती पसंती स्कायपे तसं हे फेमस अॅप आहे . बहुतांश स्मार्टफोन यूजर्स हे अॅप वापरतच असतील . हे अॅप मोबाइल आणि डेस्कटॉप अशा दोन्हीकडे वापरता येऊ शकते . स्कायपेवरून आपण फ्री व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग करू शकते . यावरून आपल्याला फोन्स किंवा व्हिडीओ कॉल्स करायचे असतील तर आपल्या मित्रांचे किंवा कुटुंबीयांचे अकाऊंट त्यात अॅड करून घ्यावे लागते . यानंतर आपण त्या व्यक्तींना एक रुपयाही खर्च न करता फोन करू शकतो किंवा व्हिडीओ कॉलिंग करू शकतो . याचा वापर आपण इन्स्टंट मेसेंजिंगसाठीही करू शकतो. याद्वारे आपण फोटोही शेअर करू शकतो . Download Skype निंबूझ इन्स्टंट मेसेंजिंग इंटीगेटर म्हणून सुरू झालेल्या निंबूझ या अॅपचा वापर आता खूप मोठ्या प्रमाणावर होऊ लागलाआहे . हे अॅप आता कम्प्युटर , स्मार्टफोन आणि फीचर फोन यामध्ये वापरू शकतो . निंबूझ ते निंबूझ यूजरसोबतआपण व्हॉइस कॉल्स आणि व्हीडिओ कॉल्स करू शकतो . कम्प्युटर , अँड्रॉइड , आयओएस आणि सिंबियन याऑपरेटिंग सिस्टिमवरून आपण वॉइस कॉल्स करू शकतो तर आयओएस आणि कम्प्युटरवरून व्हिडीओ कॉल्सकरू शकतो . याशिवाय या अॅपवरून आपण चॅटिंगही करू शकतो . Download Nimbuzz ओवू तुम्हाला तुमच्या ग्रुप्सशी काही गोष्टी शेअर करायच्या आहेत किंवा त्यांच्याशीच चॅटिंग करायचं आहे तर तुम्हीओवू हे अॅप वापरू शकता . या अॅपच्या माध्यमातून आपण ग्रुप व्हिडीओ चॅट करू शकतो . यामध्ये आपणएकावेळी १२ जणांशी बोलू शकतो . हे अॅप आपल्याला स्मार्टफोन आणि कम्प्युटर्सवर उपलब्ध आहे . याचबरोबरआपण या माध्यमातून फेसबुक फ्रेंडस आणि ट्विटरच्या फॉलवर्सशी व्हिडीओ आणि व्हॉइस कॉल्स करू शकतो . हेअॅप आपल्याला चॅटिंगसाठी खूप फायदेशीर ठरू शकणार आहे . वुई चॅट वुई चॅट हे अॅप्लिकेशन आपल्याला व्हिडीओ कॉलिंगची सुविधा देते . यामध्ये आपल्याला व्हॉइस चॅटची सुविधाआहे . पण यातून आपण व्हॉइस कॉलिंग करू शकणार नाही . व्हॉइस चॅटच्या माध्यमातून आपण व्हॉइस मेसेजेसपाठवू शकतो . याशिवाय यामध्ये आपल्याला ग्रुप टेक्स्ट चॅट्स , मल्टिमीडिया शेअरिंग आणि ब्राऊजर्सच्यामाध्यमातून चॅट करू शकतो . यात ' लूक अराऊंड ' नावाचं एक फीचर आहे , ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्याआसपास असलेल्या वूई चॅट यूजर शोधून त्याच्याशीही आपण चॅटिंग करू शकतो Download WeChat. फ्रिंग स्कायपेशी साधर्म्य साधारणारे हे अॅप सध्या बाजारात चांगलेच चालत आहे . अँड्रॉइड , आयओएस आणि सिंबियनऑपरेटिंग सिस्टिमवर वापरता येणार आहे . यामध्ये आपण व्हॉइस आणि व्हिडीओ कॉल्स करू शकणार आहोत .हे कॉल्स करण्यासाठी समोरच्या व्यक्तीकडेही फ्रिंग असणे आवश्यक आहे . यात तुम्ही चॅट करू शकतातयाचबरोबर तुम्ही मल्टीमीडिया कंटेन्टही आपण शेअर करता येऊ शकणार आहे . याशिवाय यात तुम्हाला ग्रुपव्हिडीओ प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत .. Download ...